महाराष्ट्रातील बोगस मतदार नोंदणीत भाजपचं कनेक्शन उघड? पुरावे समोर, प्रकरण काय?

BJP's connection exposed in bogus voter registration in Maharashtra? Evidence in front, what is the case?

 

 

 

बोगस मतदाराचा मुद्दा देशात गाजत असताना महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असलेला राजुरा मतदारसंघ प्रकाशझोतात आला. त्याला कारण ठरलं काँग्रेस नेते राहुल गांधी .

 

आपल्या दुसऱ्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी राजुरा विधानसभा मतदारसंघात सहा हजार मतं वगळल्याचा आरोप केला होता.

आता ॲपद्वारे ST बसचे लोकेशन पाहता येणार

शेतकरी नेते तथा विदर्भवादी अ‍ॅड. वामनराव चटप यांनी बोगस मतदार नोंदणीत भाजप असल्याचा आरोप केला आहे. त्यांनी थेट पुरावेच पुढे केले. त्यामुळे भाजपच्या विजयाला बोगस मतदार कारणीभूत ठरल्याच्या चर्चेला आता जोर आला आहे.

 

आता कागदी बॉंड संपणार ,आजपासून राज्यात e-Bond
राजुरा विधानसभा मतदार यादीतील ६८५३ बोगस मतदार नोंदणी प्रकरणात ठोस पुरावे आहेत. असं असताना पोलीस प्रशासनाने अद्याप कार्यवाही केलेली नाही. FIR मध्ये स्पष्ट नावं आणि मोबाईल क्रमांक नमूद आहेत,

 

तरीही बारा महिने उलटून गेले, तरी जबाब नोंद, अटक किंवा कसलीही चौकशी झालेली नाही, असं सांगण्यात आलं आहे.

 

सुधीर मुनगंटीवार व देवराव भोंगळे यांच्यासोबतचे फोटो उपलब्ध आहेत. हे दोन्ही नंबर FIR मध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले आहेत.

पहिली ते बारावीच्या शैक्षणिक मूल्यमापन पद्धतीत बदल

मात्र त्यांना अटक करून चौकशी का झालेली नाही, हा गंभीर प्रश्न आहे. तसेच गंगाधर, बंडू व क्रीश लिहिलेले नाव व नंबर हे बाखर्डी परिसरातील आहेत. ते देखील भाजपशी संबंधित आहेत.

ही घटना लोकशाही प्रक्रियेचा गळा घोटण्याचा कट आहे. मतदार याद्यांमध्ये खोट्या नोंदी घालून निवडणुकीवर परिणाम करण्याचा थेट प्रयत्न करण्यात आला.

.25 लाखांची लाच घेताना मनपा उपायुक्ताला रंगेहात अटक

मात्र पोलिस प्रशासनाने निष्क्रियता दाखवत जबाबदारी निवडणूक आयोगाकडे ढकलली. हे जनतेच्या विश्वासाशी केलेले थेट धोकेबाज कृत्य असल्याचं, चटप म्हणाले.

 

 

माजी आमदार चटप यांनी पोलीस अधीक्षकांना दिलेल्या पत्राद्वारे ठाम मागणी केली आहे की, या आरोपींना तातडीने अटक करून चौकशी करण्यात यावी. मास्टरमाईंड समोर आणावा.

आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

कार्यवाहीचा अहवाल सार्वजनिक करावा. यासंदर्भात अ‍ॅड. मुरलीधर देवाळकर, शेतकरी संघटना युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. दीपक चटप, स्वभाप जिल्हाध्यक्ष निळकंठ कोरांगे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष पोर्णिमा निरंजने यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

 

Related Articles