मुस्लिमांनाही संघात प्रवेश मिळणार? संजय राऊत यांचा सवाल
Will Muslims also be allowed to join the RSS? Sanjay Raut's question.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शताब्दी महोत्सव सुरू आहे. काल मुंबईतील वरळी डोम इथं संघाने मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याला बॉलिवूडसह अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी झाडून हजेरी लावली.
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान जातीने या कार्यक्रमाला हजर होता. त्यावरून राजकीय फोडणी बसली. उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी सलमान खानच्या हजेरीवरून संघाला चिमटा काढला.
अर्थसंकल्पातील 7 सर्वात मोठ्या घोषणा
सलमान खानला सेलिब्रिटी म्हणून बोलावले की आता मुस्लिमानांही संघात प्रवेश मिळणार? असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला. त्यावरून आता राजकारण तापण्याचे संकेत मिळत आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. दिल्लीत सरत्या वर्षात बौद्धिक खुराक संघाने वाटला. त्यानंतर संघाचे कार्यक्रम बंगळुरू इथं सुद्धा झाले. शताब्दी वर्षानिमित्त अनेक कार्यक्रम संघाकडून करण्यात येत आहे.
अमेरिका इराणवर हल्ला करण्याची शक्यता, भारतावरही महासंकट
पण बदलत्या समाज मनाची नस पकडण्यासाठी संघाने अभिनव प्रयोग केला. वरळी डोम इथं बॉलिवूडसह फॅशन जगतातील आणि इतर क्षेत्रातील मान्यवरांनी आणि सेलिब्रिटींनी या कार्यक्रमाला हजेरी लावली. स्वत: सरसंघचालकांनी सलमानचा उल्लेख करत तो फॅशन आयकॉन असल्याचे सांगितले.
“काल राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा एक कार्यक्रम झाला. मी पाहत होतो. मला ही आमंत्रण होतं. पण एक दुसरा कार्यक्रम असल्याने मला जाता आलं नाही. नाहीतर मी ही संघाच्या कार्यक्रमाला गेलो असतो.
शरद पवारांचा पॉवर गेम; पत्रकार परिषदेतून अनेक संदेश
सलमान खान व्यासपीठावर होते असं मला कळालं. हे सलमान खान याचं स्वागत होतं गर्दी जमावण्यासाठी की संघामध्ये यापुढे मुस्लिमांनाही खुलं आमंत्रण आहे.
सलमान खान या नटाला आमंत्रण होतं, व्यासपीठावर की संघात, संघ शाखांवर यापुढे मुस्लिमांनाही प्रवेश आणि त्याचं स्वागत आहे का? हे जर मोहनराव भागवतांनी स्पष्ट केलं असतं तर अधिक योग्य झालं असतं,
शरद पवारांचा पॉवर गेम; पत्रकार परिषदेतून अनेक संदेश
कारण ज्या पद्धतीनं हिंदू-मुसलमान असा द्वेष आणि सूडपूर्ण असा प्रचार गेल्या काही दिवसात करण्यात आला. त्यात संघ ही सामील आहे. मोदी, फडणवीस, अमित शाह वा इतर सर्व लोक हे द्वेषपूर्ण राजकारण करत आहेत.
मोदी हे संघाचेच नेते आहेत. त्यामुळे सलमान खान आणि इतर कलाकारांना तुम्ही व्यासपीठावर घेतलं. पण हे सलमान खान पुरतंच मर्यादीत आहे का? सध्या सत्ता आहे त्यामुळे हे लोक व्यासपीठावर आहेत.
राष्ट्रवादीच्या 7 नगरसेवकांवर जिल्हाधिकाऱ्यांकडून अपात्रतेची कारवाई
उद्या सत्ता गेल्यावर हे लोक तुमच्या व्यासपीठावर येतील का? हा फार गंमतीचा प्रश्न आहे, हा प्रकार माझ्या कानावरती आला. क्या करेंगे भाई, जाना पडता है.ठीक आहे.
सलमान खान याला बोलावलं याचं स्वागत, पण या देशात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रभक्त, राष्ट्रवादी मुसलमान आहेत. त्यांचंही स्वागत करा.” अशी खणखणीत प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
भारताचा अमेरिकेशी करार म्हणजे शेतकऱ्यांना विकण्याचा सौदा









