RSS च्या कार्यक्रमाला सलमान खान

Salman Khan at RSS event

 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत आयोजित दोन दिवसांच्या विशेष कार्यक्रमाला अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. या कार्यक्रमाला वेगवेगळ्या क्षेत्रातील 900 हून अधिक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती.

 

सलमान खान, अक्षय कुमार, रणबीर कपूर, विकी कौशल, करण जोहर, शिल्पा शेट्टी, रवीना टंडन, रुपाली गांगुली, जॅकी श्रॉफ, विनीत कुमार सिंह, अनन्या पांडे, प्रीतम आणि अदनान सामी यांसारख्या मनोरंजनसृष्टीतील सेलिब्रिटींनीही या सोहळ्याला हजेरी लावलेली.

सुप्रिया सुळें होणार सासू ,ची मुलगी रेवती सुळेंचं लग्न ठरलं

न्यायव्यवस्था, राजकारण, कला, कॉर्पोरेट आणि इतर क्षेत्रांतील मान्यवरही या कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र हे सर्व सेलिब्रिटी या कार्यक्रमाला उपस्थित असण्याच्या मुद्द्यावरुन आता ठाकरे बंधुंनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सरसंघचालक मोहन भागवतांना खोचक टोला लगावला आहे.

 

एकीकडे राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमधून सेलिब्रिटींच्या उपस्थितीवरुन डिवचलं असतानाच ठाकरेंच्या शिवसेनेनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून ठाकरेंच्या शिवसेनेनं या कार्यक्रमावर खोचक टीका केली आहे.

 

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे एक चमत्कारिक विषय आहे. मोदींचे सरकार देशावर आल्यापासून चमत्काराने गती पकडली आहे. आम्ही एक एन.जी.ओ. म्हणजे स्वयंसेवी संस्था आहोत.

सोन्या -चांदीमुळे कोट्यवधींचं नुकसान, जगभरात टेन्शन वाढले

राजकारणाशी वगैरे आमचा संबंध नाही, असा दावा करणाऱ्या या संघटनेचे हे शताब्दी वर्ष आहे. संघ शताब्दी वर्षानिमित्त आयोजित एका संवाद कार्यक्रमानिमित्त मुंबईत सर्वच क्षेत्रांतील हजारभर लोक एकत्रित आले व त्यांना सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी संबोधित केले.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वाटचाल, प्रवास, स्थापनेपासून ते आजपर्यंत राष्ट्रनिर्मितीमधील त्यांच्या सहभागाचा प्रवास सरसंघचालकांनी उलगडून दाखवला. हा प्रवास ऐतिहासिक, प्रेरणादायक, संघर्षमय वगैरे असल्याचे त्यांनी सांगितले. सरसंघचालक सांगतात, ‘‘संघाचे कार्य देशासाठी आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत 19 निर्णय

कोणालाही विरोध न करता संघाचे कार्य चालते.’’ अर्थात हे विधान फक्त बोलण्यापुरते आहे. डॉ. भागवत यांच्या या ‘लेक्चर’ला अनेक मान्यवरांनी हजेरी लावली. त्यात प्रख्यात अभिनेते सलमान खानसह अनेक सितारे अवतरले. संघास शंभर वर्षे झाली,

 

पण मोदी युग येण्याआधी यापैकी कोणीच संघ कार्यक्रमास उपस्थित राहिल्याची नोंद नाही. त्यामुळे एका अनामिक भीतीपोटी हे सर्व लोक संघ शताब्दी सोहळय़ास उपस्थित राहिले काय? ‘उगाच झंझट नको’ ही भावना त्यात जास्त असावी,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

रेल्वेने अचानक बदलले काही नियम, प्रवास करण्याआधी हे वाचा

“अभिनेता रणबीर कपूर हजर होता. राज कपूर हे त्याचे आजोबा. याआधी कोणत्याही भाजप किंवा संघाच्या व्यासपीठावर कपूर दिसले नव्हते. कारण स्वतः राज कपूर हे डाव्या विचारसरणीचे, पक्के कम्युनिस्ट होते.

 

त्यांच्या चित्रपटांतून या विचारांची झलक नेहमी दिसली, पण हे छोटे कपूर संघ सोहळ्यास हजर होते. अनेक वैज्ञानिक, कायदेपंडित, लेखक, उद्योगपती या शताब्दी सोहळ्यास उपस्थित होते.

 

डॉ. भागवत यांनी या महनीय व्यक्तींसमोर ‘लेक्चर’ म्हणजे संबोधन केले. त्यातील काही मुद्दे खरेच चमत्कारिक व संभ्रमित करणारे आहेत,” असं म्हणत ‘सामना’च्या अग्रलेखातून सरसंघचालक मोहन भागवतांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमावर निशाणा साधण्यात आला आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी खरंच कट शिजवला गेला?

..
‘‘हिंदू-मुसलमान वेगळे नाहीत. जे मुस्लिम येथील प्रथा-परंपरा, रूढी आणि संस्कृती आपली मानतात ते आपलेच आहेत. त्यामुळे त्या सर्वांना आपले मानले पाहिजे,’’ असे शब्दसुद्धा डॉ. भागवत उद्गारतात, पण फक्त सलमान खानला आमंत्रित करून हे शक्य होणार नाही. सलमान खान हा एक ‘शो व्यापार’ आहे.

 

सलमानच्या संघमंचावर येण्याने संघाचे दरवाजे मुसलमानांसाठी उघडे होणार आहेत काय? ‘हिंदू-मुसलमान’ असे द्वेषाचे राजकारण पंतप्रधान मोदी, अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस करतात.

 

आसामच्या मुख्यमंत्र्यांनी स्वतःचे एक पोस्टर झळकावले त्यात मुख्यमंत्र्यांच्या हातात बंदूक असून ते मुसलमानांवर नेम धरत असल्याचे दाखवले व संघाचे पंतप्रधान त्यावर गप्प आहेत.

‘ट्रेड डील’ बळीराजाशी विश्वासघात

रिक्षावाला मुसलमान असेल तर त्याला भाड्याचे पैसे देऊ नका, असे आसामचे मुख्यमंत्री एखाद्या गुंडाच्या आवेशात सांगतात व कायदा नपुंसक होऊन हे सहन करतो.

 

पुन्हा केंद्रातील सत्ताधारी त्यावर गप्प आहेत. सत्तेवर संघ विचाराचे लोक आहेत हे काय डॉ. भागवत यांना माहीत नाही?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

अर्थसंकल्पातील 7 सर्वात मोठ्या घोषणा

राज ठाकरेंनीही मोहन भागवतांनी भाषेची सक्ती हा आजार असल्याची टीका केल्याचा उल्लेख तर संताप व्यक्त करताना पहिल्याच परिच्छेदात सेलिब्रिटींच्या उपस्थितीवरुन टोमणा मारला आहे.

 

“या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलावण्यात आले होते, त्यातले काही हजर देखील होते. परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की ती सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती!

राहुल गांधींच्या आव्हानामुळे मोदी बँक फुटावर, मोदींच्या भाषणाशिवाय लोकसभेत आभार प्रस्ताव गुंडाळला

नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत? त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या,” असा खोचक सल्ला दिला आहे.

 

 

Related Articles