अजित पवारांच्या मृत्यूच्या दोन दिवस आधी पोस्ट, 7.30 मिनिटांनी डिलीट…;

Post two days before Ajit Pawar's death, deleted at 7.30...;

 

 

अजित पवारांच्या अकाली निधनानंतर रोहित पवारांनी अनेक शंका उपस्थित केल्या असून, काही गंभीर आरोप आणि दावेही केले आहेत.

मेट्रो लाईनचा स्लॅब वाहनांवर कोसळला; एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी, Video

दरम्यान यानंतर आपल्याला व्हीएसआरचा बचाव करण्यासाठी भाजपा ट्रोलर्सकडून लक्ष्य केलं जात असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला आहे.

 

यावेळी त्यांनी समित ठक्कर नावाच्या एकाचा उल्लेख केला. त्याने अजित पवारांच्या विमान दुर्घटनेच्या दोन दिवस आधी ‘महाराष्ट्रात काही मोठं घडणार आहे’ अशी पोस्ट केली होती. रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत आपण त्याला शोधून काढणार असा इशारा दिला आहे.

 

धावत्या इलेक्ट्रिक बसला भीषण आग:VIDEO

“मी एकदा विमानाने प्रवास केला होता. माझ्यासोबत एक सेलिब्रिटी खेळाडू होता. बारामतीत उतरुन आम्ही माझ्या मतदारसंघात गेलो होतो.

 

मला विचारतो, तू प्रवास करताना तुला कळलं नव्हतं का? म्हणजे माझा आणि त्या क्रिकेटपटूचाही अपघात व्हावा अशी तुझी अपेक्षा होती का? हे असले थर्ड क्लास पैसे काम करणारे ट्रोल याचा अभ्यास केला तेव्हा ते भाजपाच्या प्रमुख नेत्यांचे आहेत असं आढळलं. देवेंद्र फडणवीस यांना याबाबतची माहिती नसावी असं मला वाटतं.

मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच अजितदादांच्या सह्या केल्या

पण लोकांना प्रश्न पडत आहेत. मला भाजपाचे का ट्रोल का करत आहेत? याने पोस्ट टाकली की पैसे घेऊन काम करणारे रिट्वीट करतात”, असं त्यांनी समित ठक्करची पोस्ट दाखवत सांगितलं.

 

पुढे ते म्हणाले की, “याच माणसाने अपघाताच्या दोन दिवस आधी अशी एक पोस्ट डिलीट केली होती, जी त्याने साडे सात मिनिटांनी डिलीट केली. त्यात त्याने लिहिलं होतं की, महाराष्ट्रात अशी घटना घडणार आहे

पुढील 24 तासात हवामानात होणार मोठा बदल

ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो. आमच्याकडे याचे पुरावे आहेत. हे सगळे अहिल्यानगरचे असून, भाजपाचे ट्रोलर्स आहेत. त्यांचे पेजेस काढतात आणि पैसे घेऊन काम करतात”.

 

अजित पवार यांच्या मृत्यूप्रकरणी मोठ्या धक्कादायक खुलाशाने खळबळ
“यामुळे लोकांमध्ये वेगळी शंका निर्माण होत आहे. मी भावनेच्या भरात अराजकीय मुद्दे माडंत असताना ट्रोल करण्यामागील कारण काय? समित ठक्करला आम्ही सोडणार नाही.

 

त्याची माहिती काढणार. हे आज मला ट्रोल करत वेड लागलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तुला पैसे घेऊन काम कऱण्याचं वेड लागलं असून, मला माझ्या दादाला, काकाला काय झालं हे शोधण्याचं लागलं आहे.

EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुक मतदान ,भाजपला जबरदस्त धक्का

हो प्रेमापोटी मला वेड लागलं आहे. तुम्हाला हवा तेवढा पैसा वापरा. माझे आजोबा फार मोठे आहेत, काका मोठे होते आणि मी रोहित पवार आहे. मी महाराष्ट्राचा स्वाभिमानी नागरिक आहे.

 

दादांच्या अपघाताची चौकशी कऱण्याची मागणी करणारे महाराष्ट्राचे तमाम स्वाभिमानी नागरिक आहेत. असे ठक्करसारखे चिरकूट पैसे देऊन काम कऱणारे नाहीत,” असंही त्यांनी सुनावलं.

 

‘लालपरी’ची चाके थांबणार?
आम्ही प्रवास करताना प्रशासनाकडे दिलेली खासगी माहिती ट्रोलरला कशी दिली जाते? आमची कागदपत्रं यांच्याकडे कशी पोहोचली? प्रशासनात असं कोण आहे? जरा लाज वाटली पाहिजे. फुकटात माहिती दिली जात असेल तर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत असंही ते म्हणाले.

 

 

Related Articles