निवडणूक आयोगाची पोलखोल ;अखिलेश यादवांनी आयोगाला थेट पुरावेच दाखवले

Election Commission exposes; Akhilesh Yadav showed direct evidence to the Commission

bj admission
bj admission

 

 

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर केलेल्या मतचोरीच्या आरोपांनंतर राजकारण चांगलच तापलं आहे. तर निवडणूक आयोगानेदेखील पत्रकार परिषद घेत मतचोरीच पुरावे द्यावेत अन्यथा राहुल गांधी यांनी माफी मागावी, असा इशारा दिला आहे.

 

 

आयोगाच्या या इशाऱ्यानंतर समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुन्हा एकदा निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी परत दिली धमकी

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यांनी त्यांचा मोबाईलमधील काही पोचपावत्या दाखवत आपण निवडणूक आयोगाकडे प्रिंटआऊट घेऊन येत असल्याचे म्हटले आहे.

 

याशिवाय समाजवादी पक्षाने निवडणूक आयुक्तांना एक इमेल पाठवत उत्तर प्रदेशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये मतदारांची मते कापली जात असल्याची तक्रार दाखल केली आहे.

 

तक्रारीसोबत त्यांनी एक प्रतिज्ञापत्रही पाठवले आहे. राहुल गांधींच्या आरोपांनंतर समाजवादी पक्षानेही निवडणूक आयोगावर टीका करत आयोगावर गंभीर आरोप केले आहेत.

राहुल गांधी निवडणूक आयोगावर टाकणार ५ ऑगस्ट रोजी ॲटमबॉम्ब

याशिवाय अखिलेश यादव यांनी त्यांच्या ट्विटर एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. “समाजवादी पक्षने दिलेले प्रतिज्ञापत्र आम्हाला मिळाले नसल्याचा आरोप निवडणूक आयोगाने केला आहे.

 

पण त्यांनी आमच्या प्रतिज्ञापत्राच्या पावतीचा पुरावा म्हणून दिलेली त्यांच्या कार्यालयाची पावतीही पाहावी, आमची मागणी आहे की, निवडणूक आयोगाने आम्हाला पाठवलेली डिजिटल पावती बरोबर असल्याचे प्रतिज्ञापत्र द्यावे,

 

अन्यथा ‘निवडणूक आयोगा’सोबत ‘डिजिटल इंडिया’ देखील संशयाच्या भोवऱ्यात येईल.” त्याचवेळी त्यांनी पोस्टमध्ये आयोगाकडून मिळालेल्या काही पोचपावत्यांच्या स्क्रिनशॉटही जोडला आहे.

 

महिन्याभरात महाराष्ट्र नव्या राजकीय भूकंपाच्या उंबरठ्यावर?

यासोबतच अखिलेश म्हणाले की, ‘आमची मागणी अशी आहे की जातीच्या आधारावर बीएलओ नियुक्त करू नका, उत्तर प्रदेशचा डेटा मिळवा, ज्या अधिकाऱ्याच्या अंतर्गत निवडणूक घेतली जाते त्या अधिकाऱ्यामध्ये एकही पीडीए अधिकारी असेल तर मला सांगा.

 

 

भाजप सरकार आल्यापासून, तक्रारीवरून एकाही अधिकाऱ्याला काढून टाकले गेले असेल तर मला सांगा, याचा अर्थ निवडणूक आयोग भाजपचे जास्त ऐकतो.

पहा;VIDEO उत्तरकाशीत मोठी दुर्घटना; भयंकर ढगफुटी, गावावर कहर सर्व काही उदध्वस्त,शेकडो मृत्यूची भीती

“जर मते मिळवण्याची प्रक्रिया असेल तर मते रद्द करण्याची देखील प्रक्रिया आहे, आमची मागणी अशी आहे की एका जिल्हा दंडाधिकाऱ्याला निलंबित करा आणि संपूर्ण देशात एकही मत रद्द होणार नाही.

 

जर २०१९, २२, २४ मध्ये एकाही अधिकाऱ्याला काढून टाकण्यात आले असेल तर मला सांगा. अखिलेश म्हणाले की त्यांनी जाणूनबुजून मागासवर्गीयांची मते कापली आहेत, बिंद, मौर्य, पाल, राठोड समुदाय हे सर्व यामध्ये समाविष्ट आहेत

 

आणि ते दाखवतात की त्यांना मागासवर्गीयांची मते मिळत आहेत. त्यांनी मागासवर्गीयांची मते यादीतून कापली आणि तुम्ही निवडणूक जिंकता. सत्य हे आहे की त्यांची मते वगळली जात आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्षाच्या विधानाने शिंदे गटात खळबळ

निवडणूक आयोगाने काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांचे आरोप धुडकावून लावतएकतर त्यांनी ७ दिवसांच्या आत प्रतिज्ञापत्र द्यावे किंवा देशाची माफी मागावी,असा इशारा दिला आहे.

 

त्यानंतर आता काँग्रेससह, समाजवादी पक्ष, तृणमूल काँग्रेस, राजद, आम आदमी पक्ष आणि सीपीएम यांनीही निवडणूक आयोगासमोर प्रश्न उपस्थित करत आयोगाची कोंडी केली आहे.

 

राहुल गांधी म्हणाले लोकसभा निवडणुकीतील ‘हेराफेरी’ सिद्ध करू

कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेते गौरव गोगोई म्हणाले की, मतदानाचा अधिकार सर्वात महत्वाचा आहे. भारतातील अनेक राजकीय पक्षांकडून निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले जात आहेत.

