दीड कोटींच बिल मंजूर करण्यासाठी 42 हजारांची लाच घेताना रंगेहाथ अटक

Arrested red-handed while accepting a bribe of ₹42,000 to approve a bill worth ₹1.5 crore.

 

 

ठाण्यातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या  धडाकेबाज कारवाईचे सत्र आता नवी मुंबईतही पोहोचले आहे. ठाण्यापाठोपाठ नवी मुंबई महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याने प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे.

राहुल गांधींवरील कारवाईचा हायकोर्टाने स्वतःचाच आदेश बदलला

एका कंत्राटदाराचे थकीत बिल मंजूर करण्यासाठी लाचेची मागणी करणे गायकवाड यांना महागात पडले असून, या कारवाईमुळे भ्रष्टाचाराचा विळखा किती खोलवर गेला आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार कंत्राटदाराने महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागांतर्गत काही कामे पूर्ण केली होती. या कामाचे बिल मंजूर करण्यासाठी डॉ. कैलास गायकवाड यांनी संबंधित कंत्राटदाराकडे मोठ्या रक्कमेची मागणी केली होती.

 

वारंवार पाठपुरावा करूनही लाचेशिवाय बिल पुढे सरकणार नाही, अशी भूमिका गायकवाड यांनी घेतल्याने अखेर त्रस्त कंत्राटदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली.

सुनेत्रा पवारांच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शरद पवारांचा रुग्णालयातून ‘मास्टरस्ट्रोक

एक वर्षापासून अतिक्रमणाचं बिल देणं बाकी होतं. दीड कोटींच बिल मंजूर करण्यासाठी 42 हजार रुपयांची मागणी केली होती. 42 हजार रुपये ठेकेदाराकडून घेताना रंगेहाथ एसीबीने पकडलं.

 

ACB ने तक्रारीची शहानिशा केल्यानंतर नवी मुंबईत सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लाचेची रक्कम स्वीकारताना डॉ. गायकवाड यांना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

या कारवाईत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अत्यंत गोपनीयरीत्या पावले उचलत गायकवाड यांना बेड्या ठोकल्या. सध्या त्यांच्या कार्यालयाची आणि घराची झडती सुरू असून, बेहिशोबी मालमत्तेचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

या प्रकरणात केवळ अटक पुरेशी नसून, अशा प्रकरणांत जलद गतीने कायदेशीर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. ठाणे आणि नवी मुंबई या दोन्ही मोठ्या महानगरपालिकांमध्ये लागोपाठ झालेल्या या कारवायांमुळे एसीबीने भ्रष्ट अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.

आता डोनाल्ड ट्रम्प यांनी थेट 100 टक्के टॅरिफ लावण्याची धमकी

मात्र, प्रशासनातील ही कीड मुळापासून उपटून टाकण्यासाठी केवळ धाडी टाकून चालणार नाही, तर पारदर्शक कार्यप्रणालीची अंमलबजावणी करणे काळाची गरज आहे.

 

डॉ. कैलास गायकवाड यांच्यावरील या कारवाईने नवी मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराच्या अन्य प्रकरणांनाही वाचा फुटण्याची शक्यता आहे.

 

या कारवाईनंत खळबळ उडाली असून, प्रामाणिकपणाचा बुरखा पांघरून नागरिकांकडून लाच उकळणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा एसीबीकडून देण्यात आला आहे. संबंधित प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

आजपासून जमिनीच्या NA प्रक्रियेत बदल

 

Related Articles