.25 लाखांची लाच घेताना मनपा उपायुक्ताला रंगेहात अटक
Municipal Deputy Commissioner arrested red-handed while accepting bribe of Rs. 25 lakhs

ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण आणि निष्कासन विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या छाप्यात अटक करण्यात आली. त्यामुळे पालिका अधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
एकीकडे शहरातील अनधिकृत बांधकामांची न्यायालयीन चौकशी सुरु असताना या प्रक्रियेतील प्रमुख अधिकारी २५ लाखांची लाच घेताना जाळ्यात अडकल्याने आता या पदावर स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याची नियुक्ती व्हावी,
अशी चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. पाटोळे याच्या जागी आता अतिक्रमण उपायुक्तपदी कोणाची वर्णी लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दसऱ्याच्या पूर्वसंध्येला बुधवारी ठाणे महापालिका मुख्यालयातून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत रात्री उशिरा पाटोळे व त्याचा सहकारी ओमकार गायकर याला अटक करण्यात आली.
भारतीय संस्कृतीमध्ये महत्त्वाचा दसरा सण
त्यानंतर गुरुवारी दसऱ्याच्या निमित्ताने पालिका मुख्यालयाला सुट्टी होती. शुक्रवारी पालिकेचे कामकाज नेहमीप्रमाणे सुरु झाले. मात्र विविध विभागांसह अधिकाऱ्यांच्या दालनातही या कारवाईची जोरदार चर्चा रंगली होती.
ठाणे पालिकेच्या कारकिर्दीत उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याला या पद्धतीने मुख्यालयात लाच घेताना अटक होण्याची नामुष्की पहिल्यांदाच आल्याने पालिका प्रशासनाची प्रतिमा मलिन झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
IMD च्या इशाऱ्याने हाय अलर्ट ;राज्यात पावसाचा जोर वाढणार
त्यामुळे आता या पदाची जबाबदारी स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याकडे देणे आवश्यक आहे. या अधिकाऱ्यावर अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना कोणत्याही पद्धतीचा राजकीय दबाव नसावा,
तोडक कारवाई व इतर कामकाजात राजकीय नेत्यांच्या समर्थकांनी ढवळाढवळ न केल्यास अधिकाऱ्यांना प्रभावी पद्धतीने काम करता येईल, असेही पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नमूद केले.
अनधिकृत बांधकामांसाठी कुप्रसिद्ध असलेल्या दिवा, मुंब्रा, कळवा या विभागाप्रमाणेच ठाणे पालिकेचा अतिक्रमण आणि निष्कासन विभाग व वाद हे समीकरण कायम राहिले आहे.
आता कागदी बॉंड संपणार ,आजपासून राज्यात e-Bond
याआधी देखील या विभागाच्या अधिकाऱ्यांची वादग्रस्त प्रकरणे समोर आल्याने त्यांच्याकडील कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात हटवला होता.
मात्र या अधिकाऱ्यांचा दबाव नेहमीच या विभागावर राहतो. त्यातूनच भ्रष्टाचार आणि वादाची मालिका सुरुच राहते, असे सामाजिक कार्यकर्त्यांनी सांगितले.
सावधान कफ सिरपमुळे मृत्यूला आमंत्रण
उपायुक्त पाटोळे याच्यावतीने तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाशी चर्चा करणारे मंदार गावडे, सुशांत सुर्वे आणि संतोष तोडकर या तिघांचे नाव पोलिस तक्रारीत नमूद आहे.
यातील सुर्वे याच्या खात्यात तोडकर याने दहा लाखांची रक्कम पाठवण्यास तक्रारदाराला सांगितले. त्यानुसार तक्रारदाराच्या पत्नीच्या बँक खात्यातून सुर्वे याच्या बँक खात्यावर दहा लाख रुपये पाठवण्यात आल्याचे तक्रारीत स्पष्ट केले आहे.
पहिली ते बारावीच्या शैक्षणिक मूल्यमापन पद्धतीत बदल
अतिक्रमण व निष्कासन विभागाच्या याआधीच्या अधिकाऱ्यांच्या कारकिर्दीतही वादग्रस्त प्रकरणात मंदार गावडे, सुशांत सुर्वे आणि संतोष तोडकर यांची नावे समोर आली होती. त्यामुळे या विभागात नवे अधिकारी रुजू झाले, तरी जुनेच कारभारी काम करतात, असे या प्रकरणावरुन समोर आले आहे








