ठाकरेंच्या विजयी मेळाव्यापासून काँग्रेस चार हात दूर
Congress is four arms away from Thackeray's victory rally,Why didn't Congress leaders come to the Marathi Vijay Mela? Sanjay Raut told the real reason


मुंबईत आज महाराष्ट्रातील राजकारणात ऐतिहासिक दिवस अख्खा देशाने पाहिला. तब्बल 20 वर्षांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत. एकाच मंचावर दोन भावांची भेट अख्खा देशाने अनुभवली.
शाळेच्या मुख्याध्यापकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
मराठी अस्मितेसाठी दोन भाव आज एकत्र आलेत. मराठीच्या मुद्दावरून सत्ताधारीविरोधात सर्वपक्ष मंचावर एकत्र दिसले. पण यात काँग्रेस पक्षाचा नेता न दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली. पण यावर संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं.
उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर हल्लाबोल !
पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, ‘दोन राजकीय नेते एकत्र येतात ते राजकीय कारणासाठी एकत्र येतात. त्या दोघांनी मिळून सांगितलं आहे. महाराष्ट्र द्रोही सत्ता आम्ही उधळून लावू.
राज आणि उद्धव युती झाली आता महाविकास आघाडी…
हे उद्धव ठाकरेही बोलले आणि राज ठाकरेही बोलले आहेत. दोन्ही भाऊ एकत्र यावे हे स्वप्न होतं आणि ते स्वप्न आता पूर्णत्वाला जातेय. भाजप मुंबई नाही मिळवू शकणार. भाजप अडाणी, लोढा आणि शाह हे कितीही एकत्र आले तरी त्यांना मुंबई गिळता येणार नाही.
आजचं चित्र ज्यांनी पाहिलं आहे ठाकरे पॉवर त्याच्यामुळे त्यांनी हा नाद सोडावा. काँग्रेसचे नेते आले नाही, पण त्यांच्या आमच्याशी संपर्क होता. त्यांची दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक चालू आहे.’
राज-उद्धव ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया
देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, ‘मराठी लोकांना मारहाण करणे ही गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही’. त्यावर संजय राऊत म्हणाले की, ‘त्यांना ही गुंडागर्दी खपवून घ्यावी लागेल. आम्ही मराठीसाठी गुंडागर्दी केली म्हणून ते आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे.’