सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न ,वकिलाला अटक
Attempted attack on Chief Justice Bhushan Gavai, lawyer arrested

सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर न्यायालयाचे कामकाज सुरू असताना बूट फेकण्याचा प्रयत्न आज (6 ऑक्टोबर) झाल्याची सुत्रांची माहिती आहे. या प्रकरामुळे दिल्लीसह देशात खळबळ उडाली आहे.
.25 लाखांची लाच घेताना मनपा उपायुक्ताला रंगेहात अटक
विशेष म्हणजे बूट फेकणारा वकील असून त्याचे नाव राकेश किशोर आहे. या घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी तातडीने त्याला ताब्यात घेऊन सर्वोच्च न्यायालयाबाहेर नेले. सरन्यायाधीश भूषण गवई एका याचिकेवर सुनावणी करत असताना
राकेश किशोर या वकिलाने त्यांच्या बूट फेकला. तो बूट सरन्यायाधीस गवई यांच्यापर्यंत पोहोचला नाही. मात्र, सतानत का अपमान नही सहेंगे, अशा घोषणा त्या वकिलाने नंतर दिल्याचे सांगण्यात येते. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
मिळालेल्या माहितीनुसार वकील राकेश किशोर डेस्कजवळ गेला. त्यानंतर त्याने त्याचा बूट काढला आणि सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या दिशेने फेकण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकांनी वकील राकेश किशोर यांनी पकडले आणि त्याला घेऊन गेले.
पोलीस त्यांला बाहेर काढत असताना, वकिलाने सांगितले की, “भारत सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही.” दरम्यान, संपूर्ण घटनेत न्यायमूर्ती गवई शांत राहिले आणि न्यायालयीन कामकाज नेहमीप्रमाणे सुरू राहिले.
बार अँड बेंचच्या वृत्तानुसार, संपूर्ण घटनेत सरन्यायाधीश गवई शांत राहिले आणि त्यांनी न्यायालयीन कामकाज सुरू ठेवण्याचे निर्देश दिले. त्यांनी सांगितले की अशा घटनांमुळे त्यांना काहीही फरक पडत नाही.
महाराष्ट्रातील बोगस मतदार नोंदणीत भाजपचं कनेक्शन उघड? पुरावे समोर, प्रकरण काय?
या घटनेनंतर सरन्यायाधीशांनी कामकाजात खंड पडू दिला नाही. त्यांनी लगेचच वकिलांना काम सुरूच ठेवण्याच्या सूचना केल्या. तसेच मला अशा गोष्टींचा त्रास होत नाही,
तुम्हीही होऊन देऊ नका असे सांगत वकिलांना युक्तिवाद सुरू ठेवण्यास सांगितले. दरम्यान राकेश किशोरला कोर्टाबाहेर नेताना त्यांने ”आम्ही सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ असे जोरात म्हटले.
हैदराबाद गॅझेटचा जीआर कसा काढला? मुख्यमंत्र्यांसमोर ओबीसी नेते आक्रमक
काही दिवसांपूर्वी मध्य प्रदेशातील खजुराहो येथीव भगवान विष्णूंच्या सात फूट उंच, शिरच्छेदित पुतळ्याच्या जीर्णोद्धारावर सरन्यायाधीश गवई यांनी एक टिपण्णी केली होती. या संदर्भात वकील राकेश किशोर याला रागा आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.








