रेल्वेचा मोठा निर्णय; आता केवळ याच लोकांना मिळणार लोअर बर्थ
Railways' big decision; Now only these people will get lower berth,Important news for railway passengers! Now only these people will get lower berth, what did the Railway Minister give for this?


भारतासारख्या विशाल देशात रेल्वे हे किफायतशीर दळणवळणाचे साधन आहे. रोज कोट्यवधी प्रवासी भारतीय रेल्वेने प्रवास करतात. त्यातच अनेकांचा लोअर बर्थचा आग्रह असतो.
चीनकडून भारतावर दबाव वाढवण्याची मोठी खेळी
कारण येथे इतर बर्थप्रमाणे चढउतर करण्याची गरज नसते. तसेच बर्थ खाली सामान ठेवण्याची सोय असते. उठून बसता येते. स्टेशन आले तर तात्काळ उतरता येते. पण आता केवळ याच प्रवाशांना लोअर बर्थ मिळणार आहे. काय आहे तो रेल्वे मंत्रालयाचा निर्णय?
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याविषयीचा निर्णय जाहीर केला आहे. रेल्वेतील हे खालील आसन बसण्यासाठी आणि आरामासाठी योग्य मानण्यात येते. अनेक जण त्यासाठी आग्रही असतात. आता रेल्वे मंत्र्यांच्या मते ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवासासाठी लोअर बर्थ राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यांना प्राधान्याने हे सीट देण्यात येईल.
रेशनचं धान्य वाटप आता डिजिटल पद्धतीने
रेल्वे मंत्र्यांच्या मते, आता ट्रेनमधील लोअर बर्थ हा दिव्यांग, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात येईल. त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान त्यांना अडचणींचा सामना करावा लागणार नाही. त्यांना हे सीट देताना प्राधान्य देण्यात येईल.
न्यायाधीशासमोरच वकील प्यायला दारू ,न्याधीशांनी थेट….
ज्येष्ठ नागरिक
दिव्यांग प्रवासी
महिला, खासकरून गर्भवती महिला आणि एकटीने प्रवास करणाऱ्या महिला
सगळ्यांना लोअर बर्थ मिळणे अशक्य
निधीवाटपाचा वाद मिटेना ,पडद्यामागे महायुतीत मोठ्या हालचाली
रेल्वे मंत्र्यांनी स्पष्ट केले की, लोअर बर्थची संख्या मर्यादित असते. त्यामुळे सर्वच प्रवाशांना ती उपलब्ध करून देणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे ज्यांना या लोअर बर्थ सीटची सर्वाधिक गरज आहे, त्यांना प्राधान्याने ती देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे.
बोट बुडून चौघांचा मृत्यू, ४१ जण बेपत्ता
रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे की, नेहमी दिव्यांग प्रवाशांना प्राथमिकता देण्यात येते. त्यामुळे त्यांना प्रवासादरम्यान चढउतार करणे सोपे जाते. स्लीपर कोचमध्ये 2 लोअर बर्थ आणि थर्ड एसी, इकोनॉमी मध्ये 4 बर्थ हे त्यांच्यासाठी राखीव असतात.