आचारसंहितेपूर्वी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून 23 अधिकाऱ्यांना बम्पर गिफ्ट

Bumper gift to 23 officials from Chief Minister Shinde before code of conduct

 

 

 

 

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता कधीही लागू शकते अशी परिस्थिती असतानाच दुसरीकडे त्या आधीच शिंदे सरकारने राज्यसेवेतील 23 अधिकाऱ्यांना IAS पदी बढती देण्याचा निर्णय घेतला आहे.

 

भारतीय प्रशासकी सेवा (भरती) नियम, 1954 च्या बढतीद्वारे नियुक्तीच्या नियमानुसार या राज्यसेवेतील अधिकाऱ्यांना IAS पदी देण्यात आली आहे.

 

राज्यसेवेतील कोणत्या अधिकाऱ्यांना IAS पदी बढती?
1. संजय ज्ञानदेव पवार
2. नंदकुमार चैतराम भेडसे
3. सुनील बजाजीराव महिंद्रकर

 

4. रवींद्र जीवाजीराव खेबुडकर
5. निलेश गोरख सागर
6. लक्ष्मण भिका राऊत
7. जगदीश गोपाळकृष्ण मनियार

 

8. माधवी समीर सरदेशमुख
9. बाळासाहेब जालिंदर बेलदार
10. डॉ. जोत्स्ना गुरुराज पडियार

 

11. आण्णासाहेब दादू चव्हाण
12. गोपीचंद्र मुरलीधर कदम
13. बापू गोपीनाथराव पवार

 

14. महेश विश्वास आव्हाड
15. वैदही मनोज रानडे
16. विवेक बन्सी गायकवाड

 

17. नंदिनी मिलिंद आवाडे
18. वर्षा मुकुंद लड्डा
19. मंगेश हिरामन जोशी

 

20. अनिता निखील मेश्राम
21. गितांजली श्रीराम बाविस्कर
22. दिलीप ज्ञानदेव जगदाळे

 

23. अर्जुन किसनराव चिखले

 

 

दरम्यान, मंगळवारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होण्याची शक्यता असून राज्यात आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

 

त्यामुळेच राज्य सरकारने शासन निर्णयांचा धडाका लावल्याचं दिसतंय. गेल्या दहा दिवसात बाराशे पेक्षा अधिक शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत. तर मागील महिनाभरात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकांमध्ये 132 निर्णय जारी करण्यात आले आहेत.

 

 

विधानसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी प्रलंबित राहिले सर्व निर्णय जाहीर करण्याच्या मागे राज्य सरकार लागल्याचं दिसतंय. पण राज्य सरकारकडून रेकॉर्ड ब्रेक निर्णय घेतले जात असताना निधीबाबत वित्त विभागासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभा राहिल्याचं दिसतंय.

 

 

राज्य सरकारच्या या शासन निर्णयातून सर्वच समाज घटकांना निवडणुकीपूर्वी खूश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. विविध समाज घटकांच्या नोकरदारांच्या मागण्यांचा विचार करत शासन निर्णयाचा सपाटा लावण्यात आला आहे.

 

आचारसंहिता लागण्याच्या आधीच अधिकाऱ्यांनी मंत्री आणि मुख्यमंत्री कार्यालयाला टाटा बाय बाय केल्याचं दिसून आलं. नवीन सरकार येण्याच्या आधीच मंत्री आस्थापना आणि मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्यांनी क्रीम पोस्ट घ्यायला सुरुवात केल्याचंही दिसतंय.

 

 

मुख्यमंत्री कार्यालयातील ज्या अधिकाऱ्यांवरती महत्त्वाची जबाबदारी होती त्या अधिकाऱ्यांनी तात्काळ चांगल्या क्रीम पोस्टवरती आपली बदली करून घेतल्याचं दिसतंय. आगामी कोणाचं सरकार येईल याची शाशंकता असल्याने अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला का? याची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

 

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *