दिल्लीच्या जेएनयू विद्यापीठात देवेंद्र फडणवीस यांना करावा लागला विरोधाचा सामना
Devendra Fadnavis had to face opposition at Delhi's JNU University


दिल्लीतील प्रसिद्ध जवाहरलाल नेहरु विद्यापीठात कुसुमाग्रज मराठी सामरिक अध्ययन केंद्राच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आज पार पडत आहे.
या कार्यक्रमाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार या तीनही प्रमुख नेत्यांना निमंत्रण होतं.
शेतकऱ्यांची कर्जमाफी करा ,नसता गांजा लागवडीला परवानगी द्या
त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेएनयूत आज दाखल झाले. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मराठी भाषा मंत्री उदय सामंत हे देखील जेएनयूत उपस्थित आहेत.
देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर जेएनयूत नाट्यमय घडामोडी घडल्या. जेएनयूतील काही विद्यार्थ्यांनी देवेंद्र फडणवीस यांना विरोध केला.
शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना शिंदेंच्या कानपिचक्या
स्टुडंट्स फिडरेशन ऑफ इंडियाकडून आंदोलन करण्यात आलं. देशाच्या कोणत्याही भागात जाणं हा आमचा संविधानिक अधिकार आहे. महाराष्ट्रात गेल्यावर आम्हाला मराठी बोलण्याचा हट्ट करणं चुकीचं आहे,
अशी प्रतिक्रिया एका आंदोलकाने दिली. विविध आंदोलकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली आहे. काही आंदोलकांनी हिंदी भाषेला कशाप्रकारे सर्वांवर थोपवलं जात आहे
शिवसेनेच्या वादग्रस्त मंत्री आणि आमदारांना शिंदेंच्या कानपिचक्या
यावरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. तर काहींनी महाराष्ट्रात अमराठी लोकांना मारहाण होते, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांना विरोध केला.
दरम्यान, जेएनयूमध्ये मराठी भाषेसाठी स्वतंत्र अभ्याय केंद्र तयार करण्याचा प्रस्ताव 17 वर्षांपूर्वी मांडण्यात आला होता. पण तो केवळ कागदपत्रांपुरताच मर्यादीत राहिला होता.
तो वास्तव्यात साकार झाला नव्हता. त्यामुळे मराठी भाषिक विद्यार्थ्यांना आपल्या मराठीला इथ स्थान का नाही? असा प्रश्न अनेक वर्षांपासून सतावत होता.
सुनील तटकरेंच्या पत्रकारपरिषदेमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून लातूरमध्ये तुफान राडा
अखेर जेएनयूत मराठी अध्ययन केंद्राचं आज उद्घाटन होत आहे. पण या उद्घाटनाच्या कार्यक्रमावेळी काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये गोंधळ घातला.
मुख्यमंत्री फडणवीसांसोबत गुप्त भेटी बाबत काय म्हणाले आदित्य ठाकरे ?
राज्यात त्रिभाषा सूत्र आणण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय. पण विरोधकांकडून त्याला विरोध होतोय. हिंदी भाषा इयत्ता पहिलीपासून सक्ती करु देणार नाही,
अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. यामुळे राज्यात हिंदी विरुद्ध मराठी असं वातावरण तयार झालं आहे.
नांदेडमध्ये अशोक चव्हाणांना काँग्रेसकडून खिंडीत पकडण्याचा प्लॅन
पण असा वाद सुरु असताना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिल्लीत जेएनयू विद्यापीठात मराठी अध्ययन केंद्र सुरु होत आहे.








