नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना काँग्रेसकडून खिंडीत पकडण्याचा प्लॅन
Congress plans to trap Ashok Chavan in Nanded


नांदेडमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ट्विस्ट निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना घेरण्यासाठी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याची शक्यता आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण आणि वंचितचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद यांच्यात चर्चा झाली आहे. यामुळे अशोक चव्हाण यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना शिंदेंच्या कानपिचक्या
नांदेडमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार आहे. त्यामुळे सर्व पक्ष तयारीला लागले आहेत. जिल्ह्यात नेहमीच काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे.
यापूर्वी अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने महापालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांमध्ये सत्ता मिळवली आहे.
शिंदे गटाच्या चार नेत्यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी
पण आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यामुळे चित्र बदललं आहे. काँग्रेसमधील अनेक माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे निवडणुकीत चुरस वाढणार आहे.
अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप पहिल्यांदाच स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणार आहे. काँग्रेसला टक्कर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याचा विचार सुरू आहे.
राज्यातील ‘या’ शहराला 4 वंदे भारत ट्रेन
काही दिवसांपूर्वी रविंद्र चव्हाण आणि फारुख अहमद यांच्यात याबाबत चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी युतीचे संकेत दिले आहेत.
नांदेड महानगरपालिकेत दलित आणि मुस्लिम नगरसेवकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे युती झाल्यास मतांची विभागणी टळेल आणि दोन्ही पक्षांना फायदा होईल, असं बोललं जात आहे.
महाराष्ट्रासह देशभरातील सुमारे २०० ठिकाणांवर इन्कम टॅक्स चे छापे
काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण म्हणाले, “वंचित सेक्युलर पक्ष आहे. त्यांच्याकडून प्रस्ताव आल्यास आम्ही विचार करू”. तसंच ते पुढे म्हणाले,
“युतीबाबत चर्चा झाली नाही. पण वंचितकडून प्रस्ताव आल्यास जिल्हा कार्यकारणी विचार करेल आणि प्रदेश काँग्रेसचा सल्ला घेऊन निर्णय घेईल.
भारतीय रेल्वेचा तिकीटांसंदर्भातील नियमात मोठा बदल
युती झाल्यास सेक्युलर मतांची विभागणी टळेल आणि दोन्ही पक्षांना फायदा होईल,” अशी अपेक्षा खासदार चव्हाण यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, वंचितचे राज्य उपाध्यक्ष फारुख अहमद यांनीही याबाबत आपली प्रतिक्रिया दिली आहे. “काँग्रेसचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी युतीबाबत सकारात्मकता दाखवली असेल, तर आम्ही स्वागत करतो.
राज ठाकरेंसोबत एकत्र आल्याने मुस्लिम समाजाने उद्धव ठाकरेंकडे काय प्रतिक्रिया दिली
मात्र खासदार चव्हाण यांना युतीबाबत बोलणी करण्याचे अधिकार पक्षाने दिले आहेत का? मागील लोकसभा आणि विधानसभेच्या वेळेस काँग्रेसने युतीबाबत चर्चा केली, पण ती चर्चा पूर्ण झाली नाही, तसे होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे,” असं फारुख अहमद यांनी म्हटलं आहे.








