मनोज जरांगे पाटलांचे भाजप महिला नेत्यासोबत जुंपली ;म्हणाले तू माझ्या माझ्या नादी…

Manoj Jarange Patil's relationship with a BJP woman leader; he said, "You are my mother..."

 

 

 

मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील हे 27 ऑगस्टला मुंबईकडे कूच करणार आहेत. मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी ते मुंबईत जाऊन आंदोलन करणार आहेत.

मत चोरी आणि ईव्हीएमच्या मुद्यावरून काय म्हणाले अजित पवार ?

 

अशातच भाजपच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी जरांगे पाटलांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आईचा अपमान केला असल्याचा आरोप केला आहे. यावर आता जरांगे पाटलांनी उत्तर दिलं आहे. त्यांनी काय म्हटलं ते जाणून घेऊयात.

 

 

मनोज जरांगे म्हणाले की, ;वाघ आणि शेळी मला काही माहीत नाही, आमच्या आई बहिणीवर दगडफेक केली तेव्हा ही कुठे गेली होती, आणि ही कोण आहे? तू कुण्या राजकारण्याच्या नादी लागशील पण माझ्या नादी लागू नको मी सगळं बिऱ्हाड उठविल; असा इशारा जरांगे पाटील यांनी चित्रा वाघ यांना दिला आहे

 

मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा,मराठा आरक्षणाची ही शेवटची लढाई

पुढे बोलताना जरांगे पाटलांनी म्हटले की, ‘देवेंद्र फडणवीस यांनी आता बाया पुढे घालायचं ठरविल्याचे दिसत आहे. फडणवीस यांनी बाईच्या पदराआड लपू नये. तुझ्या आईवर बोललो इतकं लागलं,

 

 

परंतु आमच्या आईचे डोके फोडले तेव्हा कुठे गेलता तू? राजकीय स्वार्थासाठी आईला पुढे घालायला लागला’ असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

 

पंतप्रधान मोदींच्या पदवीबाबत दिल्ली उच्च न्यायायलाने दिले आदेश

मुंबईला जाण्याबाबत बोलतान जरांगे पाटील म्हणाले की, ‘आम्ही 27 तारखेला आंतरवाली सराटी मधून बाहेर पडणार असून पैठण-शेवगाव-पांढरीपूल-अहिल्यानगर-आळेफाटा आणि त्यानंतर रात्रीचा मुक्काम शिवनेरी किल्ल्यावर असणार आहे.

 

26 तारखेच्या आत अंमलबजावणी केली तर ठीक आहे अन्यथा एकदा अंतरवाली सराटी सोडली तर नंतर चर्चा करणार नाही. थेट मुंबईमध्ये गेल्यावर चर्चा करू’ अशा इशारा मनोज जरांगे पाटलांनी दिला आहे.

 

 

जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, ‘सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाहीये, फक्त त्यांना काहीतरी कुरापती उकरून काढायच्या आहेत. जशी आज फडणवीस यांनी काहीतरी उकरून काढली.

 

गोरक्षणाच्या नावाखाली राज्यात मोठी लॉबी सुरू

आरक्षण द्यायची वेळ आली तर आता आईला पुढे करत आहे. त्यांच्या आईला काही शब्द बोललो असेल तर ते मी ते विधान मागे घेतलेले आहे. मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, मुंबईत येऊ द्यायचं नाही.’

 

 

‘खोटं बोलून मतदान घ्यायचं पण शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही. शेवटी अंगावर आलं तर रळीचा डाव खेळायचा, की माझ्या आईला बोलले. आरक्षण द्यायचं जीवावर आलं आहे तर आईकडे आणि बापाकडे घेऊन जात आहे.

प्रभागरचनेवरुन महायुतीत वादाची ठिणगी

तुम्ही आरक्षण कसं देत नाही पाहतो मी. मी घेणारच आहे आरक्षण’ असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.

 

 

Related Articles