ठाकरेंच्या आमदारासाठी एकनाथ शिंदेंची सभा

Eknath Shinde's rally for Thackeray's MLA

 

 

राज्यात काही दिवसांपूर्वी बार्शीच्या महाआघाडी पॅटर्नची जोरदार चर्चा रंगली होती. कारण, एकमेकांविरुद्ध कट्टर उभ्या ठाकलेल्या दोन शिवसेना एकत्र आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. विशेष म्हणजे महाआघाडीच्या या बार्शी पॅटर्नवर शिवसेना नेत्यांकडूनही ठोस स्पष्टीकरण आलं नव्हतं.

 

आता, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांच्यासाठी जिल्हा परिषद निवडणुकी जाहीर सभा घेतली.

दिल्लीला येणाऱ्या विमानाला बॉम्बची धमकी, आपत्कालीन लँडिंग

या सभेत आमदार सोपल यांचे कौतुक करत, बार्शीच्या विकासाला निधीची कमतरता भासू देणार नाही, असे म्हटले. दिलीप सोपल 7 वेळा आमदार झाले, यावेळी गाडी चुकली नाही तर ते मंत्रिमंडळात असते, असे म्हणत एकनाथ शिंदेंनी सोपल आपल्यासोबत असते तर आमदार असते असे म्हटले.

 

सोपल साहेबांचं काम अनेक वर्षे विधानसभेत पाहिलं आहे, ते दोन वेळा सभागृहात नव्हते पण तरीही सभागृहाला चुकल्यासारखं वाटत होते. सोपल हे अजातशत्रू आहेत,

उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवारांचा शपथविधी संपन्न

सर्वांचे मित्र आहेत. ते 1995 ला मंत्री देखील होते, कामाचा माणूस आहे पण कलाकार आहे. एकीकडे दुःखाचे सावट आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाण्याने राज्यभरात दुःखाचे सावट आहे.

 

मात्र, ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे, आमच्या निवडणुका झाल्या. हे कार्यकर्ते आहेत जे आम्हाला निवडून देतात, कार्यकर्त्याला अपेक्षा असतात की नेता आपल्याजवळ आला पाहिजे. कार्यकर्त्यांच्या पाठीमागे मी उभा राहणारा माणूस आहे,

 

दोस्ती करावी मनापासून, तसे सोपल मनापासून दोस्ती करतात, म्हणूनच की या ठिकाणी आलोय, असे म्हणत राज्यात महाआघाडी असली तरी बार्शीत ठाकरेंच्या आमदारासाठी आपण का आला, याचं कारण एकनाथ शिंदेंनी सांगितलं.

शरद पवारांचा पॉवर गेम; पत्रकार परिषदेतून अनेक संदेश

तालुका व्हावा म्हणून इथं आंदोलन झालं, मनोहर जोशी साहेब असताना झालं ही होत. पण मी एकनाथ शिंदे आहे, जी जनतेची इच्छा तीच आमची इच्छा. इथल्या जनतेची मागणी देखील पूर्ण होईल, वैराग तालुका व्हावा ही मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन एकनाथ शिंदेंनी दिलं.

 

एकनाथ शिंदे जे बोलतो तर करून दाखवतो. आता पण लोकं बोलतात लाडकी बहीण योजना बंद करू. मी गरिबी पाहिली आहे, त्यामुळे मला गरिबीची जाण आहे. कोणी मायका लाल आला तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. शेतकरी अन्नदाता आहे, त्याला केंद्रबिंदू ठेवून आम्ही काम करतोय.

राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवकांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्रतेची कारवाई

कर्जमाफीचे आश्वासन दिलंय त्याचं काय? असं विचारतात. समितीचा अहवाल आला की कर्जमाफी करणार, अशी घोषणाही एकनाथ शिंदेंनी केली. तर, लाडकी बहीणसाठी 2100 देण्याचे आश्वासन दिलं होतं ते देखील आम्ही करणार असल्याचे म्हटले.

 

सोपल साहेब तुम्ही संघर्ष, खटाटोप केलाय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी तुम्ही ज्या मागण्या केल्या. अप्पर तहसील कार्यलय, तालुका निर्मिती अशा सर्व मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. मी देखील सरकारमध्ये आहे,

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी खरंच कट शिजवला गेला?

उपमुख्यमंत्री आहे, कसलीच काळजी करू नका. विकासाला निधी कमी पडणार नाही. काही जण म्हणतात निधी कुठून आणणार, हा एकनाथ शिंदे देखील उपमुख्यमंत्री आहे, असे म्हणत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोपल यांच्यावर केलेल्या टीकेला एकनाथ शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं.

 

तसेच, सर्वाधिक सह्या करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असं अजित पवार म्हणत होते. मी उदय सामंत यांना तात्काळ सांगतो आणि इथं एमआयडीसी करू, तुम्ही तयारीला लागा, अशी घोषणाच एकनाथ शिंदेंनी केली

विरोधी पक्षांचे ८ खासदार निलंबित

सोपल साहेब आणि आम्ही सोबत, एकत्र आहोत. नगरपंचायत साठी किती पैसे पाहिजे सांगा, इथं आचारसंहिता लागू नाही. नगराध्यक्षांनी कामे सुचवली आहेत, नगरपंचायत साठी 34 कोटी मागितले. उद्याच्या उद्या यांचा पहिला टप्पा मिळणार, नो रिजन, ऑन द स्पॉट डिसिजन करतो, बघतोवाला धंदा आपला नाही,

 

असे एकनाथ शिंदेनी बार्शीच्या सभेत म्हटलं. तर, शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 5 कोटी लागणार असतील तर लगेच घ्या, मी मुंबईला जाण्याआधी तुम्हाला याची ऑर्डर मिळून जाईल,

मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…;

असे त्यांनी म्हटलं. इथं आचारसंहिता नाही, त्यामुळे काळजी करू नका. पैसे कुठून आणणार म्हणतात हे बघा पैसे.. हे जनतेच्या मालकीचे आहेत, असा टोलाही एकनाथ शिंदेंनी लगावला.

 

खाते कोणाचे पण असलं तरी मी उपमुख्यमंत्री आहे, टेन्शन घेऊ नका, टेन्शन द्यायचं. दिलीप सोपल 7 वेळा निवडून आलेत, 8 व्यांदा निवडून येतील. मागच्या वेळी झालेली चूक दुरुस्त करू,

खामेनेईंच्या एका इशाऱ्याने ट्रम्प बॅकफुटवर!, इराणसमोर झुकला अमेरिका?

सोपल साहेबांचा ही मान सन्मान राखला जाईल, असे एकनाथ शिंदेंनी म्हणताच लोकांमधून आवाज आला, संतनाथ कारखाना सुरु करा, त्यावर दिलीप सोपल यांना उद्देशून एकनाथ शिंदे म्हणाले,

 

तुम्ही आमच्यासोबत या लगेच सुरू करू.. एक बार मैं कमिटमेन्ट करू तो खुद की नही सुनता. जे मी बोललोय त्यातला एक ही शब्द इकडचा तिकडं होणार नाही, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल यांना जाहीर व्यासपीठावरून ऑफर दिली.

खामेनेईंच्या एका इशाऱ्याने ट्रम्प बॅकफुटवर!, इराणसमोर झुकला अमेरिका?

Related Articles