जरांगेंचे टार्गेट फडणवीस, शिंदे मात्र गप्प
Fadnavis is the target of Jarange, but Shinde remains silent

गणेशोत्सव आणि मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांची एक गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे.
प्रभागरचनेवरुन महायुतीत वादाची ठिणगी
मनोज जरांगे यांच्या आंदोलनाविषयी शिवसेनेच्या मंत्र्यांनी माध्यमांसमोर कोणतंही वक्तव्य करु नये अशी सक्त ताकीद एकनाथ शिंदे यांनी या बैठकीत दिली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बोलताना महायुती बाबत समन्वय साधून बोलणं अपेक्षित असल्याचं देखील बैठकीमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी परत दिली धमकी
तसेच गणेशोत्सव काळामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा, गाव तिथे शाखा, घर तिथे शिवसैनिक या व्याख्येनुसार पक्षावाढीसाठी प्रयत्न करा असे निर्देश शिंदेंनी त्यांच्या मंत्र्याना दिले आहेत.
मराठा आरक्षणाचं वादळ घोंगावत असताना, मनोज जरांगे यांना मुंबईत येण्यापासून रोखण्यासाठी भाजप नेते प्रयत्नशील आहेत.
प्रभागरचनेवरुन महायुतीत वादाची ठिणगी
संधी मिळेल त्यावेळी भाजपकडून मनोज जरांगे यांच्यावर टीका केली जात आहे. त्याचवेळी एकनाथ शिंदे वा शिवसेनेच्या मंत्र्यांनी या मुद्द्यावर मात्र मौन बाळगल्याचं दिसून येतंय.
मराठा आरक्षणासाठी पुन्हा एल्गार करत मुंबईला धडक देण्याची तयारी मनोज जरांगे पाटलांनी केली आहे.
मनोज जरांगे पाटलांचे भाजप महिला नेत्यासोबत जुंपली ;म्हणाले तू माझ्या माझ्या नादी…
जरांगेंच्या टार्गेटवर आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. एकनाथ शिंदे मराठ्यांना आरक्षण द्यायला तयार होते,
पण देवेंद्र फडणवीसांनी आडकाठी आणली, असा आरोप जरांगेंनी केला आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी गेल्या आठ महिन्यात मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार केला नाही. यावरून त्यावेळीही फडणवीसांनीच काम रोखल्याचा आरोप जरांगेंनी केला.
उत्तर प्रदेशात भाजपचा सहयोगी पक्ष सोडणार
मनोज जरांगे हे मुख्यमंत्री फडणवीसांवर सातत्यानं हल्लाबोल करत असताना एकनाथ शिंदेंनी मात्र यावर मौन बाळगलं आहे.
त्यातच त्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना माध्यमांवर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये अशा सूचना केल्या आहेत.
परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना
एकीकडे मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीसांच्याबद्दल अपशब्द वापरल्यानंतर भाजप नेत्यांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू केला.
त्याचवेळी दुसरीकडे शिंदेंचे मंत्री शंभुराज देसाई मात्र जरांगेंच्या मदतीला धावून आल्याचं दिसतंय. मराठवाड्याची बोलण्याची शैली तशी आहे.
मनोज जरांगे पाटलांचे भाजप महिला नेत्यासोबत जुंपली ;म्हणाले तू माझ्या माझ्या नादी…
ज्यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या लक्षात आलं आपल्या तोंडून चुकीचा शब्द गेला, तेव्हा त्यांनी तो शब्द मागे घेतला असं शंभुराज देसाई म्हणाले.
आपण मराठा समन्वय समितीचा सदस्य असल्याचं शंभुराज देसाई म्हणाले. त्यामुळे राज्य सरकार
चोवीस तासातच त्या 364 सहाय्यक पोलीस निरीक्षकांवर कोसळला दुःखाचा डोंगर
आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये मध्यस्ती करण्याची जबाबदारी जर आपल्याला दिली तर ती पार पाडू असा विश्वासही शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला.
एकीकडे मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलक मुंबईच्या दिशेने निघण्याच्या तयारीत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मात्र त्यांच्या मूळगावी जाणार आहेत. एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावी जाणार असून त्या ठिकाणी गणपतीची प्रतिष्ठापणा करणार असल्याची माहिती आहे.
मनोज जरांगे हे 29 ऑगस्ट रोजी मुंबईत आंदोलन करणार आहेत. त्यासाठी बुधवारी, 27 ऑगस्ट रोजी ते अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणार आहेत. त्याचेवळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गणेशोत्सवासाठी दरे या त्यांच्या मूळ गावी जाणार आहेत.
यंदा मुक्तगिरी बंगल्यावर आणि ठाण्यातील लुईसवाडी इथे गणपतीची प्रतिष्ठापना होणार नाही. मुक्तगिरी हे एकनाथ शिंदे यांचे स्वतःचे शासकीय निवासस्थान नाही.
तसेच लूईसवाडी इथे गणपतीला पाच वर्ष पूर्ण झाल्याने त्या ठिकाणी आता गणपतीची स्थापना करण्यात येणार नाही. त्यामुळे शिंदे यंदा दरे गावी पारंपरिक पद्धतीने गणपतीची प्रतिष्ठापना करणार आहेत.
काही झालं तरी मुंबईत येण्याचा निर्धार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केला आहे. जरांगेंची समजूत काढण्यासाठी फडणवीस सरकारची धावपळ सुरू आहे.
जरांगेंनी 28 तारखेला मुंबईत धडक देण्याचा निश्चय केला आहे. जरांगेंचं भगवं वादळ मुंबईत असताना त्याला तोंड देण्यासाठी शिंदे नसतील.
मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं असताना शिंदेंनी आजपर्यंत त्यावर मौन बाळगल्याचं दिसून येतंय. मुख्यमंत्री असताना जरांगेंची आंदोलनं हाताळण्याचा अनुभव असताना शिंदे आता गप्प का आहेत, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मनोज जरांगेंनी अंतरवाली सोडण्यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे दूत तिथे पोहोचले. मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक राजेंद्र साबळेंनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेतली.
गणेशोत्सवाच्या काळात मोर्चा नको, तो पुढे ढकलण्यात यावा अशी विनंती साबळेंनी जरांगेंना केली. मात्र जरांगेंनी फडणवीसांच्या दूताची ही मागणी धुडकावून लावली. आम्ही मोर्चाची आधीच घोषणा केलीय, तेव्हा सरकारनं का दखल घेतली नाही असा सवाल जरांगेंनी उपस्थित केला.
मुंबईत गणपती घेऊन धडकणारच, असा निर्धार व्यक्त करणाऱ्या मनोज जरांगेंना मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे मोठा झटका बसला आहे. गणपतीच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न महत्त्वाचा असल्यानं, मनोज जरांगेंना मुंबईत आंदोलन करता येणार नाही असे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत.
मुंबईलगतच्या नवी मुंबईमध्ये आंदोलनाला परवानगी देण्याबाबत सरकार विचार करू शकतं असं मत सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयानं मांडलं. अनिश्चित काळासाठी सार्वजनिक जागा अडवल्या जाऊ शकत नाहीत अशी महत्त्वाची टिपण्णी देखील उच्च न्यायालयानं केली.








