दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीवर शिक्कमोर्तब?
Is there any consensus on the alliance between the two nationalists?

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युती आणि आघाडीमधील घटक पक्षांकडून काही ठिकाणी एकत्र तर काही ठिकाणी विभक्त लढणार आहे.
असं असतानाच उभी फूट पडलेल्या शिवसेनेचे दोन्ही गट आणि राष्ट्रवादीचेही दोन्ही गट एकमेकांसोबत युती करण्यासंदर्भातील चर्चा आहे.
अजित पवार जमीन व्यवहार प्रकरणी मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
याबद्दल खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट प्रश्न विचारण्यात आला. बुधवारी पुण्यातील एका कार्यक्रमानंतर बोलताना पत्रकारांशी संवाद साधला.
निवडणुकीसंदर्भातील युतीबद्दल विचारलं असता अजित पवारांनी, “मी माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे की तुम्हाला तुमच्या भागात जे जे वाटतं जे योग्य वाटत ते त्या ठिकाणी करा,” असं उत्तर दिलं.
पार्थ पवार जमीन घोटाळा,राहुल गांधी म्हणाले मतचोरी करुन बनलेल्या सरकारची जमीन चोरी, मोदीजी तुमचं शांत
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युतीसंदर्भात अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी संभाव्य युतीची शक्यता पूर्णपणे फेटाळून लावली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही पक्ष युती करणार का? असं विचारण्यात आलं असता अजित पवारांनी, “त्यासंदर्भात मी त्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे. आज मला पुण्यातले स्थानिक पदाधिकारी भेटले.
‘व्हीव्हीपॅट नाही तर मतपत्रिकेवर मतदान घ्या ,मागणीची कोर्टाकडून गंभीर दखल
दोन्ही शहराध्यक्ष आणि आमदार भेटले. सगळे माजी नगरसेवक पण भेटले. त्यांना मी सांगितलं आहे की तुम्ही चाचणी करा. मी परत दोन दिवसांनी येतो आणि त्याबद्दल निर्णय घेऊ,” असं उत्तर दिलं.
पुढे बोलताना, “अजून महानगरपालिकेचा कार्यक्रम जाहीर झाला नाही त्यामुळे काय काय होतं आणि कसं कसं होतं ते पहावं लागेल,” असं अजित पवार म्हणाले.
कर्जमाफीवरून राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात बोलताना अजित पवारांनी, “निवडणुका होऊन खूप दिवस झाले आहेत. आज आम्ही महायुतीमध्ये आहोत. महायुतीमध्ये आमचं काम सुरू आहे.
पण आता नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत. कुठल्या कुठल्या शहरात काय काय घडतं हे साधारणतः लवकर समजेल. त्यावरुनच अंदाज घेता येईल. अंदाज आला की पुढच्या गोष्टी ठरवता येतील,” असं सूचक विधान केलं.
अमेरिकेच्या कंपन्यांमुळे भारतावर मोठं संकट
युतीसंदर्भात काही बोलणं झालं का याबद्दल विचारलं असता अजित पवारांनी, “माझं शरद पवार साहेबांशी बोलणं झालेलं नाही. कार्यकर्ते त्यांच्या भावना मांडत असतात.
मी सगळ्या भागातल्या सहकाऱ्यांना सांगितलं आहे की तुम्ही चाचणी करा आणि ठरवा,” असं उत्तर दिलं. तसेच, ” मी काही ही पहिली निवडणूक आम्ही लढत नाहीये.
राजकारणात खळबळ;अजित पवारांच्या पक्षाचेच मंत्री म्हणाले ,अजित पवारांना राजीनामा द्यावा लागेल
आम्ही लोकांनी अशा कित्येक निवडणुका लढल्या आहेत. हे आम्हाला नवीन नाही. आमच्यामध्ये एकोपा राहून निवडणुका लढू,” असं अजित पवार म्हणाले.







