मेट्रो लाईनचा स्लॅब वाहनांवर कोसळला; एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी, Video
Metro line slab collapses on vehicles; One dead, many injured, Video

मुंबईतील मुलुंड पश्चिम येथे शनिवारी दुपारी मोठी दुर्घटना घडली. मुंबई मेट्रो लाईन ४ च्या बांधकामादरम्यान एका खांबाचा काँक्रीट स्लॅब कोसळून तो थेट रस्त्यावरून जात असलेल्या वाहनांवर आदळला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून इतर ३ जण जखमी झाले आहेत.
ही घटना दुपारी १२.१५ ते १२.२० वाजण्याच्या सुमारास लाल बहादूर शास्त्री (एलबीएस) मार्गावर जॉन्सन अँड जॉन्सन कारखाना आणि ओबेरॉय परिसराच्या जवळ घडली.
एअर इंडिया विमान अपघाताबद्दल धक्कादायक बातमी
मिळालेल्या माहितीनुसार, सुरू असलेल्या बांधकामादरम्यान मेट्रो खांबाचा एक सिमेंटचा भाग अचानक कोसळला आणि तो रस्त्यावरून जात असलेल्या एका रिक्षावर तसेच कारवर पडला. स्लॅब थेट वाहनांवर कोसळल्याने ऑटोरिक्षाचालक आणि एक महिला ढिगाऱ्याखाली अडकले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलीस, महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम आणि १०८ अँब्युलन्स घटनास्थळी दाखल झाले.
सोयाबीनच्या दरात घसरण सुरूच
माहितीनुसार, या अपघातात रामधन यादव यांचा मृत्यू झाला असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित करण्यात आले होते. तर या घटनेतील इतर जखमींची ओळख पटली असून, राजकुमार यादव (वय ४५) यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे.
16th January, BJP won BMC polls :
Mumbai will be the city on the earth, no more corruption,no more accidents
*Exactly after 28 days*
Boundary pillar of under construction metro has fell on car and auto rickshaw in Mulund
Just look at visuals 💔
— Amock_ (@Amockx2022) February 14, 2026
तर महेंद्र प्रताप यादव (वय ५२) आणि दीपा रुहिया (वय ४०) यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) यांनी एक्स (X) वर जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ही घटना दुपारी १२.१५ च्या सुमारास पियर P196 जवळ घडली. या घटनेत पॅरापेट सेगमेंट उंचीवरून खाली कोसळला आणि खाली रस्त्यावरून जाणाऱ्या ऑटोरिक्षावर आदळला.
आता रेशनकार्ड धारकांना तांदळाऐवजी गव्हासोबत मिळणार हे धान्य
भीषण दुर्घटनेनंतर एमएमआरडीए (MMRDA) ने दुसरे अधिकृत निवेदन जारी केले आहे. MMRDA च्या माहितीनुसार, या दुर्घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचे नेतृत्व बसवराज एम. भद्रगोंड, संचालक, एमएमआरडीए (मेट्रो पी.आय.यू) हे करणार आहेत.
🚨 Mumbai Metro Line-4 concrete slab has fallen on cars below on LBS Marg, Mulund West near Johnson & Johnson/Oberoi. 1:15 PM.
Immediate site safety action needed. @MMRDAOfficial @mybmc @MTPHereToHelp pic.twitter.com/mSaC5eaYeF
— Mumbai Rains (@rushikesh_agre_) February 14, 2026
MMRDA ने सांगितले की, मृतांच्या कुटुंबियांना एमएमआरडीएकडून आर्थिक मदत दिली जाईल. तसेच जखमींच्या उपचारांच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी एमएमआरडीए पूर्णपणे उचलेल, असेही प्राधिकरणाने स्पष्ट केले.
शरद पवार पुन्हा राज्यसभा लढणार
या घटनेबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःख व्यक्त केले असून या घटनेच्या चौकशीचे आदेश त्यांनी दिले आहेत. मृताच्या वारसांना राज्य सरकार ५ लाख रुपये आर्थिक मदत करेल आणि जखमींच्या उपचाराचा खर्च राज्य सरकारकडून केला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितले आहे. तसेच, जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
कॅबिनेट मंत्री नरहरी झिरवाळ ‘नॉटरिचेबल’
अपघातानंतरचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यात अपघातात चिरडलेली कार, दबलेल्या ऑटोरिक्षामधून बाहेर काढला जाणारा चालक, रस्त्यावर कोसळलेला काँक्रीट स्लॅब आणि नागरिकांची मोठी गर्दी अशी दृश्ये दिसत आहेत.
Any Mulund resident can confirm. There was no construction going on in the patch of Metro and this was ready and colored too. Still a metro slab fell! COLLAPSING MUMBAI IS THE NEW MUMBAI#mulund #Mumbai #MulundMetroslab pic.twitter.com/zsAcf5SFNs
— Hardik (@HeartOut_Loud) February 14, 2026
एलबीएस रोड हा मुलुंडमधील सर्वाधिक वाहनांची रेलचेलअसलेला मार्ग असून अपघातानंतर या ठिकाणी वाहतूक विस्कळीत झाली. अनेक वाहने लांब रांगेत अडकली. परिस्थिती लक्षात घेऊन पोलिसांनी परिसर सील करून वाहतूक वळवण्याची व्यवस्था केली.









