पुन्हा अतिमुसळधार पावसाचं मोठं संकट, 16, 17, 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला अलर्ट जारी

Another major disaster of heavy rains, alert issued on 16, 17, 18, 19 and 20 November

 

 

या वर्षी देशासह राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला, पावसानं चांगलंच झोडपून काढलं, पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. महाराष्ट्राला तर पावसाचा मोठा तडाखा बसला,

रेल्वेमध्ये तिकीटांच्या बुकींग नियमांत मोठा बदल

अनेकांचे संसार नद्यांना आलेल्या पुरामुळे पाण्यात वाहून गेले. खरीप हंगाम हातचा गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले. दरम्यान आता पावसाचं संकट टळलं आहे,

 

असं वाटत असतानाच पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे, त्यामुळे चिंता वाढली आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दक्षिण श्रीलंका आणि पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये पुन्हा एकदा एअर सायक्लोनिक सर्कुलेशन तयार झालं आहे.

मूर्ख बनवण्याचा धंदा ;Arattai App: इकडं स्वदेशीचा नारा अन ऑफिस अमेरिकेत

याचा परिणाम म्हणजे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा आता हळुहळु पश्चिम उत्तर दिशेकडे सरकत आहे, त्यामुळे देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा एकदा जोरदार पवासाचा अंदाज भारतीय हवामान विभाग कडून वर्तवण्यात आला आहे.

 

हवामान खात्याच्या अंदाजानुसार देशात सध्या पावसाला अनुकूल असं वातावरण निर्माण झालं असून, याचा परिणाम म्हणून पुढील चार दिवस 15 नोव्हेंबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू आणि केरळच्या अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार आहे,

 

तर काही भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे पुढील दोन ते तीन दिवस आंध्रप्रदेश, लक्षद्वीप आणि आंदमार निकोबार बेटावर देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

 

तामिळनाडूमध्ये 16 आणि 17 नोव्हेंबर रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या काळात तामिळनाडूसोबत केरळ आणि आंध्र प्रदेशच्या अनेक भागांमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळासह पावसाची शक्यता आहे.

राहुल गांधींचे निवडणूक आयोगाला आव्हान;बिहारमधील मतचोरीचे दोन आठवड्यांत पुरावे देणार

या काळात हवेचा वेग प्रतितास 50 किमी इतका राहण्याचा अंदाज असून या पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे, याबाबत ‘सीएनबीसी आवाज’ने वृत्त दिलं आहे.

 

दरम्यान दुसरीकडे मात्र दक्षिण भारत वगळता इतर राज्यांमध्ये थंडीचा कडका वाढण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात पुढील काही दिवस थंडीची लाट येणार आहे.

 

महाराष्ट्रातील मराठवाड्यात कडक्याची थंडी पडू शकते असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोणताही पावसाचा इशारा नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीवर शिक्कमोर्तब?

आता देशावर दुहेरी संकट असल्याचे बघायला मिळत आहे. काही राज्यात पावसाचा इशारा तर काही राज्यांमध्ये थेट थंडीच्या लाटेचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला. वातावरणात सतत बदल होत आहे.

 

महाराष्ट्रात सध्या गुलाबी थंडीचे आगमन झालंय. राज्यात किमान तापमान 10 अंशांच्या खाली घसरल्याने गारठा जाणू लागला आहे. निफाड, जळगाव आणि जेऊरमध्ये 10 अंशापेक्षा कमी तापमानाची नोंद झाली.

 

राज्यात पुढील काही दिवसांमध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता असून गारठा वाढेल. पंजाब, बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मीर या भागात थंडीची लाट आलीये. भारतातील मान्सूनचा पाऊस कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

लाच घेताना तलाठीला रंगेहात अटक

बंगालच्या उपसागरात एक नवीन कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे, ज्यामुळे पुढील काही दिवस आता दक्षिण भारतात मुसळधार पाऊस होऊ शकतो. तसा इशाराही भारतीय हवामान विभागाने दिलाय.

 

केरळमध्ये पुढील काही दिवस पाऊस बघायला मिळेल. 16 ते 20 नोव्हेंबर दरम्यान अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. वादळ, विजांचा कडकडाट यासोबतच पुराचा धोका देखील असणार आहे.

246 नगर परिषदा आणि 42 नगर पंचायतींच्या निवडणूक;2 डिसेंबरला मतदान 3 डिसेंबरला मतमोजणी

उंच लाटा येण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात जाऊ नये असा सल्ला देण्यात आला आहे. राज्यातील तीन ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे. पुढील काही तास केरळसाठी अत्यंत धोकादायक आहेत.

 

फक्त केरळच नाही तर आंध्र प्रदेशला देखील मोठा धोका आहे. 17 ते 18 नोव्हेंबरला किनारी जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. 16, ते 20 नोव्हेंबरला हलका ते मध्यम पाऊस होईल.

कर्जमाफीवरून राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे

समुद्रात धोका असून मच्छिमारांनी मोठा इशारा देण्यात आला. हवामान खात्याने सांगितले की, अंडमान निकोबार या भागातही पुढील 5 दिवस अधूनमधून मध्यम ते मुसळधार पाऊस होईल. तामिळनाडूमध्येही पावसाचे संकेत आहेत.

 

 

Related Articles