लाडक्या बहिणींना 10 हजार
10 thousand to my beloved sisters

महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण’ योजना लोकप्रिय ठरली असताना, आता बिहार सरकारने महिलांसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना जाहीर केली आहे.
मराठवाड्यात पावसाचा हाहाकार; हेलिकॉप्टरने लोकांना बाहेर काढले
‘मुख्यमंत्री महिला रोजगार योजना’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या नव्या उपक्रमाद्वारे राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा उद्देश आहे.
या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 75 लाख महिलांना प्रत्येकी 10,000 रुपयांची थेट आर्थिक मदत दिली जाणार आहे. विशेष म्हणजे, या आर्थिक सहाय्याचा पहिला हफ्ता आज (26 सप्टेंबर 2025) त्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे.
एकनाथ शिंदे यांचे X अकाऊंट हॅक, पाकिस्तान-तुर्किचे झेंडे
या कार्यक्रमानिमित्त, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री नितीश कुमार या दोघांचा महिलांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे थेट संवाद होणार आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये महिला थेट हा संवाद ऐकू शकतील. मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेचा मुख्य हेतू म्हणजे राज्यातील महिलांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना दीर्घकालीन रोजगार निर्माण करण्यास मदत करणे, हा आहे.
राज्यसभेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर
या योजनेसाठी आतापर्यंत 1 कोटी 11 लाख महिलांनी अर्ज दाखल केले आहेत. यापैकी, पात्र ठरलेल्या 75 लाख महिलांना पहिल्या टप्प्यात आर्थिक मदतीचा लाभ देण्यासाठी संपूर्ण तयारी पूर्ण करण्यात आली आहे.
या योजनेचा उद्देश फक्त तात्पुरती मदत देण्यापुरता मर्यादित नाही. पहिल्या हफ्त्यानंतर, महिलांनी रोजगारासाठी घेतलेली पुढील पावले, त्यांची तयारी आणि उपक्रमांचा आढावा घेतल्यानंतर 2 लाख रुपयांची अतिरिक्त मदत दिली जाणार आहे.
या मदतीचा उपयोग महिला शेती, पशुपालन, शिलाई मशीन खरेदी, किंवा इतर लघुउद्योग सुरू करण्यासाठी करू शकतील. यामुळे महिलांना आपल्या पायावर उभं राहता येईल.
युवा नेते अब्दुल वाजेद पठाण यांचा कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश
या योजनेत सहभागी होण्यासाठी काही आवश्यक निकष निश्चित करण्यात आले आहेत. लाभार्थी महिलेने जीविका स्वयं सहायता समुहासोबत जोडलं जावं.
या समूहला जोडल्यानंतरच महिला मुख्यमंत्री महिला रोजगार योजनासाठी अर्ज करु शकणार आहेत. ही प्रक्रिया पूर्णपणे निशुल्क असणार आहे. या योजनेत अर्ज करण्यासाठी सरकार किंवा अधिकाऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.
राहुल गांधींच्या दणक्याने निवडणूक आयोगाची झिंग उतरली ;घेतला मोठा निर्णय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी राष्ट्रीय जनता दलावर टीका केली. राजदची सत्ता असताना बिहारमध्ये भ्रष्टाचार खूप होता, असं म्हटलं.
यावेळी मुख्यमंत्री महिला रोजगार योजनेनुसार बिहारच्या 75 लाख महिलांच्या खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपयांची रक्कम पाठवण्यात आली. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार देखील उपस्थित होते.
नरेंद्र मोदी म्हणाले, नवरात्रीच्या या पवित्र दिवसांमध्ये मला बिहारच्या महिला शक्तीसह त्यांच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मिळाली.
पाहा VIDEO;समीर वानखेडेंची ‘बॅड्स ऑफ बॉलीवूड’ वर २ कोटींचा मानहानीचा दावा
नवरात्रीच्या पवित्र पर्वात तुम्हा सर्वांचा आशीर्वाद आमच्या सर्वांसाठी एक मोठी शक्ती आहे. मी तुमचे मनापासून आभार मानतो, असं नरेंद्र मोदी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की आजपासून मुख्यमंत्री महिला रोजगार योजना सुरु केली आहे. या योजनेशी आतापर्यंत 75 लाख महिला जोडल्या गेल्या आहेत.
राज्यसभेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर
आता एकत्रितपणे 75 लाख महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी 10 हजार रुपये पाठवण्यात आले आहेत. जेव्हा ही प्रक्रिया सुरु होती तेव्हा मी विचार केला की नितीश कुमार यांच्या सरकारनं बिहारमध्ये बहिणी
आणि मुलींसाठी किती मोठं आणि महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. जेव्हा कोणतीही बहीण किंवा मुलगी रोजगार किंवा स्वंयरोजगार करते तेव्हा त्यांच्या स्वप्नांना नव बळ मिळतं, समाजात त्यांचा सन्मान वाढतो.
गडकरींच्या पापाचा घडा;,टोलमधून मिळालेला पैसा IDL कंपनीमार्फत थेट गडकरींच्या दोन्ही मुलांच्या कंपनीला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी राजदवर टीका केली. राजदच्या काळात कोणीही घरी सुरक्षित नसायचं. सर्वाधिक त्रास महिलांनी सहन केला आहे. महिलांनी राजदच्या नेत्यांचे अत्याचार पाहिले आहेत.
मात्र, नितीशकुमार यांच्या सरकारच्या काळात महिला निर्भीडपणे फिरत आहेत. आम्ही महिलांना वाचवण्यासाठी उज्ज्वला योजना घेऊन आलोय, असं मोदींनी म्हटलं.
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या;उद्धव ठाकरे
जेव्हा कोणतही सरकार महिलांसाठी केंद्रात धोरण ठरवतं तेव्हा त्याचा फायदा समाजाच्या दुसऱ्या घटकाला देखील होतो. उज्ज्वला योजनेमुळं किती बदल घडून आला आहे.
आज पूर्ण जग पाहत आहे. स्वस्थ महिला, सशक्त परिवार अभियान सुरु केलंय. या अभियानाद्वारे सव्वा चार लाखांहून अधिक आरोग्य शिबिरांचं गावोगावी आयोजन केलं जात आगे. कमी रक्त असणं, बीपी, मधुमेह आणि कॅन्सर सारख्या गंभीर उपचारांची तपासणी केली जातेय, असं मोदी म्हणाले.
थेट भाजप नेत्याच्याच घरी ईडीचा छापा
दरम्यान, येत्या काही दिवसांमध्ये बिहारमध्ये विधानसभा निवडणूक जाहीर होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत एनडीए विरुद्ध महागठबंधन असा सामना असेल.








