पाथरीतून सुरेश वरपुडकर ;पाहा काँग्रेसची पहिली 48 उमेदवारांची यादी

Suresh Varpudkar from Pathari; see the first list of 48 candidates of Congress

 

 

 

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी आता सर्वपक्षीय उमेदवार याद्या जाहीर होत आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारी यादीची उत्सुकता लागली होती.

 

आता काँग्रेसने त्यामध्ये बाजी मारली आहे. काँग्रेसने आपली पहिली उमेदवारी यादी जाहीर केली आहे. पहिल्या उमेदवारी यादीमध्ये 48 उमेदवारांचा समावेश आहे.

 

काँग्रेसच्या पहिल्या यादीमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात यासारख्या ज्येष्ठ आमदारांचा समावेश आहे. तसेच, या यादीतून पुन्हा घराणेशाही दिसून आली आहे,

 

48 उमेदवारांची पहिली यादी
1. अक्कलकुवा – ॲड. के.सी. पडवी (ST)
2.शहादा – राजेंद्रकुमार कृष्णराव गावित (ST)

 

3. नंदुरबार – किरण दामोदर तडवी (ST)
4.नवापूर – श्रीकृष्णकुमार सुरुपसिंग नाईक (ST)

 

5.साक्री – एसटी प्रवीणबापू चौरे
6.धुळे ग्रामीण – कुणाल रोहिदास पाटील

 

7.रावेर – ॲड. धनंजय शिरीष चौधरी
8.मलकापूर – राजेश पंडितराव एकाडे

 

9.चिखली – राहुल सिद्धिविनायक बोंद्रे
10.रिसोड – अमित सुभाषराव झनक

 

11.धामणगाव रेल्वे -प्रा.वीरेंद्र वाल्मीकराव जगताप
12.अमरावती – डॉ. सुनील देशमुख

 

13.तेओसा – ॲड. यशोमती चंद्रकांत ठाकूर
14.अचलपूर – अनिरुद्ध बबलूभाऊ सुभानराव देशमुख

 

15.देवळी – रणजित प्रताप कांबळे
16.नागपूर दक्षिण पश्चिम – प्रफुल्ल विनोदराव गुडधे

 

17.नागपूर मध्यवर्ती – बंटी बाबा शेळके
18.नागपूर पश्चिम – विकास पी. ठाकरे

 

19.नागपूर उत्तर – SC डॉ. नितीन काशिनाथ राऊत
20 साकोली – नानाभाऊ फाल्गुनराव पटोले

 

21.गोंदिया- गोपालदास शंकरलाल अग्रवाल
22.राजुरा- सुभाष रामचंद्रराव धोटे

 

23.ब्रह्मपुरी – विजय नामदेवराव वडेट्टीवार
24.चिमूर – सतीश मनोहरराव वारजूकर

 

25.हदगाव – माधवराव निवृत्तीराव पवार पाटील
26 भोकर- तिरुपती बाबुराव कदम कोंडेकर

 

27 नायगाव – मीनल निरंजन पाटील (खतगावकर)
28 पाथरी – सुरेश अंबादास वरपुडकर

 

29 फुलंब्री – विलास केशवराव औताडे
30 मीरा भाईंदर – सय्यद मुजफ्फर हुसेन

 

31 मालाड पश्चिम – अस्लम आर. शेख
32 चांदिवली – मोहम्मद आरिफ नसीम खान

 

33 धारावी – डॉ.ज्योती एकनाथ गायकवाड (ST)
34 मुंबादेवी – अमीन अमीराली पटेल

 

35 पुरंदर – संजय चंद्रकांत जगताप
36 भोर – संग्राम अनंतराव थोपटे

 

37 कसबा पेठ – रवींद्र हेमराज धंगेकर
38 संगमनेर – विजय बाळासाहेब थोरात

39 शिर्डी – प्रभावती जे.घोगरे
40 लातूर – ग्रामीण धिरज विलासराव देशमुख

 

41 लातूर शहर – अमित विलासराव देशमुख
42 अक्कलकोट – सिद्धाराम सातलिंगप्पा म्हेत्रे

 

43 कराड दक्षिण – पृथ्वीराज चव्हाण
44 कोल्हापूर दक्षिण – रुतुराज संजय पाटील

 

45 करवीर – राहुल पांडुरंग पाटील
46 हातकणंगले – राजू जयंतराव आवळे (SC)

 

47 पलूस-कडेगाव – डॉ.विश्वजीत पतंगराव कदम
48 जाट – विक्रमसिंह बाळासाहेब सावंत

 

 

दरम्यान, महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून विधानसभा निवडणुकीसाठी

 

पहिली यादी जाहीर करण्यात आलेली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून 65 तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 45 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

 

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह बहुतांशी जुन्याच चेहऱ्यांना काँग्रेसने ४८ जणांच्या पहिल्या यादीत स्थान देण्यात आले.

 

 

अन्य पक्षांप्रमाणेच काँग्रेसच्या यादीतही घराणेशाहीला प्राधान्य देण्यात आले. धारावीतून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या बहिणीला संधी देण्यात आल्याने जुनेजाणते कार्यकर्ते नाराज झाले आहेत. २७ विद्यामान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

 

 

काँग्रेसने ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. महाविकास आघाडीत १०० जागा मिळाव्यात अशी काँग्रेसची अपेक्षा आहे. अजूनही काही जागांवरून काँग्रेसची शिवसेनेशी (ठाकरे) ताणाताणी सुरूच आहे.

 

काँग्रेसच्या यादीत बहुतांशी विद्यामान आमदारांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. यात पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, अमित देशमुख,

 

विश्वजीत कदम, के. सी. पाडवी, यशोमती ठाकूर, नितीन राऊत यांचा समावेश आहे. माजी आमदार नसिम खान (चांदिवली), मुझ्झफर हुसेन (मीरा-भाईंदर) यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून प्रफुल गुडधे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया

 

यांच्या विरोधात तिरुपती कोंडेकर या मराठा आरक्षण चळवळीतील कार्यकर्त्याला रिंगणात उतरविण्यात आले आहे. भाजपमधून स्वगृही प्रवेश केलेल्या डॉ. सुनील देशमुख (अमरावती) तर गोपाळदास अगरवाल (गोंदिया) यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

 

● रावेर मतदारसंघातून विद्यामान आमदार शिरीष चौधरी यांच्याऐवजी त्यांचे पुत्र धनंजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

 

 

● मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांची लोकसभेवर निवड झाल्याने धारावी मतदारसंघातून अनेक जण इच्छुक होते. पण वर्षा गायकवाड यांची बहीण ज्योती गायकवाड यांना उमेदवारी दिली आहे.

 

● नांदेड जिल्ह्यातील नायगावमधून माजी खासदार भास्करराव खतगावकर यांची सून मीनल यांना पक्षाने संधी दिली आहे. ● माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे दोन पुत्र अमित देशमुख व धीरज देशमुख यांना पु्न्हा उमेदवारी देण्यात आली.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *