कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’
Cabinet Minister Narhari Jirwal 'unreachable'

मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात गुरुवारी झालेल्या ‘एसीबी’ च्या कारवाईने संपूर्ण प्रशासन हादरले आहे. मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनात कार्यरत असलेल्या राजेंद्र ढेरंगे या लिपिकाला
३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला १६ फेब्रुवारी २०२६ पर्यंत कोठडी सुनावली आहे.
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय;पोलिस चौकशीसाठी कोणालाही अटक करू शकत नाही
अटक करण्यात आलेल्या लिपिकाने चौकशीदरम्यान दावा केला आहे की, त्याने ही लाच मंत्री झिरवाळ यांचे खासगी सचिव (PS) रामदास गाडे यांच्या सांगण्यावरून स्वीकारली होती.
या विधानामुळे प्रकरणाची व्याप्ती आता मंत्र्यांच्या जवळच्या वर्तुळापर्यंत पोहोचली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंत्रालयातील मंत्र्यांचे कार्यालय तपासासाठी सील केले आहे.
RSS च्या कार्यक्रमाला सलमान खान
कोणत्याही कॅबिनेट मंत्र्याचे कार्यालय अशा प्रकारे सील करण्याची ही दुर्मिळ घटना मानली जात आहे. या कारवाईनंतर शुक्रवारी झिरवाळ यांनी दिल्लीतून प्रतिक्रिया दिली होती की,
“माझा संबंध आढळल्यास मी राजीनामा देईन.” मात्र, आज शनिवार (१४ फेब्रुवारी) सकाळपासून त्यांचा फोन ‘नॉटरिचेबल’ असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
‘तुम्ही देश विकून टाकला , लाज वाटत नाही का?’ राहुल गांधीं मोदी सरकारवर बरसले
मिळालेल्या माहितीनुसार ACB ने अटक केलेल्या अन्न आणि औषध प्रसासनातील कर्मचारी राजेंद्र ढेरंगे याने एका मेडिकलचा निंलंबित परवाना पुन्हा सुरू करून देण्यासाठी त्याने ५० हजारांच्या लाचेची मागणी केली होती.
त्यातील ३५ हजारांची लाच घेताना तो रंगेहात एसीबीच्या जाळ्यात अडकला होता. दरम्यान, राज्याच्या मंत्रिमंडळाच्या इमारतीमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी कारवाई केली.
‘तुम्ही देश विकून टाकला , लाज वाटत नाही का?’ राहुल गांधीं मोदी सरकारवर बरसले
यामुळे संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या दालनातील एका कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडण्यात आले आहे.
ही लाच स्वीकारताना संबंधित लिपीकाला रंगेहात पकडल्यामुळे मंत्रीमंडळात खळबळ उडाली. यामुळे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर देखील ताशेरे ओढले जाऊ लागले.
यावरुन झिरवळ यांनी प्रतिक्रीया दिली आहे. ते म्हणाले की, “संबंधित कर्मचारी हा सरकारी कर्मचारी असून त्याच्या वैयक्तिक कृत्याशी माझा किंवा माझ्या सचिवांचा संबंध नाही.
मात्र, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी. जर या लाचखोरीच्या प्रकरणात माझ्यापर्यंत किंवा माझ्या कार्यालयातील इतर कोणापर्यंत धागेदोरे पोहोचले, तर मी तात्काळ मंत्रीपदाचा राजीनामा देईन,” अशी स्पष्ट भूमिका नरहरी झिरवाळ यांनी घेतली आहे.
‘तुम्ही देश विकून टाकला , लाज वाटत नाही का?’ राहुल गांधीं मोदी सरकारवर बरसले









