रेशनचं धान्य वाटप आता डिजिटल पद्धतीने
Distribution of ration grains is now done digitally,Those who sell ration food grains are no longer safe! Government will take direct action


बरेच जण रेशनवर मिळणारं धान्य घेऊन आपल्या आजूबाजूच्या लोकांना विकतात. काही जण त्यातून पैसे कमवतात तर काही जण पैशांऐवजी त्यातून धान्याच्या बदल्यात धान्य असं करून घेतात. मात्र रेशनचं धान्य विकणाऱ्यांची आता खैर नाही.
शेतकऱ्यांनो तुमच्या सोलर पंपाचे वारा ,पाऊस किंवा इतर कारणाने नुकसान झाल्यास तक्रार करा
मेहकर तालुक्यात प्रत्येक महिन्याला हजारो क्विंटल धान्य शासकीय दराने रेशन दुकानांतून वाटप केलं जातं. हे सर्व वितरण डिजिटल पद्धतीने होत असल्याने कोणत्याही प्रकारच्या गैरव्यवहारावर आता शासनाची नजर आहे.
लाभार्थ्यांच्या सर्व व्यवहारांची माहिती शासनाच्या डेटाबेसमध्ये थेट अपडेट होत आहे. त्यामुळे काळाबाजार किंवा धान्य विक्रीचे प्रकार लपवणे अशक्य झाले आहे.
एसटी बस चे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये १५ टक्के सूट
शासनाने सर्व रेशन दुकानदारांसाठी दररोजच्या वितरणाची नोंद व्यवस्थित ठेवणे बंधनकारक केले आहे. वेळोवेळी त्यांना सूचना देण्यात येत आहेत. जर एखाद्या दुकानातून देखील असा प्रकार आढळला,
तर त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. बऱ्याचदा दुकानदारही परस्पर रेशनचं थोडं धान्य बाजूला काढून विकण्याचे प्रकार करत असतात. त्यामुळे त्यांच्यावरही चाप बसवण्यासाठी हे कठोर पाऊल उचलण्यात आलं आहे.
चीनकडून भारतावर दबाव वाढवण्याची मोठी खेळी
जुलै, ऑगस्ट आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये प्रत्येक महिन्याचा धान्य वाटपाचा कार्यक्रम केवळ तीन दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासोबतच वितरण प्रक्रियेची तपासणी,
शाळा पोषण आहारासाठी असलेलं धान्य योग्य मिळतंय का याचीही शहानिशा होणार आहे. दर बुधवारी रेशन दुकानांची साफसफाई, वितरण नोंदींची पडताळणी आणि लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकांची तपासणी केली जाणार आहे.