उद्धव ठाकरे म्हणाले ;भाजपवाल्यांना कधी कोणाच्या लग्नात बोलवू नका
Uddhav Thackeray said; Never invite BJP members to anyone's wedding,Why did Uddhav Thackeray say, ‘BJP members will create a fight between husband and wife and go for a second marriage…’? Raj Thackeray And Uddhav Thackeray Rally:


हिंदी सक्ती आणि त्रिभाषा सूत्र लागू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. परंतु शिवसेना उबाठा आणि मनसेच्या प्रचंड विरोधानंतर तो मागे घेण्यात आला. त्यानंतर शिवसेना उबाठा आणि मनसेने शनिवारी विजय मेळावा घेतला.
न्यायाधीशासमोरच वकील प्यायला दारू ,न्याधीशांनी थेट….
या मेळाव्यातून शिवसेना उबाठाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला केला.उद्धव ठाकरेकडून भांडण लावण्याचे काम केले जाते, असा आरोप त्यांनी केला.
बँकेच्या शाखाधिकाऱ्यानेच २५ लाख लुटले, मराठवाड्यातील घटना
उद्धव ठाकरे म्हणाले की, आपण एकत्र (मनसे आणि शिवसेना उबाठा) आलो आहोत. पण पुन्हा आपल्यात भांडण लावण्याचा प्रयत्न होईल. त्यामुळे मी नेहमीच सांगतो भाजपवाल्यांना कधी कोणाच्या लग्नात बोलवू नका.
जून मध्येच राज्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ
ही लोक लग्नात येणार श्रीखंड अन् बांसुदी पोळ्या खातील आणि नवरा बायकोत भांडण लावून दुसऱ्या लग्नात जातील. नाही तर पोरीलाच पळवून घेऊन जातील. त्यांचे स्वत:चे काहीच नाही, असा हल्ला उद्धव ठाकरे यांनी करत शिवसेना फुटीवरुन भाजपवर निशाणा साधला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला “जय गुजरात”चा नारा ,शिवसैनिकांमध्ये चलबिचल
महानगरपालिकेसाठी मनसे आणि शिवसेना उबाठा एकत्र आली आहे, अशी टीका केली जात आहे. त्यालाही उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, काही जण म्हणतात, आमचा म मराठीचा नाही तर म महापालिकेचा आहे.
ठाकरे गटाकडून बॅनरबाजी;चुकीची रिक्षा पकडलीत, परत या! अन्यथा गुजरातला…,
पण आमचा म हा महाराष्ट्राचा आहे. सत्ता येते आणि जाते पण आपली ताकद एकत्र असली पाहिजे. संकट आलो की आपण एकत्र येतो आणि संकट गेले की आपण पुन्हा वेगळे होतो, असे होऊ नये, अशी अपेक्षा उद्धव ठाकरे यांनी मराठीच्या मुद्यावर एकत्र आलेल्या सर्वांकडून व्यक्त केली.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, देशातील कोणत्याही लढ्यात भाजप नव्हता. अगदी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात शेवटी आला. परंतु १९५७च्या निवडणुकीनंतर सर्वात आधी बाहेर पडला.
शाळेच्या मुख्याध्यापकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
तेव्हाचा जनसंघ म्हणजे आजचा भाजप आहे. त्या भाजपकडून आपण स्वाभिमान शिकायचा का? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी करत भाजपवर जोरदार हल्ला केला. मुंबईचा सर्वाधिक मालक कोण असेल तर यांच्या मालकाचा मित्र म्हणजे अदानी आहेत, असे त्यांनी सांगितले.
मराठीच्या मुद्यावरून एकत्र आलेल्या शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा संयुक्त असा विजयी मेळावा आज वरळी डोममध्ये पार पडला. हजारो कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी, सेलिब्रिटी यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये प्रथम राज ठाकरेंची आणि नंतर उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली.
