मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीएच्या डॉक्टर पत्नीची आत्महत्या

Minister Pankaja Munde's PA doctor wife commits suicide

 

 

भाजप नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहाय्यक (PA) अनंत गर्जे यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना वरळीत उघडकीस आली आहे. अनंत गर्जे आणि डॉक्टर गौरी पालवे यांचा विवाह यंदाच्या ७ फेब्रुवारी रोजी झाला होता.

नगरपालिका निवडणूक भाजपकडून एकाच कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी राज्यभरात चर्चेत

मिळालेल्या माहितीनुसार, गौरी पालवे यांनी मंगळवारी सायंकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक तपासानुसार कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असावा, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अधिकाऱ्यांसाठी नवीन जीआर,आमदार-खासदार येताच उठून उभे राहा

या प्रकरणी वरळी पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे. गौरी पालवे या वरळी बीडीडी येथे राहत होत्या आणि केईएम रुग्णालयाच्या डेन्टिस विभागात कार्यरत होत्या. मृतदेह शवविच्छेदनासाठी केईएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

 

शनिवारी (२२ नोव्हेंबर) रात्री गौरी पालवे यांनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. महत्त्वाची बाब म्हणजे केवळ काही महिन्यांपूर्वीच म्हणजे फेब्रुवारी महिन्यात दोघांचा विवाह झाला होता.

नगरपंचायत निवडणुकीवर बहिष्कार, कारण वाचून तुम्हीही थक्क व्हाल

या लग्नाला स्वतः पंकजा मुंडेही उपस्थित होत्या. वरळीतील राहत्या घरी अनंत गर्जेंच्या पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री उशीरा ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर पंकजा मुंडे यांनी आपले बीडमधील सर्व कार्यक्रम तत्काळ रद्द केले असल्याची माहिती मिळाली आहे.

 

सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि पोलिसांनीही लाटले लाडक्या बहीण योजनेचे पैसे आता कोणती कारवाई

मृतदेह रुग्णालयात हलवण्यात आला असून त्यावर पोस्टमार्टम करण्यात येणार आहे. पोस्टमार्टम अहवालातूनच आत्महत्येचे अचूक कारण स्पष्ट होईल, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येणार?

दरम्यान, वरळी पोलिसांनी या प्रकरणी अपमृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे. विवाहाला अवघे १० महिने होत असताना तरुण पत्नीने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 

 

Related Articles