कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा विधीमंडळात गेम खेळतानाचा Video

Video of Agriculture Minister Manikrao Kokate playing games in the legislature

bj admission
bj admission

राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधीमंडळामध्ये गेम खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.

भाजप खासदाराचे राज ठाकरेंना आव्हान ,इतकी हिंमत असेल तर बिहारमध्ये येऊन दाखवावे चोप देऊ

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हे व्हिडीओ एक्स पोस्ट केले असून रमी खेळत असल्याचा दावा केला आहे. या व्हिडीओमुळे आता कृषीमंत्र्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. रोहित पवार नेमकं काय म्हणाले जाणून घ्या.

विधानसभा निवडणुक निकालावरुन काँग्रेसचा गंभीर आरोप

सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना, राज्यात रोज ८ शेतकरी आत्महत्या करत असताना सुद्धा काही कामच नसल्याने कृषिमंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी.

रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पिकविमा-कर्जमाफी-भावांतर ची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची “कभी गरीब किसानो कीं खेतीपर भी आओ ना महाराज” ही आर्त हाक ऐकू येईल का? असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये माणिकराव कोकाटे कोणती तरी पत्त्याची गेम खेळताना दिसत आहेत. तर रोहित पवार यांनी व्हिडीओ पोस्ट करताना “#जंगली_रमी_पे_आओ_ना_महाराज…!” आणि कधी_शेतीवर_या_महाराज #खेळ_थांबा_कर्जमाफी_द्या, असे हॅशटॅग वापरत म्हणत निशाणा साधला आहे. रोहित पवारांनी व्हायरल केलेल्या व्हिडीओवरून ठाकरे गटाच्या नेत्यांनी कडाडून टीका केली आहे.

राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला इशारा महाराष्ट्रानंतर बिहारमध्येही निवडणूक चोरण्याचा प्रयत्न

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची अवस्था झाली ही येड्याची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस अशी झाली आहे. कधी एखादा सत्ताधाऱ्यांचा आमदार बनियानवर खाली उतरून कँन्टिन वाल्यांना मारहाण करतो.

विधीमंडळाच्या प्रांगणात गँगवारसारखी भांडणं होतात. कधी एखादा मंत्री करोडो रूपये मोजतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो. तर आता तर हद्द विधीमंडळाच्या सभागृहामध्ये कृषीमंत्री रम्मी गेम खेळताना दिसतात.

लोकांनी भरलेल्या कराच्या पैशातून जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होईल असं मला वाटतं मात्र ही चर्चा होण्याऐवजी मंत्रिमहोदय ऑनलाइन गेम खेळत असतील तर गंभीर आहे.

इम्तियाज जलील म्हणाले मी तेथे असतो तर आमदार संजय गायकवाड यांची लुंगी सोडून कानशिलात लगावली असती

अजित दादा, शिंदे आणि फडणवीसांची काय परिहार्यता असेल बर ज्यामुळे अशा लोकांना उमेदवाऱ्या द्वाव्या लागतात आणि निवडून आल्यावर त्यांना मंत्रिपद द्यावं लागतं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची अवस्था झाली ही येड्याची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस अशी झाली आहे. कधी एखादा सत्ताधाऱ्यांचा आमदार बनियानवर खाली उतरून कँन्टिन वाल्यांना मारहाण करतो.

उद्धव ठाकरेंची या खेळीमुळे अटीमुळे मविआ अडचणीत?

विधीमंडळाच्या प्रांगणात गँगवारसारखी भांडणं होतात. कधी एखादा मंत्री करोडो रूपये मोजतानाचा व्हिडीओ व्हायरल होतो. तर आता तर हद्द विधीमंडळाच्या सभागृहामध्ये कृषीमंत्री रम्मी गेम खेळताना दिसतात.

Embedded video

लोकांनी भरलेल्या कराच्या पैशातून जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होईल असं मला वाटतं मात्र, ही चर्चा होण्या ऐवजी मंत्रिमहोदय ऑनलाइन गेम खेळत असतील तर गंभीर आहे.

अजित दादा, शिंदे आणि फडणवीसांची काय परिहार्यता असेल बर ज्यामुळे अशा लोकांना उमेदवाऱ्या द्वाव्या लागतात आणि निवडून आल्यावर त्यांना मंत्रिपद द्यावं लागतं, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.

Related Articles