मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आव्हान देण्याची तयारी , हालचालींना वेग

Preparations to challenge Maratha reservation decision, movement accelerates

 

 

राज्य सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांच्या मराठा आरक्षणाबाबतच्या मागण्या मान्य केल्या आहेत. त्यामुळे आता आगामी काळात मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

मात्र सरकारच्या या निर्णयावर ओबीसी समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. काही नेत्यांनी कोर्टात जाण्याची तयारी दर्शविली आहे. अशातच आता ओबीसी समाजातील नेत्यांनी आता एक मोठा निर्णय घेतला आहे.

‘ईद -ए-मिलादुन नबी’च्या सुट्टीत बदल 5 सप्टेंबर 2025 ऐवजी सोमवारी 8 सप्टेंबरला

समोर आलेल्या माहितीनुसार विदर्भातील नेत्यांनी उद्या नागपूरात महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राजकीय नेते, ओबीसी कार्यकर्ते आणि वकिल महासंघाच्या सदस्य उपस्थित राहणार आहेत.

 

नागपूरच्या रवी भवनात आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला विजय वडेट्टीवार, सुधाकर अडबोले, किशोर लांबट हे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत ओबीसी आंदोलनाची पुढची दिशा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा

मुधोजी राजे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत मराठा आरक्षणाबाबत चर्चा केली आहे. या निवेदनात मराठ्यांना मराठा म्हणून आरक्षण द्या,

 

ओबीसीतून आरक्षण देऊन हा प्रश्न सुटणार नाही असं मुधोजीराजे यांनी म्हटलं आहे. या निवेदनात नेमकं काय आहे ते जाणून घेऊयात.

काँग्रेस आमदाराचा फडणवीस सरकारला गर्भित इशारा

मुधोजीराजेंनी आपल्या निवेदनात म्हटले की, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने नुकतेचं मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईच्या आझाद मैदानांवर आंदोलन झाले.

 

बात मराठ्यांना काय मिळालं? मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला माझा पांठिबा आहे. परंतु त्यांनी जी मागणी केली की मराठ्यांना OBC तून आरक्षण द्या.

महाराष्ट्राच्या हद्दीत घुसखोरी करुन जहाजांवरुन मच्छीमारी

या मागणीतून मराठ्यांना काय साध्य झालं? कारण मराठवाडाच्या काही जिल्ह्यात 58 लाख कुणबी नोंदी सापडल्या त्यात अर्थातचं काही त्रुट्या आहेत.

 

परंतु ज्यांच्या नोंदी आहेत त्यांना लाभ नक्कीचं मिळावा. कागदपत्राची पूर्तता करण्यात या लाभाचा टक्का निश्चितच घसरणार यात मात्र शंका नाही.

पाकिस्तानमध्ये संशयास्पद हालचाली ,अमेरिकन हवाई दलाचे C-17 विमान पाकिस्तानच्या एअरबेसवर

उर्वरित अंदाजे 2.50 करोड मराठ्याचं काय आहे? असा प्रश्न मराठ्यांना सतावतो आहे. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने माझे व्यक्तिगत मत आहे की, मराठ्यांना मराठा म्हणूनचं सरसकट आरक्षण मिळावे जेणेकरून हा पेच निर्माण होणार नाही.

 

संपूर्ण महाराष्ट्रातील मराठ्यांना मराठा म्हणूनचं “मराठा आरक्षणाचा” फायदा होईल. मराठ्यांना मराठा म्हणूनचं सरसकट आरक्षण कृपया द्यावे.

चोरट्याने चक्क लाल किल्ल्यातुन 1 कोटीच्या कलशावर हात मारला

जेणेकरून 58 लाख कुणबी नोंदीवाले मराठे + उर्वरित 2.50 करोड मराठ्यांना ‘मराठा आरक्षणाचा’ फायदा होईल. माझी या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला एक विनंती आहे की, मराठ्याचं नुकसान कृपया हो देऊ नका !

 

 

Related Articles