मनोज जरांगे पाटलांचे मुंबईत आंदोलन ; रोहित पवारांचा गंभीर आरोप

Manoj Jarange Patil's protest in Mumbai; Rohit Pawar's serious allegations

 

 

मराठा आरक्षणासाठी जोरदार शक्तीप्रदर्शन करणारे मनोज जरांगे पाटील आज (२९ ऑगस्ट) सकाळी मुंबईत दाखल झाले.

निनावी पक्षांना ४,३०० कोटी रुपयांच्या देणग्या,राहुल गांधींचा निवडणूक आयोगाला सवाल

मुंबईत शेकडो गाड्यांचा ताफा आणि लाखो मराठा आंदोलक जमले असून सीएसएमटी परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

 

मनोज जरांगे पाटील आझाद मैदानात आंदोलन करणार आहेत. याच दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

 

भारतातील पहिले AI गाव,महाराष्ट्रात
आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल.

 

 

आंदोलनस्थळी आंदोलकांना सुविधा उपलब्ध करून द्यायच्या असतात आणि हेच लोकशाहीचे खरे तत्व आहे, परंतु राज्य सरकार आंदोलकांची गैरसोय कशी होईल याचे नियोजन करत असेल तर ते हुकुमशाहीचे लक्षण म्हणावे लागेल.

आता मराठा आरक्षणाच्या विरोधासाठी OBC चे उपोषण

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खाऊगल्ल्या बंद ठेवण्याचे अलिखित फतवे गृहविभागाने काढल्याचे समोर येत आहे. खाऊगल्ल्यांना बंद ठेवण्यामागे गृहविभगाचा हेतू काय?

 

मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असेल तर उलट खाऊगल्ल्या सुरु ठेवायला हव्यात. गृहविभागाने आपले अलिखित फतवे मागे घेऊन तत्काळ खाऊगल्ल्या सुरु करण्यासंदर्भात सूचना कराव्यात.

ट्रम्प यांचा नवा दावा;भारत-पाकिस्तानने एकमेकांची ७ विमाने पाडली

तसेच आंदोलकांची मोठ्या प्रमाणात असलेली संख्या बघता आझाद मैदानावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे यासारख्या कोणत्याच मुलभूत सुविधा सरकारने उपलब्ध करुन दिलेल्या नाहीत, त्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात.

 

या-ना त्या मार्गाने दगाफटका करण्याचा डाव सरकार आखत असेल तर सरकार मोठी चूक करत आहे, हे गृहमंत्र्यांनी विसरू नये. गृहमंत्री हुशार आहेत, सरकारकडून दुसऱ्यांदा चूक होऊ देणार नाहीत, ही अपेक्षा!

उपमुख्यमंत्री अजित पवारांवर कांद्याने हल्याचा प्रयत्न ,दोघांना अटक

आझाद मैदानात आंदोलन करण्यासाठी मनोज जरांगेंना एका वेळी एकाच दिवसाची परवानगी मिळालीय. शनिवारी, रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी परवानगी मिळणार नसल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय.

 

त्यामुळे आज एकच दिवस जरांगेंना आझाद मैदानात आंदोलन करावं लागणार आहे. एका दिवसात आंदोलन कसं करणार, असा सवाल जरांगेंनी सरकारला केलाय.

दहावीची परीक्षा होणार फेब्रुवारीत

आणखी काही दिवसांची परवानगी मागणार असल्याचं सांगितलं जातंय. पण तशी परवानगी मिळाली तरी परवा शनिवार असल्यानं नियमानुसार जरांगेंना आजनंतर सलग आंदोलन करता येणार नाही. त्यामुळे शनिवारी, रविवारी जरांगेंचा मुक्काम कुठे असणार हा प्रश्न आहे.

 

 

 

Related Articles