कृषिमंत्री कोकाटे पुनः गोत्यात ,म्हणाले “शासन भिकारी”
Agriculture Minister Kokate in Gotya again, says "Government is a beggar"


सध्या राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे हे चांगलेच चर्चेत आले आहेत. विधानभवनात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडीओ आमदार रोहित पवार यांनी पोस्ट केला होता.
त्यानंतर मी जाहिरात स्किप करत होतो असे स्पष्टीकरण कोकाटे यांनी दिले होते. त्यानंतर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आणखी दोन व्हिडीओ पोस्ट केले आहेत.
आमदारांची बदनामी थांबवण्यासाठी मागितली कोटीची खंडणी; दहा लाख घेताना रंगेहात अटक
दरम्यान यावर आज माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेत आरोपांना प्रत्युत्तर दिले. तेव्हा त्यांनी शेतकरी भिकारी नसून शासन भिकारी आहे एक विधान केले आहे. आता यावरून पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोकाटेंचे कान टोचले आहेत.
मी रमी खेळत नव्हतो. मला रमी खेळता येत नाही. मी फोन सुरू केला आणि त्यावर गेम सुरू झाला. फोन नवीनच असल्यामुळे मला तो गेम स्किप करता आला नाही.
तेवढ्यात कोणीतरी त्याच्या व्हिडीओ चित्रीत केला आणि अधिवेशन संपल्यावर व्हायरल केला. नाही. आजतागायत मी राम्मी खेळलो नाही तरी माझी बदनामी केली जात आहे. ज्या नेत्यांनी बदनामी केली त्या सर्वांना मी कोर्टात खेचणार आहे.
शेकऱ्यांकडून एक रुपया शासन घेते. शेतकरयांना अजूम्ही एक रुपया देत नाही. म्हणजे शासन भिकारी आहे. शेतकरी नाही. एक रुपया ही किंमत फार थोडी आहे.
निधीवाटपाचा वाद मिटेना ,पडद्यामागे महायुतीत मोठ्या हालचाली
पीक विम्यामुळे महाराष्ट्रात ५ ते साडे पाच लाख बोगस अर्ज साडपले आहेत. मी ते बोगस अर्ज तात्काळ रद्द केले. पुढील सहा महिन्यात कृषिक्षेत्रात मोठा बदल झालेला दिसून येईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोली दौऱ्यावर होते. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या शासन भिकारी आहे शेतकरी नाही या विधानावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
थेट आमदाराकडूनच कॅन्टीनवर काम करणाऱ्या वेटरला मारहाण
“कोकाटे नेमके काय म्हणाले ते मी ऐकलेलं नाही. तथापि त्यांनी असं विधान केले असेल तर एखाद्या मंत्र्याने असे विधान करणे चुकीचे आहे. पीकविमा पद्धत बदलण्याचा निर्णय आपण जाणीवपूर्वक घेतलेला आहे.
विधानसभेच्या अधिवेशनानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. सभागृहात लक्षवेधी सुरू असताना कोकाटे मोबाईलवर पत्ते (ऑनलाइन रमी) खेळताना दिसत असलेला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आमदारांची बदनामी थांबवण्यासाठी मागितली कोटीची खंडणी; दहा लाख घेताना रंगेहात अटक
यावरुन कोकाटे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तसेच विरोधांकडून राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवरून कोकाटेंवर नाराजी व्यक्त केली.
माणिकराव कोकाटे म्हणाले, ” राजीनामा देण्यासारखे घडलं काय? मी काही विनयभंग केला का ? माझी गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आहे का? मी मुख्यमंत्री यांना ब्रिफ केलेलं नाही.
सरकारकडून चक्क सफाई कामगाराची शिक्षक म्हणून नियुक्ती
चौकशी झाली नाही त्यामुळे समज होणे साहजिकच आहे. रम्मी खेळलो नाही आणि खेळत नाही. मला नियमांची काळजी आहे. हा विषय अनावश्यक लावून धरले आहे. मोबाईलच्या कंपन्या वेगवेगळ्या आहेत, असं यावेळी कोकाटेंनी सांगितले.








