राजकारणात खळबळ;अजित पवारांच्या पक्षाचेच मंत्री म्हणाले ,अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल
Political turmoil; A minister from Ajit Pawar's own party said, Ajit Pawar will have to resign

पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण उघडकीस आले. पार्थ पवारांच्या कंपनीचा हा गैरव्यवहार समोर आणल्यानंतर मोठी खळबळ उडाली.
यानंतर स्वत: अजितदादांनी हा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली. यात विरोधकांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केलीय…यात
5 विमानतळं बॉम्बने उडवणार, धमकीने खळबळ
आता मंत्री माणिकराव कोकाटेंनी मोठं विधान केले.चौकशीत दोषी आढळल्यास अजित पवारही राजीनामा देतील, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय.
यावरून खासदार सुप्रिया सुळेंनी टोला लगावला. आता त्यांच्याच पक्षाचे लोक असं बोलत असतील तर यामागे काहीतरी स्ट्रॅटेजी असू शकते, असं सुळेंनी म्हटलंय.
उपमुख्यमंत्री शिंदें अण्णा हजारेंना का भेटले ?‘हे’ कारण आले समोर
अजितदादांच्या राजीनाम्यासंदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली.अजित पवारांनी आधीच त्यांची भूमिका स्पष्ट केल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय.
पार्थ पवारांचा जमीन गैरव्यवहार उघडकीस आला. आपला या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचं अजित पवारांनी सांगितले. नंतर मात्र अजितदादांनीच हा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली.
डिसेंबरपासून नवा कायदा लागू;१६ वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदी
यावरून विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, आत अजितदादांच्या पक्षाचे माणिकराव कोकाटेंनीच हे वक्तव्य केले. त्यामुळे हाच धागा पकडून आता विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे.
अजित पवारांच्या घोटाळा फाईल्स रिओपन करणार असून यात त्यांना मोदी-शाहासुद्धा वाचवू शकणार नाही असं मोठं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले.
अमेरिकेच्या कंपन्यांमुळे भारतावर मोठं संकट
पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी अंजली दमानिया यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली होती यावेळी त्या बोलत होत्या.








