वादळी वारा, मेघगर्जनेसह पावसाचा इशारा

Warning of strong winds, thunder and rain

bj admission
bj admission

 

 

 

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक 03 व 05 ऑगस्ट रोजी हिंगोली, नांदेड व लातूर जिल्हयात तर दिनांक 04 ऑगस्ट रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा,

 

 

मेघगर्जना, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 01 ते 04 ऑगस्ट दरम्यान तूरळक ठिकाणी तर दिनांक 05 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

 

 

मराठवाडयात कमाल तापमानात पुढील चार ते पाच दिवसात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची तर पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात फारशी तफावत जाणवनार नाही.

 

एकनाथ खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत रंगेहाथ अटकेनंतर काय म्हणाले खडसें

 

गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी पावसाने उघडीप दिल्याचे दिसून येत आहे. त्यातच देशातील अनेक भागांत मुसळधार पाऊस होत आहे.

 

जिल्हा शल्यचिकित्सकासह तीन वरिष्ठ आरोग्य अधिकारी निलंबित

या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील सखल भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये नद्या वाहत आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे.

 

महायुतीत काहीतरी मोठं घडणार? कार बदलून शिंदे बड्या नेत्याच्या भेटीला

हवामान विभागाने पुन्हा एकदा अनेक राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद, रामपूर, बरेली, शाहजहानपूर, खेरी, पिलीभीत, बरिच्या, ए. श्रावस्ती, आझमगड, वाराणसी, मिर्झापूर, सोनभद्र, गाझीपूर, सहारनपुर, मेरठ, मुझफ्फरनगर, बिजनौर, बलिया,

 

 

मऊ, देवरिया, ज्योतिबा फुले नगर या जिल्ह्यांचा यात समावेश आहे. उत्तर प्रदेशातील 20 हून अधिक जिल्ह्यांत पाऊस होताना दिसत आहे. हवामान खात्याने उत्तर प्रदेशातील या जिल्ह्यांमध्ये रविवारी (दि.३) मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.

 

राज ठाकरेंनी कायदा सांगितला;गुजरातमध्ये परप्रांतीयाला शेतजमीन विकत घेता येत नाही

दरम्यान, राजस्थानमधील बहुतेक जिल्ह्यांना पावसापासून दिलासा मिळेल, असाही अंदाज आहे. हवामान विभागाने अलवर, भरतपूर, करौली, दौसा, धोलपूर येथे मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे. या काळात लोकांना सावध राहण्यास सांगण्यात आले आहे. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

 

 

बिहारमध्ये वीज पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. किशनगंज, पूर्णिया, कटिहार, भागलपूर, मुंगेर, बांका, सुपौल आणि मधुबनीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

24 तासांत कोठे कोठे पडणार विजांच्या कडकडाटासह पाऊस ?

याशिवाय पाटणा, बेगुसराय, मुंगेर, नालंदा, गया, नवादा, लखीसराय, जमुई, नवाडा, गया, शेखपुरा येथेही हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे. या जिल्ह्यांमध्ये वादळ आणि विजांच्या कडकडाटाची शक्यता आहे.

 

हवामान विभागाकडून विदर्भात रविवारी येलो अलर्ट जारी करण्यात आला. अनेक भागांमध्ये आज ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नागपूर, अकोला,

ट्रम्प यांच्या धमकींनंतर भारताने रशियाकडून खरंच इंधन खरेदी थांबवली?

अमरावती, गडचिरोली, गोंदिया, भंडारा, वाशिम या भागांमध्ये विजांच्या कडकडाटांसह पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यातील धरण क्षेत्रांमध्ये चांगला पाऊस होताना दिसत आहे. यामुळे धरणातील विसर्ग हा वाढवण्यात आला.

 

 

Related Articles