राज्यसभेसाठी भाजपकडू रामदास आठवलेंचं नाव निश्चित?ऐनवेळी दोन नवीन नावं
BJP's bitter rival Ramdas Athawale's name confirmed for Rajya Sabha? Two new names in the election

महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी येत्या 16 मार्च रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अवघे सहा दिवस शिल्लक राहिल्यामुळे भाजपकडून त्यांच्या कोट्यातली 4 जागांवरील उमेदवारांची नावे ठरवण्यासाठी चर्चा सुरु होती.
विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती
यासंदर्भात मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह 12 प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती.
कालपासून भाजप रामदास आठवले आणि विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवणार अशी जोरदार चर्चा होती. तर विजया रहाटकर यांचे नावही राज्यसभेसाठी जवळपास निश्चित मानले जात होते. मात्र, वर्षा बंगल्यावर कालच्या बैठकीत ऐनवेळी दोन आणखी नावे राज्यसभा उमेदवारीसाठी समोर आली आहे.
यामध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे आणि भागवतराव कराड यांचा समावेश आहे. यापैकी रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांचे नाव निश्चित आहे.
अजितदादांच्या अपघातावर बोलताना रोहित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
मात्र, उर्वरित तीन जागांवर विनोद तावडे, विजया रहाटकर, रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्यापैकी कोणाला संधी मिळणार, हे आता पहावे लागेल.
राज्यसभा उमेदवारांची अंतिम निवड करण्यासाठी रविंद्र चव्हाण आता दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची भेट घेणार असल्याचे समजते. त्यामुळे पुढील एक-दोन दिवसांमध्ये भाजपच्या राज्यसभा उमेदवारांच्या नावांची घोषणा होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीच्या आमदारांची आज विधानभवनात बैठक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते. ठाकरेंच्या सेनेकडून आदित्य ठाकरे हे राज्यसभेची एक जागा शिवसेनेला मिळावी म्हणून आग्रही आहेत.
मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन,VIDEO समोर
मात्र, मविआकडून राज्यसभेच्या निवडणुकीसाठी शरद पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. शरद पवार हे सध्या रुग्णालयात आहेत. त्यामुळे ते राज्यसभा निवडणूक लढणार की नाही, हे अद्याप निश्चित नाही.
शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे आज त्यांच्याशी चर्चा करतील. त्यासाठी शरद पवार गटाने काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून वेळ मागून घेतला आहे. विधानसभेतील आमदारांच्या संख्याबळानुसार महाराष्ट्रातील 7 जागांपैकी सहा जागांवर महायुती आणि एका जागेवर महाविकास आघाडीचा खासदार निवडून जाऊ शकतो.
मंत्रालयातील झिरवळांच्या कार्यालयातील लाचखोरीचं स्टिंग ऑपरेशन,VIDEO समोर
राज्यसभेच्या एकूण जागा : 7
विद्यमान विधानसभा सदस्य : 286
(अजित पवार आणि शिवाजी कर्डिले या दोन जागा रिक्त)
कोटा : 3576 (म्हणजे 3600 मते) ( येथे एका आमदाराचे मत म्हणजे 100, म्हणून 36 आमदार हा कोटा)
(फॉर्म्युला : 286 गुणिला 100/भागिला 7 जागा+1/अधिक+1)
(अर्थात एकूण झालेल्या मतदानावरुन कोटा निश्चित होतो)
एअर इंडिया विमान अपघाताबद्दल धक्कादायक बातमी
भाजपा : 136 (कर्डिले 1 वगळता)
तीन जागांसाठी लागणार : 108
भाजपाकडे अतिरिक्त मते : 28
शिवसेना : 56
एक जागेसाठी लागणार : 36
अतिरिक्त मते : 20
महामंडळाच्या बस प्रवास सवलतीसाठी ‘NCMC’ कार्ड आवश्यक
राष्ट्रवादी : 40 (अजित पवार वगळता)
एक जागेसाठी लागणार : 36
अतिरिक्त मते : 4
…..
महायुती : 52 अतिरिक्त मते
सहाव्या जागेची 36 मते वजा केली तरी 16 मते अतिरिक्त
म्हणजे सातवा उमेदवार निवडून आणायचा असेल तर 20 मते अतिरिक्त आणावी लागतील.
राज ठाकरे-एकनाथ शिंदे भेटीवर संजय राऊत म्हणाले,महाराष्ट्राशी बेईमानी केली…
…..
उबाठा : 20
एका जागेसाठी अतिरिक्त लागतील : 16
शरद पवार : 10
एका जागेसाठी अतिरिक्त लागतील : 26
राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी सुनेत्रा पवार यांना 5 आमदारांचा विरोध? रोहित पवारांचा बॉम्ब
काँग्रेस : 16
एका जागेसाठी अतिरिक्त मते लागतील : 20
(त्यामुळे महाविकास आघाडीचा एक उमेदवार जिंकायचा असेल तर दोन शक्यता: तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन एक उमेदवार देणे, किंवा काँग्रेस आणि उबाठा हे दोनच पक्ष एकत्र आले तरी 36 असे काठावरचे बहुमत त्यांना लाभते)









