माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनी रचला , जरांगे पाटलांनी ऐकवली धनंजय मुंडेंची ऑडिओ क्लिप

Dhananjay Munde plotted to kill me, Jarange Patil played Dhananjay Munde's audio clip

 

 

मराठा आरक्षणाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. जरांगे पाटलांनी पत्रकार परिषद घेत माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडेंनी दिली असा खळबळजनक आरोप केला होता.

हवामान विभागाकडून मोठा इशारा

त्यानंतर धनंजय मुंडेंनीही याला उत्तर देत हे आरोप फेटाळले होते. त्यानंतर आता पुन्हा मनोज जरांगे पाटलांनी या प्रकरणावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे आणि आरोपीची ऑडिओ क्लिप ऐकवली आहे. यात नेमकं काय बोलणं झालं ते जाणून घेऊयात.

 

मनोज जरांगे पाटलांनी सुरुवातीला दोन अटक करण्यात आलेल्या आरोपींची ऑडिओ क्लिप ऐकवली, नंतर त्यांनी धनंजय मुंडे आणि आणखी एका आरोपीची ऑडिओ क्लिप ऐकवली. या ऑडिओ क्लिपमध्ये आरोपी म्हणतो की,

 

साहेब तुम्ही आले का परळीला? धनंजय मुंडे म्हणतात, नाही, अजून पुण्याला आहे, गरबड करू नका. आरोपी विचारतो, गाडीचं काय झालं यावर धनंजय मुंडे म्हणतात की, मी आता नवीन गाडी देऊ शकत नाही, जुनी गाडी देऊ शकतो.

सोन्याच्या बाबतीत बाबा वेंगाची भविष्यवाणी धडकी भरवणारी

ही ऑडिओ क्लिप ऐकवल्यानंतर पत्रकारांनी गाडीचं काय प्रकरण आहे असा प्रश्न विचारला. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, धनंजय मुंडेंना ही गाडी आमच्या ताफ्यात द्यायची होती.

 

त्यानंतर ती गाडी आमच्या अंगावर घालायची होती. हा तो प्रकार आहे. ही क्लिप खोटी असं धनंजय मुंडेंचं म्हणणं असेल तर सीडीआर काढण्यात यावा.

 

कोण कुठं होतं, कोण कुणाला भेटलं? जे दोघेजण सध्या अटक आहेत ते कुठे भेटले? त्यावेळेसचे लोकेशन काढा. सगळं समोर येईल, तुमचं आणि माझं वैर नाही. भाषणापर्यंत ठीक आहे, पण तुम्ही माझ्या मुळावरचं लोकं उठवले.

हवामान विभागाकडून मोठा इशारा

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मी सगळ्या गोष्टीला तयार आहे. असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी, धर्मासाठी घातक आहे. त्याच्यावरील संकट टाळण्यासाठी आता ओबीसी ला ओढणार का? अजित दादा असे लोक पाळणार का?

 

अजित दादांना सुद्धा शॉक बसला असेल. फडणवीस साहेबाला आता याचा छडा लावावा लागणार आहे, शिंदे साहेबाला सुद्धा लक्ष घालावं लागणार आहे. मराठा समाजाला सांगतो, मी सगळं व्यवस्थित करतो तुम्ही फक्त शांत रहा, मला तुम्हाला मोठं करू द्या.

 

माजी मंत्री धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. धनंजय मुंडे आपल्या हत्येचा कट रचल्याचा खळबळजनक आरोप मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी केला.

रेल्वेमध्ये तिकीटांच्या बुकींग नियमांत मोठा बदल

त्यावर धनजंय मुंडे यांनी हे आरोप फेटाळून लावत अत्यंत आक्रमक भूमिका घेत सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. आता याप्रकरणी स्वराज्य शक्ती सेनेच्या अध्यक्षा करुणा मुंडे यांनी धनंजय मुंडे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील

 

यांच्यातील वादात उडी घेत अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनीच मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा दावा करुणा मुंडे यांनी केला आहे. ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

 

मनोज जरांगे पाटील यांच्यावरील हल्ल्याचा कट धनंजय मुंडे यांनीच केला असणार. धनंजय मुंडे यांनी स्वत:च्या बायकोला सोडले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून ते मला त्रास देत आहेत.

अमेरिकेत विमानाचा भीषण अपघात ; उड्डाण घेताच कोसळले पाहा .. VIDEO

मनोज जरांगे पाटील यांची आतील टीम फोडण्याचं काम धनंजय मुंडे यांनी केली आहे. पोलिसांच्या कैदेत असलेला आरोपी दादा गरड माझ्याकडे तीन वेळा येऊन गेला आहे.

 

जेव्हा मी जरांगेकडे गेली होती. त्याने मला मेसेज केला तेव्हा मी जरांगेकडे होते. त्यानंतर लगेच धनंजय मुंडेंना माहिती मिळाली की मी मनोज जरांगेंकडे गेली आहे, असे करुणा मुंडे म्हणाल्या.

 

दादा गरड यांचे मोबाईल तपासा. व्हॉट्सअॅप चॅट्स आहेत. मेसेज आहेत. धनंजय मुंडे यांनी त्याला सॉरी म्हणून मेसेज केला होता. ते खूप गरीब व्यक्ती आहेत. धनंजय मुंडेंनी त्याला पाच लाख रुपये त्याला पाठवले होते.

फडणवीसांकडून कॉन्ट्रॅक्टरची खरडपट्टी

एका गरीब माणसाला धनंजय मुंडे सॉरी का बोलतोय. पाच लाख कशासाठी दिले. हे सर्व पुरावे त्यांच्या मोबाईलमध्ये आहेत. मला दुसऱ्या आरोपीचीही रेकॉर्डिंग त्याने ऐकवली होती. त्यांची १ कोटीची डील सुरु होती, असा गंभीर दावा करुणा मुंडेंनी केला आहे.

 

हे सत्य बाहेर आणण्यासाठी त्यांनी धनंजय मुंडे, मनोज जरांगे पाटील आणि माझी देखील नार्कोटेस्ट करा अशी मागणी केली आहे. धनंजय मुंडे सारखी नासकी वृत्ती आम्हाला संपवायची आहे.

 

धनंजय मुंडेंना मराठवाड्यातून नव्हे, तर देशातून बाहेर काढून अमेरिकेला पाठवावे आणि त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी करुणा मुंडेंनी केली आहे. या सगळ्या संघर्षामुळे आत्महत्या करण्याची वेळ आपल्यावर आली असून मी एकटी पडली आहे, असेही करुणा मुंडे म्हणाल्या.

पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याने महाराष्ट्रात खळबळ

 

दरम्यान मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचण्यात आला, असा आरोप होत आहे, या प्रकरणात मनोज जरांगे पाटील यांनी माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत, धनंजय मुंडे यांनीच आपल्या हत्येची सुपारी दिली,

 

असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे, दरम्यान त्यानंतर धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन जरांगे पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं, आता धनंजय मुंडे यांच्या पत्रकार परिषदेवर मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

 

रेल्वेचा मोठा अपघात ;पॅसेंजर ट्रेनचा डबा थेट मालगाडीवर चढला;पहा VIDEO
हा साधा विषय नाही, चेष्टेत घ्यायचा विषय नाही. परिस्थिती मर्यादेच्या पलीकडे त्यांनी नेली आहे. राजकारण राजकारणच्या ठिकाणी, यामध्ये आठ दहा जण आहे, त्यांची चौकशी व्हायला नको का?

 

उद्या मीच कोर्टात अर्ज करणार आहे, नार्को टेस्ट करायला मी सर्वात आधी तयार आहे. नार्को टेस्टच्या मागणीसाठी सर्वात आधी माझा अर्ज असणार आहे. तुम्ही सीबीआय म्हणता, पण मी म्हणतो त्याच्या वरची देखील चौकशी झाली पाहिजे, असं यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

पुढील 3 दिवस महाराष्ट्रावर मोठे संकट येणार

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, तू चुकीच्या ठिकाणी हात घातला आहेस, सीडीआर, सीबीआय आणि नार्को टेस्टसाठी मी तयार आहे. तुम्हीच घात-पात घडवून आणायचं ठरवलं होतं. तुमच्याकडे काहीही असू दे, तुम्ही कटापर्यंत आला तेव्हा मी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं. हे खरोखर वैरी झाले,

 

डायरेक्ट सुपाऱ्याच द्यायला लागले आहेत. मी सगळ्या गोष्टीला तयार आहे. असली प्रवृत्ती त्यांच्या जातीसाठी, धर्मासाठी घातक आहे. तुमच्यावरील संकट टाळण्यासाठी आता तुम्ही यामध्ये ओबीसीला देखील ओढणार का? अस सवालही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

 

अमेरिकेत विमानाचा भीषण अपघात ; उड्डाण घेताच कोसळले पाहा .. VIDEO

इथे ना ओबीसी आरक्षणाचा विषय आहे, ना मराठा आरक्षणाचा, अजितदादांना देखील शॉक बसला असेल. फडणवीस साहेबाला आता याचा छडा लावावा लागणार आहे, शिंदे साहेबाला सुद्धा या प्रकरणात आता लक्ष घालावे लागणार आहे. मराठा समाजाला सांगतो, मी सगळं व्यवस्थित करतो, तुम्ही फक्त शांत रहा, मला तुम्हाला मोठं करू द्या, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

 

 

Related Articles