 

 

पण आयोग त्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही. ते आपल्या जबाबदारीपासून पळवाटा काढत आहे. काल निवडणूक आयोगाने घेतलेली पत्रकार परिषद घेतली. तिथे त्यांना विरोधकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यायची होती, पम तेच उलट प्रश्न उपस्थित विरोधकांवर टीका करत होते.

 

भाजप प्रदेशाध्यक्षाच्या विधानाने शिंदे गटात खळबळ

निवडणूक आयोगाकडे मतदान केंद्रातील सीसीटीव्हीचे फुटेज मागितले गेले पण मतदान केंद्रांच्या सीसीटीव्ही फुटेज देण्याबाबत आयोग पूर्णपणे मौन आहे.

 

१ लाख बनावट मतदारांच्या मुद्द्यावरही आयोगाने कोणतेही उत्तर दिले नाही. हे गोपनीयतेचे उल्लंघन कसे असू शकते, हे निवडणूक आयोगाने स्पष्ट करावे. निवडणूक आयोगावर दबाव आहे.

१५ ऑगस्ट स्वतंत्रदिनी तुमच्या जिल्ह्यातील ध्वजारोहण मंत्री करणार ,सरकारकडून यादी जाहीर

बिहारमध्ये घाईघाईने एसआयआर प्रक्रिया का केली जातेय. निवडणूक आयोग उत्तर देण्यापासून पळ काढत आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाचे सर्व विधान फेटाळून लावले आहे. विरोधकांच्या वैध प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी निवडणून आयुक्तांनी राजकीय पक्षांवर हल्लाबोल केला.

 

बिहारचा एसआयआर, महाराष्ट्र लोकसभा विधानसभा निवडणुकीदरम्यान मतदारांची अचानक वाढलेली संख्या, डिजिटल यादी, सीसीटीव्ही फुटेज यासारख्या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर निवडणूक आयोग मौन राहिला.

 

मुंबई विमानतळावर एक मोठा अपघात टळला. इंडिगोचे विमान लँडिंगवेळी मागचा भाग आदळला

हे स्पष्ट आहे की निवडणूक आयोग काही राजकीय पक्षांसाठी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आहे. अधिकारी येतील आणि जातील,

 

आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवू. आम्ही योग्य वेळी योग्य पावले उचलू. हे स्पष्ट आहे की निवडणूक आयोग अशा अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आहे जे काही राजकीय पक्षासाठी काम करतात. अधिकारी येतील आणि जातील, आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवू, आम्ही योग्य वेळी योग्य कारवाई करू.

 

डोनाल्ड ट्रम्प यांनी परत दिली धमकी

समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले. आयोग वारंवार प्रतिज्ञापत्राद्वारे तक्रार द्यावी असे सांगतो; मात्र त्यावर कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही.

 

अखिलेश यादव यांनी २०२२ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्र दिले होते की सपा समर्थकांची मते मोठ्या प्रमाणात कापली जात आहेत. त्यावेळी १८ हजार मतदारांचे प्रतिज्ञापत्र देण्यात आले होते. तरीसुद्धा आजपर्यंत एकाही प्रतिज्ञापत्रावर कारवाई झालेली नाही.”

 

शिंदेंच्या मंत्र्यांकडून 5 हजार कोटींचा भ्रष्टाचार, रोहित पवारांच्या आरोपाने खळबळ

यादव यांनी २०२४ च्या विधानसभा पोटनिवडणुकीतील अनियमिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, त्या वेळी बीएलओ बदलण्यात आला आणि यादव तसेच मुस्लिम मतदारांची नावे मतदारयादीतून वगळण्यात आली.

 

याबाबत कोणतीही चौकशी किंवा कारवाई झालेली नाही. मैनपुरी पोटनिवडणुकीत एकाच समुदायाचे एसडीओ, सीओ आणि अधिकारी तैनात करण्यात आले होते.

 

हे सर्व मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या समुदायातील असल्याचा आरोप करत त्यांनी सांगितले की, याबाबत लेखी तक्रार करण्यात आली होती, परंतु निवडणूक आयोगाने दुर्लक्ष केले.

नांदेडमध्ये पावसाचा हाहाकार,मराठवाड्यात 6 जणांचा मृत्यू,मुंबईत पावसाचा जोर,शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर

राम गोपाल यादव यांनी आयोगावर आणखी आरोप करताना म्हटले की, “उत्तर प्रदेशमध्ये मत कापण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. निवडणूक आयोग आमच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करत आहे. दिल्लीतसुद्धा मोठ्या प्रमाणावर हेराफेरी झाली आहे. आयोगाने तथ्यांशिवाय तक्रार दाखल केल्याचे म्हटले आहे, परंतु ते खरे नाही.”

 

राजदचे खासदार मनोज झा म्हणाले की, ”आमची उपस्थिती आमच्याच निवडणूक आयोगाविरुद्ध आहे. तुम्ही असे चित्र कधीही पाहिले नसेल. काल निवडणूक आयुक्त एखाद्याचे विचार आणि हेतू सार्वजनिक ठिकाणी मांडत असताना आमचे प्रश्न स्पष्ट करत नव्हते.

सावधान,राज्यातील 16 जिल्ह्यांना रेड अलर्ट!‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा

निवडणूक आयोग हा संविधानाचा समानार्थी शब्द नाही, ते पंतप्रधान मोदींसारखे बोलत होते, पंतप्रधानांना प्रश्न विचारणे हा देशाचा अपमान नाही. तुम्ही संविधानातून जन्माला आला आहात.

 

सत्ताधारी पक्ष किंवा विरोधी पक्ष नाही, सर्वजण समान आहेत. हे सांगणे सोपे आहे पण पाहणे कठीण आहे. काल आम्हाला मुख्य निवडणूक आयुक्तांच्या जागी भाजपचा एक नवीन प्रवक्ता मिळाला.

 

 

Related Articles