यावेळी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेला एकजूट राहण्याचा संदेश दिला. ‘ आपली ताकद एकजुटीत हवी. दरवेळी संकट आलं की एकत्र येतो. संकट गेल्यावर भांडतो. आता हा नतद्रष्टपणा करायचा नाही ‘ असं आवाहन उद्धव ठाकरेंनी तमाम मराठी जनांना दिलं.
जो दिल्लीचे पाय चाटतो त्याला बाटगे म्हणतो. मुंबई मराठी माणसाने मिळवली. तेव्हाचे सत्ताधारी होते. ते मुंबई मराठी माणसाला द्यायला तयार नव्हते. सका पाटील बोलले होते.
यावश्चंद्र दिवाकरो मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. कशी नाही मिळत. मराठी माणसाने झुकवलं. कशासाठी हा घोळ घालत आहात. माझ्या डोक्यात एक विचार आहे.
की नाही बघा. यांचं हे काही सुरू आहे. तेव्हा काश्मीरमध्ये ३७० कलम होतं. ते हटवण्यासाठी शिवसेने पाठिंबा दिला. त्यांनी घोषणा दिली. एक निशाण, एक विधान, एक संविधान. बरोबर आहे. तिरंगा एकच हवा असं उद्धव ठाकरेंनी नमूद केलं.
भाजपचं भांडी धुवायचं फडकं नको. ते फडकं नको. आता वन नेशन वन इलेक्शन सुरू केलं. हिंदू हिदुस्थाना. हिंदुस्तान मान्य आहे. पण हिंदीची सक्ती मान्य नाही. फेक नरेटिव्ह करता. उद्धव ठाकरे एवढं काम करत होता तर सरकार का पाडलं,? असा सवालही त्यांना विचारला.
मी मुख्यमंत्री असताना मराठीची सक्ती केली. त्याचा अभिमान आहे. काय केलं. महाराष्ट्रात मराठी सक्तीची करावी लागली. मराठीचे दुश्मन कोण आहे. पण महाराष्ट्रात मराठी सक्ती केल्यावर काही लोक कोर्टात गेले. ती गुंडगिरी नाही होत.
आता कोण तरी भेडिया. ही यांची सर्व पिल्लावळ आहे. तोडाफोडा आणि राज्य करा. आपण ज्या गोष्टी केल्या होत्या. म्हणतात शिवसेनेने काय केलं. राज तुला सोबत घेतो. तेव्हा आपण एकत्र होतो. आता एकत्र आलोय असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठी माणूस मुंबईबाहेर नेला म्हणतात. मग १४ वर्षात तुम्ही मराठी माणूस घालवला, उद्योगधंदे, मोठे ऑफिस घालवले. कुठे गेले. तेवढाच हिंदुस्तान आणि तेवढेच हिंदू आहेत का.
आम्ही सर्व करत होतो. तुम्ही गद्दारी केली आणि आमचे सरकार पाडलं. तुमचे मालक तिकडे बसले. त्यांचे बुट चाटण्यासाठी तुम्ही हे करत आहात अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरेंनी केली.
आपल्या डोळ्यांदेखत लचके तोडले जात आहे. किती काळ सहन करायचं. प्रत्येकवेळी काय झालं की भांडाभांडी करणार. आम्ही एकत्र आल्यावर सत्ताप्राप्ती. काही म्हणतात यांचा म मराठीचा नाही. म महापालिकेचा आहे. अरे म महाराष्ट्रही काबीज करू.
आज निवडणुका नाही. सत्ता येते जाते. आपली ताकद एकजुटीत हवी. दरवेळी संकट आलं की एकत्र येतो. संकट गेल्यावर भांडतो. आता हा नतद्रष्टपणा करायचा नाही. गेल्या विधानसभेत त्यांनी बटेंगे तो कटेंगे केलं, अशा शब्दांता उद्धव ठाकरेंनी हल्ला चढवला.