लाच घेताना तलाठीला रंगेहात अटक

Talathi arrested red-handed while taking bribe

 

 

वारसा नोंद करण्यास गट खुला करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारताना शहापुर येथील तलाठी आणि कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले. गणेश विष्णुपंत सोनवणे (वय ३२ रा. मगदुम कॉलनी जयसिंगपूर) असे तलाठ्याचे नाव असून

दोन आंबेडकरांमध्ये राजकीय युद्ध;! वंचितचे निष्ठावंतामध्ये चलबिचल

नेताजी केशव पाटील (वय ४५ रा. म्हसोबा रोड दर्गा गल्ली शहापुर) असे कोतवालचे नाव आहे. स्टेशन रोडवरील गुरुचित्र मंदिर परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

 

तक्रारदाराने वारस नोंद करण्यासाठी शहापूर तलाठी कार्यालयात कागदपत्रे दिली होती. कागदोपत्री नाव नोंदणीसाठी तक्रारदार शहापूरचे तलाठी गणेश सोनवणे आणि कोतवाल नेताजी पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत होते.

पार्थ पवार प्रकरणात प्रदीर्घ काळानंतर अण्णा गाजले आणि कडाडले

या नोंदीसाठी गट नं. ७२९ हा ब्लॉक असलेला गट खुला करण्यासाठी कोतवाल पाटील याने तलाठी सोनवणे यांच्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

 

तडजोडीअंती तक्रारदाराने सुरुवातीला १० हजार रुपये आणि काम झाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले होते. तर लाच मागितल्याबद्दल तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोर्टलवर ३ नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदवली होती.

हवामान विभागाचा 7, 8, 9 आणि 10 नोव्हेंबरला अलर्ट, मोठा इशारा,

त्या अनुषंगाने कोल्हापुर लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी तलाठी कार्यालयात शहानिशा केली होती. गुरुवारी स्टेशन रोडवरील गुरु चित्रमंदिर नजीकच्या चहा टपरीवर तक्रारदाराकडुन १० हजाराची लाच स्वीकारताना तलाठी सोनवणे आणि कोतवाल पाटील या दोघांना पथकाने रंगेहात पकडले.

 

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर तलाठी सोनवणे आणि कोतवाल पाटील या दोघांच्याही घरांची झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात आले.

माझ्या हत्येचा कट धनंजय मुंडेंनी रचला , जरांगे पाटलांनी ऐकवली धनंजय मुंडेंची ऑडिओ क्लिप

दोन्ही संशयितांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील गावातील तलाठी आणि संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती.

 

 

Related Articles