सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलीस गोत्यात; पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश
Police in deep trouble in Somnath Suryavanshi death case; High Court orders to file charges against police,Big update in Somnath Suryavanshi death case; High Court orders to file cases against police


परभणीतील सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यू संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू हा पोलिसांच्या मारहाणीतच झाला असून या मृत्यूला पोलीसच जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांकडून सुरूवातीपासूनच केला जातोय.
ईडी ऍक्टिव्ह मोडमध्ये सोनिया,राहुल गांधींवर २००० कोटींचा घोटाळा केल्याचाआरोप
परभणीच्या नवामोंढा पोलीस ठाण्यात सोमनाथ सूर्यवंशीला मारहाण करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. सोमनाथ सूर्यवंशीचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता.
हा 451 पानांचा गोपनीय अहवाल राज्य मानवाधिकार आयोगासमोर सादर केला. आता थेट संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले.
वनमंत्र्यांनी झाड तोडल्यास 50 हजारांच्या दंडाचा निर्णय घेतला मागे,
सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात प्रकाश आंबेडकरांनी न्यायालयात बाजू मांडली होती. आता हायकोर्टाने संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिली आहेत.
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने ही याचिका दाखल केली होती. हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत. परभणीत संविधान अवमाननेच्या घटनेनंतर आंदोलन झाले होते. या आंदोलनात सोमनाथ सूर्यवंशी हे देखील सहभागी झाले. यादरम्यान या आंदोलनाने उग्र रूप धारण केले.
बोट बुडून चौघांचा मृत्यू, ४१ जण बेपत्ता
या आंदोलनावेळी ताब्यात घेतलेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी,
यासाठी आंबेडकरी चळवळीतील अनुयायांनी जानेवारी महिन्यात परभणी ते मुंबई असा लॉन्ग मार्च काढला होता. राहुल गांधी यांनीही सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेतली.
बँकेच्या शाखाधिकाऱ्यानेच २५ लाख लुटले, मराठवाड्यातील घटना
न्यायालयीन कोठडीमध्ये असताना सोमनाथ सूर्यवंशींना हृदयविकाराचा झटका आला. दरम्यान त्यांना रुग्णालयामध्ये नेत असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा पोलिसांनी केला.
न्यायालयीन कोठडीत पोलिसांकडून सोमनाथ सूर्यवंशीला बेदम मारहाण झाली आणि त्यामध्येच त्याचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबियांकडून करण्यात आला.
जून मध्येच राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ
एका माथेफिरूने 10 डिसेंबरला संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली होती आणि त्याविरोधात 11 तारखेला परभणीत आंदोलन करण्यात आलं होते.
या प्रकरणात तीन पोलिसांचे यापूर्वीच निलंबन करण्यात आले. आता हायकोर्टाने हे आदेश देत गुन्हा दाखल करा, असे थेट आदेशच दिले आहेत.