सोन्या -चांदीमुळे कोट्यवधींचं नुकसान, जगभरात टेन्शन वाढले

Gold and silver cause losses of crores, tension increases worldwide!

 

 

मागच्या काही दिवसांत सोन्या चांदीच्या दरांनी धुरळा उडवला होता. ज्या काही वेगानं चांदीचे दर खाली कोसळले आहेत त्यामुळे गुंतवणूकदारांचं कोट्यवधींचं नुकसान झालं आहे.

 

तर ऐन लग्नसराईत भाव कमी झाल्याने खरेदीदारांची चांदी झाली आहे. सोन्या-चांदीच्या बाजारातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सलग दोन दिवस वधारल्यानंतर, आज १० फेब्रुवारी रोजी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. MCX वर सोन्याचे दर

मणिपूरमध्ये राष्ट्रपती शासन…;

 

गुंतवणूकदार आणि खरेदीदारांची नजर असलेल्या एमसीएक्सवर सोन्याचा भाव १,५७,३०० रुपये प्रति १० ग्रॅम वर पोहोचला आहे. तर चांदीमध्ये मोठी पडझड होऊन ती २,५७,८९१ रुपये प्रति किलो वर व्यवहार करत आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्यासाठी सर्वात मोठी अट

गेल्या काही दिवसांपासून सोन्याने ५,५९४ डॉलरचा ऐतिहासिक टप्पा गाठल्यानंतर आता दरात काही प्रमाणात ‘करेक्शन’ म्हणजेच घट दिसून येत आहे.

MCX वर १० फेब्रुवारी रोजी सोन्याचा दर किती रुपये प्रति १० ग्रॅम झाला?
A१,५७,३००
B१,६०,०००
C१,५५,०००
D१,५८,५००

 

सरकारी यंत्रणा हादरली ;लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा
का कोसळले भाव?
अमेरिकन डॉलरच्या मूल्यात ०.२ टक्क्यांची वाढ झाल्याने परदेशी खरेदीदारांसाठी सोने महाग झाले आणि मागणी घटली. बुधवारी अमेरिकेतील रोजगाराची आकडेवारी आणि शुक्रवारी महागाईचा डेटा येणार आहे.

 

या आकडेवारीपूर्वी गुंतवणूकदारांनी वेट अॅण्ड वॉचची भूमिका घेतली आहे. अमेरिकेतील फेडरल रिझर्व्ह जून महिन्यापर्यंत व्याजदरात कपात करू शकते, अशी चर्चा बाजारात आहे. या संकेतांमुळे गुंतवणूकदार सध्या सावध पावले टाकत आहेत.

रशियात मेडिकल कॉलेजच्या भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला

लग्नासाठी दागिने खरेदी करणाऱ्या कुटुंबांसाठी ही घसरण एक छोटीशी संधी ठरू शकते. मात्र, तज्ज्ञांच्या मते बाजारात अजूनही अस्थिरता कायम आहे. चांदीमध्ये काल ७ टक्क्यांची मोठी तेजी होती, मात्र आज ती पुन्हा २.५ टक्क्यांनी खाली आली आहे.

मुस्लिमांनाही संघात प्रवेश मिळणार? संजय राऊत यांचा सवाल

त्यामुळे मोठ्या गुंतवणुकीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. एकीकडे सुळे कुटुंबात लग्नाची धामधूम सुरू असताना आणि दुसरीकडे बाजारातील हे चढ-उतार सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.

 

आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याचे दर ५,०१६ डॉलर प्रति औंसवर आल्याने येणारे दोन-तीन दिवस भारतीय बाजारपेठेसाठी अत्यंत कळीचे ठरणार आहेत.

सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीचे टायमिंग चुकले असते तर शरद पवारांनी भाकरीच फिरवली असती

 

Related Articles