मराठवाड्यातील कल्पना भागवत थेट पाक लष्कराच्या संपर्कात,यंत्रणा अलर्ट

Kalpana Bhagwat in Marathwada is in direct contact with the Pakistan Army, the system is on alert

 

 

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट झाला. जैश-ए-मोहम्मद या पाक दहशतवादी संघटनेचा त्यात हात असल्याचे समोर येत आहे. यामध्ये व्हाईट कॉलर डॉक्टरचा सहभाग उघड झाल्यापासून यंत्रणा सतर्क आहेत.

CBI अधिकारी असल्याचे सांगून चोरट्यांनी २७ लाखाला गंडवले

स्लीपर सेलमधील अनेकांची उचलबांगडी करण्यात येत आहे. हा घटनाक्रम सुरू असतानाच छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक करण्यात आलेल्या एका तोतया IAS महिलेचे थेट पाकिस्तानच्या लष्कराशी कनेक्शन उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.

 

गेल्या सहा महिन्यांपासून ही महिला आईसह येथील एका हॉटेलमध्ये वास्तव्यास आहे. ती मूळची छत्रपती संभाजीनगरची असून तिचे वडील शिक्षक असल्याची आणि एक भाऊ हडको भागात राहत असल्याची माहिती समोर आली आहे.

मराठवाड्यातील राहुल गांधीं आणि एकनाथ शिंदेच्या एकत्रित” या ” फोटोची होतेय राज्यभरात चर्चा

तोतया आयएएस महिला अधिकारी कल्पना त्रिंबकराव भागवत हिला १० दिवसांची वाढीव पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर मधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये ती गेल्या 6 महिन्यांपासून वास्तव्यास आहे.

 

तोतया आयएएस महिला अधिकारी कल्पना भागवत ही पाकिस्तानच्या अफगाण राजदुतासह इतर 11 दुरध्वनी, मोबाईल क्रमांकांशी दहा महिन्यांपासून संपर्कात होती अशी माहिती आता समोर येत आहे. पोलिस तपासात ही धक्कादायक बाब समजली. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनी या ११ क्रमांकाचा तपास सुरू केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

नगर परिषदेबाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, खालील ठिकाणच्या निवडणुकांना दिली स्थगिती

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, भागवत हिच्या पडेगाव येथील घराची झाडाझडती घेतली असता 19 कोटींचा धनादेश, संशयास्पद प्रमाणपत्रं तसेच परदेशी क्रमांकाशी नियमीत संपर्क होत असल्याचे समोर आले आहे.

 

तिच्या मोबाईलमद्ये पाकिस्तानी लष्करातील अधिकाऱ्यांचे क्रमांक, अफगाणी नेटवर्क, तर चॅट हिस्ट्री डिलीट केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

 

त्यामुळे ती गुप्तहेर आहे का, यादृष्टीने तपास करण्यात येत आहे. तिने यापूर्वी दिल्ली, उदयपूर आणि जोधपूरला वारंवार विमान प्रवास केल्याचे उघड झाले आहे.

पुन्हा अतिमुसळधार पावसाचं मोठं संकट, 16, 17, 18, 19 आणि 20 नोव्हेंबरला अलर्ट जारी

तपासात तिचे अफगाणिस्तानचा नागरिक व भारतात व्यावसायिक म्हणून वास्तव्यास असलेल्या मोहम्मद अशरफ खिल याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले.

 

त्यानंतर केंद्रीय गुप्तचर यंत्रणांसोबत दहशतवादविरोधी पथकाने तपासात उडी घेतली. बुधवारी कल्पनाच्या पहिल्या पोलिस कोठडीची मुदत संपली.

भारतीय बनावटीचं तेजस विमान कोसळले ;पाहा थरकाप उडवणाराVIDEO

देशविघातक कृत्याचा संशय बळावल्याने पोलिसांनी कल्पना भागवतला बंदोबस्तात न्यायालयात हजर केले. तिच्या पोलीस कोठडीत 10 दिवसांची वाढ झाली.

 

मूळची छत्रपती संभाजीनगरमधील पडेगाव येथील कल्पना भागवत हिच्याकडे आयएएस असल्याचे बनावट लेटरहेड, संशयास्पद प्रमाणपत्र आढळले आहेत.

दोन्ही राष्ट्रवादींच्या युतीवर शिक्कमोर्तब?

याप्रकरणी दहशतवाविरोधी पथकासह केंद्रीय गुप्तचर यंत्रणाही तपासात उतरल्या आहेत. डिलीट केलेले चॅट हस्तगत केल्यानंतर आणि तिची कॉल हिस्ट्री हाती लागल्यानंतर या प्रकरणात मोठा उलगडा होण्याची शक्यता आहे.

 

 

Related Articles