शिवसेना ठाकरे पक्षाचे ६५ उमेदवार जाहीर;पाहा तुमच्या मतदारसंघात उमेदवार कोण?

65 candidates of Shiv Sena Thackeray party announced

 

 

 

 

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नसला तरीही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.

 

पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. अनेक नव्या आणि जुन्या चेहऱ्यांना यामिनित्ताने संधी देण्यात आली आहे.

 

शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून कोणाला संधी देण्यात येणार हा प्रश्न होता. या प्रश्नावर उत्तरे मिळाली असून एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उद्धव ठाकरेंनी हुकमी एक्का दिला आहे.

 

डोंबिवलीतून दिपेश म्हात्रे, कल्याण ग्रामीणमधून सुभाष भोईर, ओवळा माजिवडातून नरेश मणेरा, कोपरी पाचपाखाडी येथून केदार दिघे, ठाण्यातून राजन विचारे, ऐरोलीतून एम. के. मढवी, मागाठाण्यातून उद्देश पाटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

२००९ पासून कोपरी पाचपाखाडीतून एकनाथ शिंदे आमदार आहेत. परंतु, २०२२ मध्ये झालेल्या शिवसेनेतील फुटीनंतर शिंदे आणि ठाकरे असे दोन प्रमुख गट पडले.

 

त्यामुळे एकनाथ शिंदेंविरोधात महाविकास आघाडीतून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. याच जागेवरून उद्धव ठाकरे

 

यांनी हुक्कमी एक्का उभा केला आहे. धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना येथून उमेदवारी देण्यात आली आहे.

 

विधानसभा मतदारसंघ उमेदवाराचे नाव
चाळीसगाव उन्मेश पाटील
पाचोरा वैशाली सुर्यवंशी

 

मेहकर (अजा) सिध्दार्थ खरात
बाळापूर नितीन देशमुख
अकोला पूर्व गोपाल दातकर

 

वाशिम (अजा) डॉ. सिध्दार्थ देवळे
बडनेरा सुनील खराटे

 

रामटेक विशाल बरबटे
वणी संजय देरकर

 

लोहा एकनाथ पवार
कळमनुरी डॉ. संतोष टारफे

परभणी डॉ. राहुल पाटील
गंगाखेड विशाल कदम

 

सिल्लोड सुरेश बनकर
कन्नड उदयसिंह राजपुत

 

संभाजीनगर मध्य किशनचंद तनवाणी
संभाजीनगर प. (अजा) राजु शिंदे

 

वैजापूर दिनेश परदेशी
नांदगांव गणेश धात्रक

 

मालेगांव बाह्य अद्वय हिरे
नाशिक मध्य वसंत गीते

 

नाशिक पश्चिम सुधाकर बडगुजर
पालघर (अज) जयेंद्र दुबळा

 

बोईसर (अज) डॉ. विश्वास वळवी
निफाड अनिल कदम

 

भिवंडी ग्रामीण (अज) महादेव घाटळ
अंबरनाथ (अजा) राजेश वानखेडे

 

डोंबिवली दिपेश म्हात्रे
कल्याण ग्रामीण सुभाष भोईर

 

ओवळा माजिवडा नरेश मणेरा
कोपरी पाचपाखाडी केदार दिघे

ठाणे राजन विचारे
ऐरोली एम.के. मढवी

 

मागाठाणे उदेश पाटेकर
विक्रोळी सुनील राऊत

 

भांडुप पश्चिम रमेश कोरगावकर
जोगेश्वरी पूर्व अनंत (बाळा) नर

दिंडोशी सुनील प्रभू
गोरेगांव समीर देसाई

 

अंधेरी पूर्व ऋतुजा लटके
चेंबूर प्रकाश फातर्पेकर

 

कुर्ला (अजा) प्रविणा मोरजकर
कलीना संजय पोतनीस

 

वांद्रे पूर्व वरुण सरदेसाई
माहिम महेश सावंत

 

वरळी आदित्य ठाकरे
कर्जत नितीन सावंत

 

उरण मनोहर भोईर
महाड स्नेहल जगताप

 

नेवासा शंकरराव गडाख
गेवराई बदामराव पंडीत

 

धाराशिव कैलास पाटील
परांडा राहुल ज्ञानेश्वर पाटील

 

बार्शी दिलीप सोपल
सोलापूर दक्षिण अमर रतिकांत पाटील

 

सांगोले दिपक आबा साळुंखे
पाटण हर्षद कदम

 

दापोली संजय कदम
गुहागर भास्कर जाधव

 

रत्नागिरी सुरेंद्रनाथ (बाळ) माने
राजापूर राजन साळवी

 

कुडाळ वैभव नाईक
सावंतवाडी राजन तेली

 

राधानगरी के. पी. पाटील

शाहूवाडी सत्यजीत आबा पाटील

 

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाने ६५ जागांवर उमेदवार जाहीर केले असून उर्वरित २० जागांची प्रतिक्षा आहे. दरम्यान, जाहीर केलेल्या जागांमध्ये काही जागांवर बदल होण्याची शक्यता आहे,

 

असं शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रवक्ते व राज्यसभा खासदार संजय राऊत महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत म्हणाले.

 

ImageImage

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *