ठाकरेंच्या उमेदवाराविरोधात काँग्रेसने दंड थोपटले
The Congress has geared up to take on Thackeray's candidate.

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत 8 मोठे निर्णय
त्यानंतर आता महाविकास आघाडीत मोठी बिघाडी झाल्याचे समोर आले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आता विधानपरिषदेसाठी उमेदवार देणार असल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे आता या निवडणुकीतील रंगत आणखी वाढण्याची शक्यता आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
महाविकास आघाडीकडून उद्धव ठाकरे हे विधानपरिषदेवर जाणार असल्याचे बोलले जात होते, मात्र आता उद्धव ठाकरे यांच्याऐवजी अंबादास दानवे यांना महाविकास आघाडीचे तिकीट देण्यात आले आहे.
ऐतिहासिक निर्णय: मंत्री आणि आमदारांच्या पगारात ५० टक्के कपात
आदित्य ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेसने जाहीर केले होते की उद्धव ठाकरे उमेदवार असल्यास आमचा पाठिंबा असेल, मात्र जर दुसरा कोणी उमेदवार असेल तर आम्ही उमेदवार देणार.
त्यानुसार अंबादास दानवे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करून उमेदवार देणार असल्याची माहिती दिली आहे.
अमेरिकेने आता चीनकडे मोर्चा वळवला! रशिया संतापला, भारताची सुद्धा चिंता वाढली;
विधानपरिषदेच्या उमेदवारीबाबत बोलताना काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी म्हटले की, प्रदेशाध्यक्ष सध्या दिल्लीत आहेत. कदाचित काँग्रेस उमेदवार देईल. आज लोकलेखा बैठकीसाठी मी आलो होतो,
मला बाहेर काय घडलं ठाऊक नाही. दिल्लीच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. आम्ही अस्वस्थ नाही तुम्ही होऊ नका, स्वस्थ रहा. काँग्रेस, महाविकास आघाडी मोठा विषय आहे,
तकलादू नाही. आम्ही जबाबदार आहोत, जबाबदारीने सगळं होईल. अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष करतील, मी नाही. माझ्या माहितीनुसार काँग्रेस पक्ष कदाचित आपला उमेदवार देईल.
१ मे पासून एसटीचे अभियान‘;आपली बस, आपली सेवा’
अंबादास दानवे यांचं नाव जाहीर होताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे यांनी म्हटले की, ‘राज्यसभा निवडणुकीवेळी महाविकास आघाडीने शरद पवार यांनी पाठिंबा दिला होता.
त्याचवेळी आम्ही विधानसभेला शिवसेनेचा जो उमेदवार असेल त्याला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. उद्धव ठाकरे यांनी विधानपरिषेदत असावेत, अशी आमची मागणी होती. मात्र आता अंबादास दानवेंना त्यांनी संधी दिली आहे, तर आमची काही हरकत नाही.’
VIDEO;दिल्ली विमानतळावर उड्डाणाच्या काही क्षणांपूर्वीच विमानाला आग








