पार्थ पवार प्रकरणात प्रदीर्घ काळानंतर अण्णा गाजले आणि कडाडले
After a long time, Anna became famous and tough in the Parth Pawar case.

पुण्यातील कोरेगावमधील 40 एकर जमिनीच्या खरेदीवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजिव पार्थ पवार अडचणीत सापडले आहे. तब्बल 1804 कोटी रुपये किंमतीची ही जमीन केवळ 300 कोटी खरेदी झाल्याचा समोर आले आहे.
याच मुद्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एखाद्या मंत्र्याचा मुलगा चुकीचे वागत असेल तर तो मंत्र्याचा दोष आहे. त्यासाठी संस्कार हे महत्त्वाचे असतात.
पुढील 3 दिवस महाराष्ट्रावर मोठे संकट येणार
एखादा व्यक्ती घडण्यासाठी कुटुंबाचे संस्कार, घराण्याचे संस्कार, गावाचे संस्कार, समाजाचे संस्कार हे खूप महत्त्वाचे असतात, असा हल्लाबोल अण्णा हजारे यांनी पवार कुटुंबावर केला.
त्याचवेळी राळेगण सिद्धी किती मोठं गाव आहे, पण कधीही गडबड नाही. गोंधळ नाही, असेही हजारे म्हणाले. दरम्यान, आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील अण्णा हजारे यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अमेरिकेत विमानाचा भीषण अपघात ; उड्डाण घेताच कोसळले पाहा .. VIDEO
अण्णा हजारे यांनी आज राळेगणसिद्धीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पार्थ पवार जमिन घोटळा प्रकरणार भाष्य केलं. पार्थ पवार यांच्या प्रकरणात कारवाई झाली पाहिजे.
पण असले प्रकार केवळ कारवाई थांबणार नाही. अशा प्रकरणांविरोधात कारवाई करण्यासाठी सरकारने विशेष धोरणे आखून त्याचा अवलंब केला पाहिजे. या प्रकरणाविरोधात कठोर पावले उचलली पाहिजेत.
असे वागणाऱ्या लोकांना कडक शासन केले पाहिजे, असेही अण्णा हजारे म्हणाले. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील 40 एकर जमिनीच्या व्यवहारावरुन पार्थ पवार यांच्यावर आरोपांच्या फैरी झडत आहेत. त्यांच्यामुळे अजित पवारही अडचणीत आले आहेत.
माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनी रचला , जरांगे पाटलांनी ऐकवली धनंजय मुंडेंची ऑडिओ क्लिप
पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील यांच्या १ लाखांचे भाग भांडवल असलेल्या अमेडिया या कंपनीने तब्बल 1804 कोटी रूपये किंमत असलेली जमीन,
अवघ्या 300 कोटींत खरेदी केली आहे. जी जमीन अमेडियाने खरेदी केली, ती महार वतनाची आहे. वतनाच्या जमिनी या अहस्तांतरीत असतात. तरीही हा व्यवहार झाल्याने बड्या व्यक्तीनेच सूत्रे हलविल्याचा संशय आहे.
हवामान विभागाचा 7, 8, 9 आणि 10 नोव्हेंबरला अलर्ट, मोठा इशारा,
1800 कोटींची जमीन पार्थ पवारांच्या कंपनीने केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादस दानवे यांनी केला.
महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते,
पार्थ पवार जमीन घोटाळा,राहुल गांधी म्हणाले मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत
असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला असं अंबादास दानवे म्हणाले.









