दोन आंबेडकरांमध्ये राजकीय युद्ध;! वंचितचे निष्ठावंतामध्ये चलबिचल

Political war between two Ambedkars;! The disenfranchised are in a state of flux among the loyalists

 

 

प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी राज्यामध्ये त्यांच्या पक्षाची बूथबांधणी करते आहे. आगामी निवडणूक वंचित स्वतंत्रपणे लढणार आहे.

 

वंचित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीविरुद्ध ताकदीने लढणार असल्याची माहिती पक्षाचे युवा नेते सुजात आंबेडकरांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

पुढील 3 दिवस महाराष्ट्रावर मोठे संकट येणार

त्यांनी युतीबद्दल बोलताना सांगितलं की, महायुती नाही आणि महाविकास आघाडीही नाही तर इतर जे छोटे पक्ष युती करतील त्यांना सोबत घेत या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.

 

प्रकाश आंबेडकर असतील किंवा सुजात यांचे विविध मेळावे आणि सभा राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये होत आहेत. त्यांना प्रचंड प्रतिसादही मिळतो आहे. पण सध्या नाशिकमध्ये मात्र वंचित बहुजन आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनी रचला , जरांगे पाटलांनी ऐकवली धनंजय मुंडेंची ऑडिओ क्लिप

नाशिकमध्ये वंचितचे कार्यकर्ते जिल्हाध्यक्षावर नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीतील अंतर्गत गटबाजीचा फटका पक्षाला बसला आहे,

 

जिल्हा अध्यक्षांच्या वागणुकीला कंटाळून २०० पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे देत पक्षाला राम राम ठोकला आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीला मोठा फटका बसणार आहे.

 

यातच आता वंचितमधून राजीनामे दिलेल्या या २०० पदाधिकारी यांनी पुढचा प्रवास प्रकाश आंबेडकरांचे बंधू आनंदराज आंबेडकर ांसोबत करायचा निर्णय घेतला आहे.

पार्थ पवार जमीन घोटाळा,राहुल गांधी म्हणाले मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत

आनंदराज आंबेडकर यांच्या “रिपब्लिकन सेनेत” हे सर्व पदाधिकारी प्रवेश करणार असल्याची खात्रीशीर माहिती समोर आली आहे. नाशिकमध्ये आनंदराज आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे सर्व पदाधिकारी पक्ष प्रवेश करणार आहेत.

 

येत्या रविवारी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न होईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आनंदराज आंबेडकर यांची सध्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती आहे. त्यामुळे हा प्रवेश अप्रत्यक्षपणे शिंदेंचीही ताकद वाढवणारा ठरणार आहे.

पार्थ पवार प्रकरणात प्रदीर्घ काळानंतर अण्णा गाजले आणि कडाडले

एकूणच एका बाजूला नाशिकमध्ये वंचित बहुजन आघाडीला अंतर्गत गटबाजीमुळे २०० पदाधिकारी यांनी दिलेला राजीनामा याचा फटका बसण्याची शक्यता आहे

 

तर ,दुसरीकडे हेच पदाधिकारी “रिपब्लिकन सेनेत” पक्ष प्रवेश करणार असल्याने याचा फायदा आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेला होणार आहे.

अजित पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

यामुळे नाशिकमध्ये येत्या काळात आंबेडकर बंधूंमध्ये राजकीय महायुद्ध होण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

 

 

Related Articles