आता थेट करा मोबाईलवरून करा आधार कार्ड अपडेट

Now update your Aadhaar card directly from your mobile.

 

 

केंद्र सरकार आधार कार्ड धारकांसाठी नवीन मोबाईल ॲप्लिकेशन आणण्याच्या तयारीत आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण(UIDAI) या मोबाईल ॲपची तयारी करत आहे.

शेतात नुकसानीचा पंचनामा सुरू असतानाच शेतकऱ्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

या ऑल इन ॲपमध्ये नागरिकांना त्यांची वैयक्तिक माहिती सहज आणि झटपट अद्ययावत करता येईल. त्यासाठी त्यांना आधार सेवा केंद्रावर जाण्याची गरज उरणार नाही.

 

आधार कार्डधारकांना त्यांचे नाव, पत्ता, जन्मतारीख आणि इतर माहिती आता या मोबाईल ॲपच्या मदतीने तात्काळ अपडेट करता येईल. मोबाईल ॲप एकाच डिजिटल इंटरफेसद्वारे आधार माहिती अपडेट करण्यासाठी एक सुलभ आणि सोयीस्कर प्लॅटफॉर्म तयार करुन देईल.

 

विद्यापीठाने घेतला नॅक नसलेल्या महाविद्यालयाबाबत मोठा निर्णय

सरकारी सूत्रानुसार, मोबाईल ईआधार ॲप्लिकेशन हे या वर्षाच्या अखेरीस येईल आणि त्याचा आधार कार्डधारकांना वापर करता येईल. आधार कार्डधारकांना त्यांचे नाव,

 

पत्ता, जन्मतारीख आणि इतर माहिती आता या मोबाईल ॲपच्या मदतीने तात्काळ अपडेट करता येईल. त्यामुळे त्यांना वारंवार छोट्या छोट्या गोष्टीसाठी आधार सेवा केंद्रावर जाण्याची गरज उरणार नाही.

नवीन आधार मोबाईल ॲप्लिकेशन हे युझर्सला त्याची वैयक्तिक माहिती अपेडट करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. त्यांना यामध्ये त्यांची जन्मतारीख, त्याचे नाव आणि इतर माहिती अपडेट करता येईल.

मराठा आरक्षणाच्या नव्या GR विरोधातील जनहित याचिकेबाबत काय म्हणाले छगन भुजबळ ?

त्यांच्या स्मार्टफोनवर हे ॲप त्यांना वर्षाअखेरीस डाऊनलोड करता येईल. यामुळे आधार सेवा केंद्रावरील नागरिकांची गर्दी कमी करण्याचा एक यशस्वी प्रयोग ठरेल, असा दावा करण्यात येत आहे.

 

कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून फेस आयडी तंत्रज्ञानाआधारे हे ॲप नागरिकांना सुरक्षित आणि सहजसोप्या पद्धतीने डिजिटल आधार सेवा पुरवेल. देशभरातील नागरिकांना त्यांच्या स्मार्टफोनवरील आधारच्या ऑल इन ॲपच्या माध्यमातून त्यांची वैयक्तिक माहिती सहज अपडेट करता येईल.

आमदाराच्या कारची युवकाला धडक,जखमी तरुण गेला कोमात

आधार कार्ड अपडेट ॲपची सेवा सुरू करण्यासाठी स्मार्टफोन युझर्सला अगोदर आधार सेवा केंद्रावर जावे लागेल. नोव्हेंबरपासून त्यांना या सेवेचा लाभ घेण्यासाठी आणि

 

ॲपची सेवा मिळवण्यासाठी त्यांना बायोमॅट्रिक पडताळणी करावी लागेल. त्यांना त्यांचे फिंगरप्रिंट आणि iris स्कॅनिंग करण्यात येईल. माहिती अपडेट करणे सहज आणि सुलभ व्हावे यासाठी हे नवीन ॲप लाँच करण्यात येणार आहे.

 

 

 

Related Articles