राज ठाकरे-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊत म्हणाले,महाराष्ट्राशी बेईमानी केली…
Sanjay Raut said on Raj Thackeray-Eknath Shinde meeting, they were dishonest with Maharashtra…

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अचानक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. काल या भेटीचे फोटो सर्वत्र झळकले आणि राजकीय चर्चांना उधाण आले.
महामंडळाच्या बस प्रवास सवलतीसाठी ‘NCMC’ कार्ड आवश्यक
या सर्व घाडमोडींवर उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी आज सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत याविषयावर त्यांचे मत मांडले. काय म्हणाले राऊत?
यावेळी पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. तर त्याचवेळी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर मात्र त्यांनी मौन बाळगल्याचे दिसले. त्यांना या भेटीवर प्रश्न विचारला असता तुम्ही राज ठाकरेंना विचारा, मी इतकंच सांगतो की आम्ही त्यांची हेरगिरी करत नाही.
अजित पवारांच्या विमान अपघात :रोहित पवारांचा नरेश अरोरांवर हल्लाबोल
कोण कुणाला भेटतं त्यावर आमचं बंधनं नाहीत. एकनाथ शिंदे प्रवृत्तीशी यांच्या विरुद्ध आमच टोकाचं भांडण आहे. एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला. त्यांनी मराठी माणूस महाराष्ट्राशी बेइमानी केली.
जे नंदनवन तुम्ही सांगतात ते शिवसेना चोरीतून झालेलं आहे. या भांडणात आमचा जय होईल. या भेटीबाबत मला काही वाटत नाही. मी त्या विषयाकडे पाहत नाही. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. त्यांच्या पक्षात काय सुरू आहे. तो त्यांचा निर्णय आहे, असे खासदार संजय राऊत म्हणाले.
पहिल्या शासकीय कार्यक्रमात भाषण करतांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार भावूक
तर शरद पवार हे राज्यसभेवर जाणार अशा चर्चा रंगल्या आहेत. त्यावर राऊत यांनी मत व्यक्त केलं. शरद पवार महाविकास आघाडीत आहेत. त्यांच्या पक्षाकडून अजून कोणी जाहीर केलं नाही की आम्ही महाविकास आघाडीत नाही. काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना महाविकास आघाडीत आहेत.
एकत्र बसून निर्णय घेऊ. शरद पवार यांनी माझ्या कडे इच्छा व्यक्त केली की मी राज्यसभेत इच्छुक आहे. शरद पवार भाजप सोबत जाणार नाही. हे मी खात्रीने सांगतो. काँग्रेसने ती भीती बाळगू नये. उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात असणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन,VIDEO समोर
या बद्दल मी उद्धव ठाकरे यांच्याशी एकदा बोललो आहे. एक दोन दिवसात तुम्हाला मत सांगू. महाविकास आघाडी म्हणून ती जागा म्हणून आम्ही लढणार असं ठरलं तर एकत्र बसून चर्चा होईल. राज्यसभेच्या जागेवर कोण जाईल इतर पक्षाचं मत यावर चर्चा होईल असे ते म्हणाले.








