राष्ट्रवादीतील एका गटाकडून अजित दादांच्या अपघाताबाबत शंका

A group within the Nationalist Congress Party has doubts about Ajit Dada's accident.

 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका गटाकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या शंका आणि होणाऱ्या आरोपाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुख संमती आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

IT कंपन्यांना बुरे दिन, पाच दिवसात 3 लाख कोटी गमावले

कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदार अमोल मिटकरी , रुपाली ठोंबरे , सूरज चव्हाण यांच्याकडून अजित पवारांचा घातपात झाल्याचा दररोज सोशल मीडियातून आरोप होत आहेत.

 

यात आमदार मिटकरी, रुपाली ठोंबरे आणि सुरज चव्हाण यांच्याकडून व्यक्त होणाऱ्या आरोपांवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वरिष्ठ फळी नाराज असल्याचीही विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

अजित दादांच्या विमान अपघाताच्या चौकशीला विलंब का?; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा सवाल

दरम्यान, वरिष्ठांची नाराजी लक्षात येऊन सुद्धा मिटकरी, ठोंबरे, चव्हाण यांच्याकडून आरोपांची मालिका सुरूच आहे. मात्र अद्याप तरी या आरोपाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून कुठलीही प्रतिक्रिया

 

किंवा पक्षातील नेत्यांना सूचना न दिल्याची शक्यता आहे. त्यामुळे या आरोपाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची मुख संमती आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

 

दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आज पुन्हा एक पोस्ट करत या प्रकरणावर भाष्य केलं आहे. ‘माझ्या पक्षातील वरिष्ठ नेत्यांची फळी मी आदरणीय दादांच्या घातपाताचा संशय व्यक्त केल्याने

राहुल गांधींच्या आव्हानामुळे मोदी बँक फुटावर, मोदींच्या भाषणाशिवाय लोकसभेत आभार प्रस्ताव गुंडाळला

नाराज असल्याची पेड न्यूज़ जाणीवपूर्वक चालवल्या गेली आहे. वरिष्ठ नेत्यानी सुद्धा हीच मागणी केली आहे. त्यांची नाराजी असण्याचं कारण नाही.

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा या कठीण काळात एकसंघच आहे. मला हा प्रश्न का विचारलाय असा कुणी फोनकरून नाराजी व्यक्त केलेली नाही. सत्य प्रश्न विचारणे हा गुन्हा नाही. असेही मिटकरी म्हणालेय.

 

रशियात मेडिकल कॉलेजच्या भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ला
माझ्या नावाने पेड न्यूज पसरवून गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. मी कोणावरही बिनबुडाचे आरोप केलेले नाहीत आणि करणारही नाही. माझी भूमिका स्पष्ट, पारदर्शक आणि जनतेसमोर आहे.

 

अफवा पसरवणाऱ्यांना जनता योग्य उत्तर देईल. दादांच्या अकाली जाण्याची सत्यता जनतेसमोर आलीच पाहिजे, त्यासाठी माझा लढा कायम राहील.

सोन्या -चांदीमुळे कोट्यवधींचं नुकसान, जगभरात टेन्शन वाढले

आणि माझा पक्ष व पक्षातील वरिष्ठ फळीतील नेते माझ्या पाठीशी राहतील याबाबत माझ्या मनात दुमत नाही. असेही अमोल मिटकरी म्हणाले.

 

 

Related Articles