महाविकास आघाडीतील जागा वाटपावर राहुल गांधीं रागावले ,बैठकीतून घेतला काढता पाय

Rahul Gandhi was angry at the allocation of seats in the Mahavikas Aghadi, and walked out of the meeting

 

 

 

विधानसभेचा रणसंग्राम सुरु झाला असून राज्यात पुन्हा सरकार स्थापन करण्यासाठी सर्व प्रमुख नेते जोर लावताना दिसत आहेत.

 

सर्व राजकीय पक्षांच्या जागावाटप जाहीर होत आहेत. मात्र मविआच्या जागावाटपाबाबत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी नाराजीचा सूर मारला आहे.

 

मविआच्या जागावाटपाबाबत दिल्लीमध्ये काल झालेल्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत अनेक उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली.

 

यामध्ये विदर्भ, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जागा उबाठा गटाला दिल्यामुळे राहुल गांधींना प्रचंड राग आला. ‘काँग्रेसच्या नेत्यांनी

 

योग्यपद्धतीने वाटाघाटी केल्या नाहीत’, अशा शब्दांत राहुल गांधींनी मत व्यक्त करुन त्यांनी सुरु बैठकीतून काढता पाय घेतला.

 

दरम्यान, राहुल गांधी बैठकीतून गेल्यानंतरही पुढे तासभर मीटिंग सुरू होती. मुंबई व विदर्भामधील काही जागा शिवसेनेच्या

 

ठाकरे गटाच्या आग्रहामुळे काँग्रेसला सोडून द्याव्या लागल्या. महाराष्ट्रातील काही उमेदवारांच्या नावांवर राहुल गांधी यांनी आक्षेप व्यक्त केला.

 

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *