अमित शाह-देवेंद्र फडणवीसांच्या भेटीवरून संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले…
Sanjay Raut's big claim on Amit Shah-Devendra Fadnavis meeting; said...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील काही दिवस दिल्लीमध्ये मुक्कामी होते.
त्यातच राज्यात माणिकराव कोकाटे यांच्याकडील कृषीखाते काढून घेण्यात आले आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
अजितदादांकडून माणिकराव कोकाटेंना अभय?
तर दत्तात्रय भरणे यांना राज्याचे नवे कृषिमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आले आहेत. तर आता अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केलाय.
संजय राऊत म्हणाले की, हे सरकार कलंकित झाले आहे. मी खात्रीने सांगतो की, मंत्र्यांना जावे लागेल. वसईच्या आयुक्तांवर धाड पडलेली आहे. हे 1000 कोटींचे प्रकरण आहे.
या प्रकरणात एका मंत्र्यांना जावे लागेल. नव्या क्रीडामंत्रींना योग्य खाते मिळाले आहे. त्यांनाही जावे लागेल. ही व्यवस्था तात्पुरती सुरू आहे. प्रत्येक आरोपी शेवटपर्यंत बचावाचा प्रयत्न करतो.
ईडीचे अधिकाऱ्यांचा दरवाजा तोडून बंगल्यात प्रवेश,घरात सापडली कोट्यवधींची कॅश
देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांच्या भेटीत काय झालं, याबाबत माझ्याकडे माहिती आली आहे. त्यामुळे तुम्ही वेट अँड वॉच करा, असे त्यांनी म्हटले आहे.
संजय राऊत पुढे म्हणाले की, मंत्र्यांचे केलेले खातेबदल ही थातूरमातूर कारवाई आहे. आरोपी मंत्री आणि त्यांचे बॉस आपल्या माणसांना वाचवण्याचा काही प्रयत्न करत आहेत.
महायुतीत काहीतरी मोठं घडणार? कार बदलून शिंदे बड्या नेत्याच्या भेटीला
त्यासाठीच खातेबदलासारखे प्रकार केले जात आहेत. मात्र जनता, सामाजिक कार्यकर्त्यांवर काहीही फरक पडणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच याचं सगळं ओझं झालेले आहे.
त्यांनाही हे ओझे उचलून फेकायचे आहे. अमित शाहांच्या भेटीत देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे की, या अशा लोकांबरोबर मला काम करणे अवघड झाले आहे.
इंदिरा गांधीवर कारवाई झाली, मग मोदींवर का नाही? पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
सरकारची, राज्याची बदनामी होत आहे. निर्णय घ्यावा लागेल, असे फडणवीस यांनी अमित शाह यांना भेटून सांगितल्याचा दावा त्यांनी केलाय.
संसदीय लोकशाहीत विरोधी पक्षाचा आवाज महत्त्वाचा असतो. सध्याचे राज्यकर्ते त्या भूमिकेत नाही. या मंत्र्यांना जावे लागेल.
राहुल गांधी म्हणाले ; निवडणूक आयोग करतोय मतांची चोरी हा मोठा राष्ट्रद्रोह
शेवटच्या क्षणापर्यंत धनंजय मुंडे यांना वाचवण्यात आले. दिल्लीने अजित पवार यांना न सांगता भुजबळ यांना मंत्री केले, असे देखील संजय राऊत यांनी म्हटले आहे.









