गॅस सिलिंडर 115 रुपयांनी महागला

Gas cylinder price hiked by Rs 115

 

 

इराणवर अमेरिका-इस्त्रायलने हल्ला चढवत युद्ध सुरू केलं. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या या युद्धाच्या झळा हळहूळ संपूर्ण जगाला बसत असून आता या युद्धाचे चटके भारतीयांनाही बसताना दिसणार आहेत.

इराणने डोनाल्ड ट्रम्पची मस्ती उतरविली ,वाचण्यासाठी ट्रम्प करतायेत प्रार्थना ;पाहा VIDE

हे युद्ध आणखी लांबण्याची शक्यता आहे. इराण युद्धामुळे गॅस तुटवड्याची शक्यता असून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. घरगुती आणि व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली असून त्यामुळे देशातील नागरिकांना मातार मोठा फटका बसणार आहे.

 

घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात 60 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. तर 19 किलोचा व्यावसायिक सिलेंडर आता 115 रुपयांनी वाढणार आहे.

उमराह साठी सौदी अरेबियाला गेलेले 50 हजार महाराष्ट्रातील मुस्लिम बांधव युद्धामुळे अडकले

आजपासूनच हे नवे दर लागू होणार आहेत. मात्र यामुळे देशभरातील सामान्य नागरिकांना मोठा फटका बसणार असून हॉटेलिंग , बाहरेचं खाण-पिण हेही महागू शकतं.

 

यामुळे लोकांमध्ये संतापाचे वातावरण असून सामान्य नागरिकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. घरगुती गॅस सिलेंडरची दरवाढ आम्हाला परवडणारी नाही. सामान्य कुटुंबातील महिलांचं आर्थिक गणित कोलमडलं आहे.

 

एकीकडे लाडकी बहीण योजना सरकारने सुरू केली आहे. दुसरीकडे मात्र गॅस सिलेंडरच्या भावामध्ये वाढ झाली आहे यामुळे आमचं आर्थिक नुकसान होत आहे. आता आम्ही चुलीवरती स्वयंपाक करायचा का ? असा रोखठोक सवाल संतप्त महिलांना, गृहिणींनी विचारला आहे.

 

दरम्यान अमेरिका–इराण–इस्रायल तणावाच्या पार्श्वभूमीवर गॅस तुटवड्याची अफवा पसरली आहे. सोशल मीडियावरील मेसेजमुळे नागरिक घाबरले असून कल्याण–डोंबिवलीत नागरिकांनी बुकिंगसाठी धाव घेतली आहे.

आरोप करणाऱ्या रोहित पवारांवर तटकरेंचा पलटवार

मात्र प्रत्यक्षात घरगुती गॅस सिलेंडरचा कुठलाही तुटवडा नाही, घरपोच गॅस पुरवठा नियमित सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आलं आहे.

 

मात्र असं असलं तरीही तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर दोन सिलेंडर घेण्यामधील कालावधी 15 दिवसांवरून 21 दिवसांवर आला आहे. शासनाने नव्या मार्गदर्शक सूचना दिल्या असून नियम लागू होती.

IAS अधिकाऱ्यावर थेट निलंबनाची कारवाई

पण या नव्या नियमांमुळे काही कुटुंबांना अडचण निर्माण झाली असून या नियमात सवलत द्यावी अशी गॅस सिलेंडर एजन्सीची मागणी आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन गॅस वितरण संघटनेने नागरिकांना केलं आहे.

 

नागपुरात गो गॅस पंपावर LPG भरण्यासाठी ॲाटोचालकांची गर्दी झाली होती. मर्यादीत पुरवठा होत असल्याने LPG साठी ॲाटोचालकांनी रांगा लावल्या.

महाराष्ट्रात महिलेची दाेन लाखांत विक्री

Related Articles