अजितदादा यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली पोस्ट

Sunetra Pawar's first post after Ajit Dada's death.

 

 

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. मुंबईहून बारामतीला जात असताना बारामती विमानतळाच्या अगदी जवळ अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला.

 

या अपघातानंतर सुरूवातीला सांगितले गेले की, अजित पवार गंभीर जखमी असून त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यानंतर लगेचच अजित पवार यांच्या निधनाची बातमी पुढे आली.

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या काही मिनिटे आधी सुप्रिया सुळे यांचे मोठे वक्तव्य

आजही कोणाला विश्वास बसत नाही की, अजित पवार आपल्यात नाहीत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी अजित पवार निघाले होते.

 

धावपट्टीच्या अगदी जवळ त्यांच्या विमानाचा अपघात झाला. अजित पवार यांच्या विमान अपघाताचे अनेक व्हिडीओ पुढे आली.

अर्थसंकल्पातील नवा आयकर कायदा 10 मोठ्या बाबी

आकाशातच अजित पवार यांचे विमान एका बाजूला कोलमडताना स्पष्टपणे व्हिडीओमध्ये दिसले. सीआयडीकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताची चाैकशी केली जात आहे. अजित पवार यांच्या सचिवांचीही सीआयडीने चाैकशी केली.

 

अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, यादरम्यान पवार कुटुंबातील वादही पुढे आला.

 

ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार यांचे निधन झाल्याने सर्वच राजकीय पक्षांनी म्हणावा तसा प्रचार अजिबात केला नाही.

अजित दादांच्या विमान अपघाताच्या चौकशीला विलंब का?; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी लोकांचे आभार मानले.

 

संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, आपले लाडके नेते, राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतील ग्रामीण महाराष्ट्राच्या प्रगतीच्या संकल्पपूर्तीसाठी शिस्तबद्ध,

विरोधी पक्षांचे ८ खासदार निलंबित

एकजुटीने आणि निष्ठेने पक्षासाठी कार्य करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व मान्यवर नेते, आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांचे विशेष आभार.

 

आपल्या समर्पणामुळे, अथक परिश्रमांमुळे आणि संघटित प्रयत्नांमुळेच पक्षाचे तसेच आदरणीय अजितदादांचे विचार व कार्य अधिक सक्षम आणि परिणामकारकपणे पुढे जात आहे. मनःपूर्वक धन्यवाद… असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्यासाठी सर्वात मोठी अट

 

Related Articles