डिझेलच्या दरवाढीनंतर आता एसटीचे भाडेवाढ करण्याच्या हालचाली
Following the hike in diesel prices, moves are now underway to increase ST bus fares.


राज्यातील सार्वजनिक वाहतुकीसमोर पुन्हा एकदा खर्चाची मोठी अचडण उभी राहताना दिसत आहे. दरदिवशी शेकडो प्रवाशांना सेवा देणाऱ्या व्यवस्थेवर वाढत्या इंधन दरांचा ताण वाढताना दिसत असून आर्थिक गणित जास्त बिघडत आहेत.
पाहा किती रुपयांनी वाढणार दर
राज्यातील एसटी महामंडळाला वाढत्या डिझेलच्या दरामुळे मोठा आर्खिक फटका बसण्याची शक्यता ही व्यक्त करण्यात येत आहे. सध्या पाहिले तर डिझेल खरेदी दरात प्रति लिटर सरासरी 3.11 रुपयांनी वाढ झाली आहे,
मनोज जरांगे यांना भाजपच्या विजयावर शंका
त्यामुळे एसटीच्या खर्चात मोठी भर पडणार आहे. याच वाढीमुळे महामंडळावर सुद्दा वर्षाला सुमारे 124 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार असल्याने महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी हे सांगितले आहे.
एसटी महामंडळाला साधारण पाहिले तर दररोज 10 लाख 87 हजार डिझेलची गरज भासते. या इंधनावरच वर्षाला जवळपास 3 हजार 400 कोटी रुपयांचा खर्च होतो. त्यातच डिझेलचे दर सातत्याने वाढत असल्याने महामंडळाची आर्थिक परिस्थिती जास्तच कठीण होत जात आहे.
महाराष्ट्र राज्यात डिझेलवरील मूल्यवर्धित कर हा 21 टक्के आहे तर गुजरातमध्ये हाच कर 14.9 टक्के इतका कमी आहे, यामुळे हा खर्च कमी करण्यासाठी एसटी महामंडळाने गुजरातमधून आता डिझेल खरेदी करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
सध्या या संदर्भात परिवहन मंत्री यांनी या प्रस्तावाला मंजूरी दिली असून राज्यातील 251 डिझेल पंपांपैकी 94 पंपांवर कमी दरात डिझेल उपलब्ध होणार आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर बंगालमध्ये हिंसाचाराचा भडका
तरी सुद्धा देशभरात डिझेलचे दर वाढल्याने गुजरातमधून मिळणाऱ्या डिझेलच्या किमतीमध्ये सुद्धा वाढ होणार आहे. सध्याच्या स्थितील एसटीला प्रति लिटर साधारण 88 रुपयांनी डिझेल खरेदी करावे लागते तर नव्या वाढीनंतर हाच दर 91 रुपयांपर्यत जाणार आहे.
एसटी महामंडळावर आधीच पाहिले तर सुमारे 12 हजारो कोटी रुपयांचा संचित तोटा आहे तर 5 हजार कोटी रुपयांची ही वैधानिक देणी राहिलेली आहे आणि अशाच परिस्थितीमध्ये सध्या इंधन दरवाढ एसटीसाठी खूप मोठी धोक्याची घंटा ठरु शकते असे ही बरगे यांनी म्हटले आहे.









