हवामानात मोठे बदल, पाहा कुठं काय घडणार
Significant changes in the weather, see what's going to happen where.
केंद्रीय हवामानशास्त्र विभाग अर्थात आयएमडीनं वर्तवलेल्या प्राथमिक अंदाजानुसार देशाच्या पवर्वतीय राज्यांमध्ये उत्तरेस एक नवी हवामान प्रणाली सक्रिय होत आहे.
सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याच्या काही मिनिटे आधी सुप्रिया सुळे यांचे मोठे वक्तव्य
ज्यामुळं उंच भागांमध्ये बर्फाची चादर पाहायला मिळेल. तर, पुढच्या 7 दिवसांमध्ये हवामान कोरडं राहण्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे.
पश्चिमी हिमालय क्षेत्रामध्ये हे बदल अतिशय वेगानं होत असून त्याचा परिणाम मध्य भारतापर्यंत पाहायला मिळेल. इथं महाराष्ट्रातही कुठं ढगाळ वातावरण तर, कुठं वाढता उकाडा नागरिकांना घाम फोडताना दिसत आहे.
NCP बैठक अन् अजितदादांच्या खास माणसाचा गेम; ‘सूत्रधार’ गायब?
हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढच्या 24 तासांमध्ये राज्यात किमान तापमानात अंशत: घट अपेक्षित असून, त्यामुळं पहाटे काहीसा गारठा जाणवेल.
दुपारी मात्र उकाडा असह्य होईल. प्रामुख्यानं किनारपट्टी भागांमध्ये हवेतील आर्द्रतेचं प्रमाण वाढल्यानं उष्मा अधिक जाणवेल असाही अंदाज वर्तवत नागरिकांना सतर्क करण्यात आलं आहे.
अर्थसंकल्पात महिलांसाठी 7 महत्वाच्या घोषणा
बहुतांश जिल्ह्यांमध्ये तीव्र उकाडा असल्या कारणानं या सूर्यकिरणांपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना आतापासूनच छत्रीचाही वापर करावा लागू शकतो असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही.
पुणे, सातारा, सांगली आणि या संपूर्ण पट्ट्यामध्ये हवा कोरडी असेल, तर पुढचे 24 कास दुपारी प्रचंड उकाडा जाणवेल. धुक्यामुळं दृश्यमानतेवर प्रभाव पडेल मात्र थंडीनं आता काढता पाय घेण्यास सुरुवात केली आहे हे मात्र नक्की.
अर्थसंकल्पातील 7 सर्वात मोठ्या घोषणा
धीम्या गतीनं मराठवाडा आणि विदर्भात उष्णता आणखी तीव्र होण्यास सुरुवात झाली असून, येत्या काळात ती दिवसागणिक अधिकच वाढत जाईल असा इशारा यंत्रणांनी जारी केला आहे.
इथं महाराष्ट्रात उकाडा वाढत चालला असतानाच हिमालय क्षेत्रामध्ये नव्यानं पश्चिमी झंझावात सक्रिय होत असल्यामुळं इथं तुलनेनं गारठा कमीजास्त होत राहील.
‘ट्रेड डील’ बळीराजाशी विश्वासघात
तर, लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचलच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. पर्वतीय क्षेत्रांमध्ये पुढच्या 24 तासांमध्ये ताशी 30 ते 40 किमी इतक्या वेगानं वारे वाहतील.
तर, उत्तर पश्चिम भारतामध्ये पुढील 48 तासांमध्ये तापमानात 2 ते 4 अंशाची वाढ अपेक्षित आहे. तर, उत्तर भारतावर अद्यापही धुक्याची चादर असून, ही स्थिती हळुहळू पूर्ववत होईल आणि दृश्यमानता सुधारेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
शरद पवारांची सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीवर पहिली मोठी प्रतिक्रिया







